ठाकरे सरकारकडून MAHA TET परीक्षेची घोषणा, संपूर्ण प्रक्रिया कशी असेल? वाचा सविस्तर

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

ठाकरे सरकारकडून MAHA TET परीक्षेची घोषणा, संपूर्ण प्रक्रिया कशी असेल? वाचा सविस्तर
महा टीईटी
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 6:33 PM

मुंबई: आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

टीईटी परीक्षा दोन गटात

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

टीईटीचे दोन पेपर

साधारणपणानं टीईटीचे दोन पेपर घेण्यात येतात. महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येतं. 1 ली ते 5 वी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयाती डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पेपर 1 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न

बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.

पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न

बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.

टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कुठे करायचा?

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर येत्या काही दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. टीईटी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केल जाईल.

इतर बातम्या:

Breaking: 40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Gold Silver Rate Today: शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

Maharashtra Uddhav Thacerkay Government declared Maha Tet will conduct during September to December know full details

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.