School Reopen : इंग्रजी माध्यमाच्या शाळा आजपासून सुरु, मेस्टाचा निर्णय, इस्मा संघटनेची वेगळी भूमिका

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन(मेस्टा) आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School )सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

School Reopen : इंग्रजी माध्यमाच्या शाळा आजपासून सुरु, मेस्टाचा निर्णय, इस्मा संघटनेची वेगळी भूमिका
school reopening
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 9:07 AM

मुंबई: महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन(मेस्टा) आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School )सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं स्वतः शाळा सुरू कराव्यात अन्यथा आम्ही शाळा सुरू करु असा इशारा मेस्टानं (MESTA) दिला होता. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशननं आजपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. 15 फेब्रुवारी पर्यंत सरसकट शाळा बंदच्या राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयाचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनचा विरोध केला होता.राज्य सरकारच्या सरसकट शाळा बंदच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा देखील मेस्टा संघटनेच्यावतीनं करण्यात आला आहे.पालकांच्या सहमतीने, विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार, 50 टक्के क्षमता किंवा दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहेत. इस्टा संघटनेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय बदलला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

इस्मा संघटनेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय बदलला

कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा आजपासून सुरू होणार नाहीत. इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन ही भूमिका घेतलीय. इस्मा पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहे. शाळा सुरू करण्याबाबत इस्मा मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतरच पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती कळतेय. इस्माने आज पासून शाळा सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याच मान्य केल्यानं आज शाळा सुरू करण्याचा निर्णय मागं घेण्यात आला आहे.

मुंबई आणि ठाण्यात शाळा बंद राहणार

मुंबई आणि परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही वाढत असल्याने या परिसरातील इंग्रजी आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तुर्तास सुरू होणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज ‍असोसिएशनने (मेस्टा) या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबई, ठाणे परिसरात या शाळा सुरू करता येणार नसल्याने विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मेस्टाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याने सांगत आपल्याशी संबंधित असलेल्या 18 हजाराहून अधिक शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला मुंबई, ठाणे परिसराचा अपवाद असणार आहे.

इतर बातम्या:

SPPU Exam | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच, तारीखही ठरली

मुंबईतील 178 महाविद्यालयात कुणी प्राचार्य देता का?..प्राचार्य, कारभार प्रभारी भरोसे

School Reopen Maharashtra English Medium School Association decided start school from today except Mumbai and Thane

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.