Educationl Loan: खास विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना! अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार शैक्षणिक कर्ज

तुम्ही चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केलात, तर हे कर्ज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसोबत मिळू शकतं आणि यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा तुम्हाला जमा करायची गरज पडत नाही.

Educationl Loan: खास विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना! अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार शैक्षणिक कर्ज
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 5:21 PM

सरकारने प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना सुरू केली आहे. ही योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना (Scheme For Students) असणारे. या योजनेत विद्यार्थ्यांना पोर्टलच्या माध्यमातून 13 बँकांकडून अनेक प्रकारचे कर्ज घेता येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्राच्या 10 हून अधिक मंत्रालये आणि विभागांच्या शिष्यवृत्ती योजनेतून पैसे दिले जातात. यामध्ये शिष्यवृत्ती योजना आणि कर्ज योजना (Scholarship And Loan Scheme For Student) एकाच व्यासपीठावर आणल्या आहेत. या योजनेत तुम्हाला तुमच्या अभ्यास अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार कर्ज (Education Loan) मिळेल. तुम्ही चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केलात, तर हे कर्ज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसोबत मिळू शकतं आणि यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा तुम्हाला जमा करायची गरज पडत नाही.

…तर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गॅरंटी द्यावी लागेल

पण जर तुम्ही 4 लाख ते 6.5 लाख रुपयांदरम्यान कर्ज घेतलं तर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गॅरंटी द्यावी लागेल आणि जर एखाद्या विद्यार्थ्याची कर्जाची रक्कम साडेसहा लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक मालमत्ता तारण मागू शकते. या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाशी संबंधित प्रश्न आणि तक्रारींसाठीही ईमेलची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही आर्थिक दुर्बल घटकातून आला असाल तर सरकारी बँकेकडून कर्ज घ्या. यामध्ये तुम्हाला व्याज अनुदानाच्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. कारण कर्जाची परतफेड वेळेत न झाल्यास तुमच्यासह बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांच्या यादीत तुमचे पालकही येतील. कर्जाची रक्कम प्रत्येक सेमिस्टरच्या सुरुवातीला थेट आपल्या कॉलेज किंवा विद्यापीठापर्यंत पोहोचते. कॉलेज/विद्यापीठाचा सर्व खर्च यात होतो, हे लक्षात ठेवावे लागेल.

अर्जासोबत तुम्हाला या कागदपत्रांची गरज लागेल

  • आयडी प्रूफ (आधार, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड) .
  • पालकांचा उत्पन्नाचा दाखला .
  • विद्यार्थी पासपोर्ट साइज फोटो .
  • पत्त्याचा पुरावा (आधार, मतदार ओळखपत्र किंवा वीज बिल)
  • हायस्कूल आणि इंटरमिजिएट मार्कशीटची फोटो कॉपी .
  • आपण ज्या संस्थेचा अभ्यास करणार आहात त्या संस्थेचे प्रवेश मान्यता पत्र व अभ्यासक्रमाच्या कालावधीचा पुरावा तसेच खर्चाचा तपशील दाखवावा लागेल.

अर्ज कसा करावा

  1. तुम्ही अर्ज करण्यासाठी पोर्टलवर जाऊन या लिंकवर क्लिक करा
  2. या लिंकवर रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.
  3. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इमेल आयडी आणि पासवर्ड मिळेल. इमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करता येणार आहे. हा ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमच्यासोबत सेव्ह करा.
  4. शैक्षणिक कर्जासाठी तुम्ही कॉमन एज्युकेशन लोन फॉर्म भरा. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी तुमच्या गरजेनुसार कर्जासाठी अर्ज करावा लागतो.
  5. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला आपोआपच या पोर्टलवर मिळेल.
  6. या वेबसाईटवर तुम्ही स्कॉलरशिपसाठी सहज अर्ज करू शकता.
  7. स्कॉलरशिपसाठी तुम्हाला तुमचा कोर्स निवडावा लागेल आणि त्यानुसार पोर्टलवर माहिती मिळेल.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.