National Teachers Award 2021: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, महाराष्ट्राच्या दोन शिक्षकांचा सन्मान होणार
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 वितरण समारंभ 5 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करतील.
National Teachers Award 2021 नवी दिल्ली: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 वितरण समारंभ 5 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम, आंध्र प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन शिक्षक आहेत. या वर्षी पुरस्कारप्राप्तांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील दोन शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीतील द्वारका येथील बालभारती पब्लिक स्कूल आणि राजस्थानमधील बिर्ला बालिका विद्यापीठ, झुंझुनू येथील शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, करपवंद, बस्तर, छत्तीसगडमधील एका शिक्षकाला देखील राष्ट्रीय शिक्षक पुरस्करानं सन्मानित केलं जाणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यामागील भूमिका
देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करणं आणि आनंद साजरा करणे, या भूमिकेतून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. शिक्षकांचा कार्याचा सन्मान करणे हा देखील यामागील उद्देश आहे. ज्या शिक्षकांनी त्यांच्या कामाप्रती वचनबद्धतेमुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासोबत विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता या पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. शिक्षकांना 1 जून ते 10 जुलै दरम्यान नामांकन अर्ज सादर करायला सांगितलं जाते. 10 ऑगस्ट रोजी पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. राज्यस्तरीय निवड समिती किंवाकेंद्रीय पुरस्कार समितीद्वारे शिक्षकांची निवड केली जाते.
शिक्षकांचे नाव आणि पद: शाळा आणि राज्य
- ममता पालीवाल, व्याख्याता: GGSSS भिवानी, हरियाणा कमलकिशोर
- शर्मा, प्राचार्य: सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, कांदाघाट, हिमाचल प्रदेश
- जगतर सिंह, शिक्षक: सरकारी प्राथमिक शाळा, खमानो, फतेहगढ साहिब, पंजाब
- विपिन कुमार, उपप्राचार्य: शासकीय प्रतिभा विकास विद्यालय, दिल्ली
- दीपक जोशी, शिक्षक: शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, दंडुसर, राजस्थान
- जय सिंह, वरिष्ठ शारीरिक शिक्षक: शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, देवरोड, राजस्थान
- वनिता दयाभाई राठोड, प्राचार्य: श्री विनोबा भावे स्कूल, राजकोट, गुजरात
- अशोक कुमार मोहनलाल परमार, शिक्षक: हितेन ढोलकिया शाळा, भुज, गुजरात
- शक्ती पटेल, माध्यमिक शिक्षक: सरकारी हायस्कूल, मंडला, मध्य प्रदेश
- हरिदास शर्मा, कार्यवाह मुख्याध्यापक: आरकेएमएस, रामगढ, बिहार
- चंदना दत्ता, शिक्षक: M.S. रंती सरकारी शाळा, मधुबनी, बिहार
- अशोक कुमार सत्पथी, शिक्षक: जिल्हा शासकीय शाळा, ओडिशा
- अजित कुमार सेठी, कार्यवाह मुख्य शिक्षक: सरकारी यूपीएस कनमना, ओडिशा
- हरिस्वामी दास, मुख्य शिक्षक: सोवनगर हायस्कूल, मालदा, पश्चिम बंगाल
- संजीवकुमार शर्मा, शिक्षक : शासकीय प्राथमिक शाळा, रियासी, जम्मू आणि काश्मीर
- मुहम्मद अली, कार्यवाहक मुख्याध्यापक: शासकीय मध्य विद्यालय, कारगिल, लडाख
- तृप्ती माहौर, शिक्षक: शासकीय कन्या आंतर महाविद्यालय, रामपूर, उत्तर प्रदेश
- मनीष कुमार, शिक्षक: कनिष्ठ हायस्कूल, शिवगंज, उत्तर राज्य
- सुरुची गांधी, प्राचार्य: बाल भारती पब्लिक स्कूल, द्वारका, दिल्ली
- अचला वर्मा, शिक्षक: बिर्ला बालका विद्यापीठ, झुंझुनू, राजस्थान
- मॅथ्यू के थॉमस, शिक्षक: सैनिक शाळा, तिरुअनंतपुरम
- प्रमोद कुमार शुक्ला, व्याख्याता: एकलव्य मॉडेल निवासी शाळा, बस्तर, छत्तीसगड
- फैसल एसएल, टीजीटी (ग्रंथपाल): केंद्रीय विद्यालय पट्टम, केरळ
- दुदा सोरा, मुख्याध्यापक: सरकारी उच्च प्राथमिक एपीपी कॉम्प्लेक्स, अरुणाचल राज्य
- स्वीडनसुनु झाओ, मुख्याध्यापक: जीएमएस जाखामा, नागालँड
- निंगमारियो शिमरे, व्याख्याता: उखरुल उच्च माध्यमिक विद्यालय, मणिपूर प्रेमदास
- छेत्री, शिक्षक: सर टीएन वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, गंगटोक, सिक्कीम
- मिंगमा शेर्पा, मुख्याध्यापक: लुम प्राथमिक शाळा, सिक्कीमॉ
- जकिंटा वनलांगजमी, मुख्य शिक्षक: ए आणि एम ग्रँडचिल्ड स्कूल, मिझोराम
- सिब शंकर पाल मुख्य शिक्षक: पांडबपूर हायस्कूल, त्रिपुरा
- कंगकन किशोर दत्ता शिक्षक: बामुनपुखुरी हायस्कूल, आसाम
- बिनंदा स्वर्गियारी, शिक्षक: केबी देउलकुची, एचएस स्कूल, बक्सा, आसाम
- मनोज कुमार सिंह, शिक्षक: हिंदुस्थान मित्र मंडळ मध्य विद्यालय, झारखंड
- प्रसाद मणप्पारामबिल भास्करन, मुख्याध्यापक: जीएलपीएस. वरवूर, केरळ
- कोनाथला फणी भूषण श्रीधर, शिक्षक: जिल्हा परिषद हायस्कूल, आंध्र प्रदेश
- एस. मुनी रेड्डी, शिक्षक: जेपी हायस्कूल, चित्तूर, आंध्र प्रदेश
- रंगैया कडराला, कार्यवाहक मुख्याध्यापक: एमपीपीएस सावरखेडा, तेलंगणा
- रामास्वामी पाययवुला, मुख्याध्यापक: जिल्हा परिषद हायस्कूल इंदिरानगर, तेलंगणा
- नागराजा सीएम, शिक्षक सरकारी हायस्कूल, बेंगलोर, कर्नाटक
- आशा देवी के, मुख्याध्यापक: पंचायत युनियन मिडिल स्कूल, तामिळनाडू
- ललिता डी, मुख्याध्यापिका: सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालय, इरोड, तामिळनाडू
- खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, शिक्षक: जे.पी. उच्च प्राथमिक शाळा, गडचिरोली, महाराष्ट्र
- उमेश रघुनाथ खोसे, शिक्षक: J.P.P.S. जगदंबनगर, महाराष्ट्र
- जयसुंधर व्ही शिक्षक: शासकीय माध्यमिक शाळा, पुद्दुचेरी
इतर बातम्या:
काही मिळो ना मिळो आंदोलन करतच राहणार, राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीला इशारा
राष्ट्रवादीचं पुण्यात गॅस दरवाढीविरोधात आंदोलन, मुंबईत मनसेकडून मंदिरं उघडण्यासाठी आरती
Teachers Day 2021 National Teachers Awards 2021 President Ramnath Kovind will gave to 44 teachers of India to be awarded on Sept 5