केरळच्या शाळेत सर आणि मॅडम बंद, विद्यार्थी यापुढं शिक्षकांना टीचर नावानं हाक मारणार, नेमकं कारण काय?

केरळच्या (Kerala ) पलक्कड ( Palakkad District ) जिल्ह्यातील एका शाळेनं विद्यार्थ्यांना अनोखं आवाहन केलं आहे. शिक्षकांना सर आणि मॅडम म्हणण्याऐवजी टीचर म्हणा, असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आहे.

केरळच्या शाळेत सर आणि मॅडम बंद, विद्यार्थी यापुढं शिक्षकांना टीचर नावानं हाक मारणार, नेमकं कारण काय?
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 1:16 PM

तिरुअनंतपुरम : केरळच्या (Kerala ) पलक्कड ( Palakkad District ) जिल्ह्यातील एका शाळेनं विद्यार्थ्यांना अनोखं आवाहन केलं आहे. शिक्षकांना सर आणि मॅडम म्हणण्याऐवजी टीचर म्हणा, असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आहे. ओलास्सेरी ( Olassery Village ) गावातील सरकारी अनुदान प्राप्त सीनियर बेसिक स्कूल (Senior Basic School) जेंडर इक्वालिटी म्हणजेच स्त्री पुरुष समानतेसाठी ( Gender Equality ) प्रयत्न करणारी पहिली शाळा ठरली आहे. या शाळेत 300 विद्यार्थ्यी शिक्षण घेतात. शाळेचे मुख्याध्यापक वेणुगोपाल एच यांच्या माहितीनुसार सर आणि मॅडम म्हणण्याऐवजी टीचर म्हणण्याची संकलप्ना एका पुरुष शिक्षकाला सूचली. त्या शाळेत 9 महिला शिक्षक आणि 8 पुरुष शिक्षक कार्यरत आहेत.

संजीव कुमार वी यांची संकल्पना

मुख्यमाध्यापक वेणुगोपालन यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. आमच्या स्टाफमधील संजीव कुमार यांनी शिक्षकांना सर म्हणून हाक मारण्याची प्रथा रद्द करण्याचा विचार करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. संजीव कुमार वी हे पलक्कड येथील सामाजिक कार्यकर्ते बोबन मट्टूमंथा यांच्याद्वारे सुरु केलेल्या अभियानानं प्रेरित झालेले होते. बोबोन मट्टूमंथा यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सर किवा मॅडम अशी असं संबोधित करणं बंद करावं म्हणून केरळ सरकारसोबत पत्र व्यवहार केला होता. मट्टूमंथा यांनी शाळांमध्ये देखील सर मॅडम असं म्हणनं बंद व्हावं, अशी भूमिका मांडली होती.

माथुर पंचायतीच्या निर्णयातून प्रेरणा

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार वेणुगोपालन यांनी सर आणि मॅडम म्हणण्याची पद्धत एका पंचायतीनं देखील रद्द केली असल्याची माहिती दिली. माथुर पंचायतीनं गेल्या वर्षी जुलै महिन्यात सर आणि मॅडम म्हणण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. माथुर पंचायतीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना पदाच्या नावानं हाक मारण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही माथुर पंचायतीच्या कामामुळं प्रभावित झालो होतो, असं वेणुगोपालन यांनी सांगितलं.

सुरुवातीला विद्यार्थ्यांचा विरोध

वेणुगोपालन यांनी सांगितलं की शिक्षकांना संबोधित करताना लिंगभेद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी शाळेत बदल कऱण्याचा विचार केला. विद्यार्थी आणि पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. वेणुगोपालनं यांनी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सर आणि मॅडम ऐवजी टीचर म्हणावं, असं आवाहन केल्याचं सांगितलं. सुरुवातीला या गोष्टीला विरोध झाला पण आता विद्यार्थ्यांनी टीचर म्हणण्यास सुरु केलं आहे. आता कोणताही विद्यार्थी सर आणि मॅडम म्हणत नाही असं देखील मुख्याध्यापकांनी सांगितलं.

इतर बातम्या:

bank of baroda recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

आशिष शेलार यांचा सरकारविरोधात संघर्ष म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी- देवेंद्र फडणवीस

Kerala school ban on saying Sir Madam in Palakkad District students call only Teacher know why

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.