निवडणुकीच्या आगोदर काँग्रेसकडून जनतेला अनोखी भेट, निवडणुकीत होईल का फायदा ?
पंजाबमधील विधानसभेच्या एकूण जागा – 117
पंजाब – पंजाब (punjab) मध्ये पुढच्या महिन्यात होणा-या निवडणुकीचे पडगम वाजायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे (congress) सद्याचे मुख्यमंत्री (cm) चरणजीत सिंह चन्नी यांनी जनतेच्या हिताची एक घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने वीज दरात प्रति युनिट 3 रुपयांनी कपात केली आहे. ही माहिती पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढलेला महागाई भत्ता (DA) आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची उचललेली पावले यांचा समावेश आहे.
निवडणुकीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून काही दिवसापूर्वी सीएम चन्नी यांनी सर्व गोशाळांची वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सर्व गोशाळांना सौर यंत्रणा बसवण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्याचबरोबर तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देत, मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, जर पक्ष पुन्हा सत्तेत आला तर वर्षभरात एक लाख तरुणांना नोकऱ्या देऊ आणि त्यांना परदेशात जाण्यासाठी मदतीचा कार्यक्रमही राबवू अशी ग्वाही त्यांनी तिथल्या जनतेला दिली आहे.
एका खाजगी विद्यापीठात तरुणांसाठी रोजगार हमी योजना (प्रगती) सुरू केल्यानंतर ते म्हणाले होते की, बारावी उत्तीर्ण झालेले तरुण नोकरीसाठी पात्र असतील. सरकार स्थापन झाल्यानंतर एक वर्षाच्या आत नोकऱ्या दिल्या जातील असे तरूणांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले आहेत.
सध्याची पंजाबमधील स्थिती काय? पंजाबमधील विधानसभेच्या एकूण जागा – 117 सध्याचं पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे भाजप – 3 काँग्रेस – 77 आप – 20 अकाली दल – 15
काही राजकीय जाणकरांच्या मते पंजाबमध्ये सद्याच्या निवडणुकीत आप बाजी मारेल अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये मोठा संघर्ष होईल. 10 मार्चला कोणाची पंजाब प्रस्तापित होईल हे पाहावयास मिळेल.