TET Exam : टीईटी परीक्षेतील गैरप्रकराची व्याप्ती वाढणार? तत्कालीन शिक्षणमंत्र्याचे ओएस, पीएस संशयाच्या भोवऱ्यात?

दैनिक सामनानं दिलेल्या वृत्तानुसार टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची लिंक आता थेट तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या ओएस आणि पीएस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

TET Exam : टीईटी परीक्षेतील गैरप्रकराची व्याप्ती वाढणार? तत्कालीन शिक्षणमंत्र्याचे ओएस, पीएस संशयाच्या भोवऱ्यात?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 10:39 AM

पुणे: पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. त्या दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी (MahaTET) परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली. दैनिक सामनानं दिलेल्या वृत्तानुसार टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची लिंक आता थेट तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या ओएस आणि पीएस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षा गैरप्रकारातील एका आरोपीनं थेट तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या सचिवांना पैशाचे वाटप केल्याची माहिती दिल्याची माहिती सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळं तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या ओएस आणि पीएसवर चौकशीचं सावट घोंघावत आहे.

जानेवारी 2020 च्या परीक्षेत गैरप्रकार

महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

तुकाराम सुपे यांच्या घरुन 90 लाखांचा ऐवज जप्त

तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

कोट्यवधी रुपये घेतल्याची कबुली

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने1 कोटी 25 कोटी तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी 90 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. यात आणखी आरोपी आहेत, ही लिंक वाढत जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते 1 लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.

इतर बातम्या

Dattatray Ware : आदर्श मॉडेल ठरलेल्या वाबळेवाडीच्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारेंचं निलंबन, पुणे जिल्हा परिषदेची कारवाई, हे आहे कारण

ICAR Recruitment 2022: आयसीएआरमध्ये 641 पदांसाठी भरती, दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

Maha TET exam scam daily Saamana reported link of scam reach to more people related education sector

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...