दोन दिवसापुर्वी अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश, आज घेतला मुलायम सिंह यांचा आशीर्वाद; समाजवादी पक्षात वाढली चिंता

आशीर्वाद घेतल्यामुळे युपीत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती.

दोन दिवसापुर्वी अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश, आज घेतला मुलायम सिंह यांचा आशीर्वाद; समाजवादी पक्षात वाढली चिंता
भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांनी मुलायम सिंह यांचा आशीर्वाद घेतला
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 11:45 AM

उत्तर प्रदेश – दोन दिवसापुर्वी अवघ्या देशाला राजकीय धक्का देत अपर्णा यादव (APRNA YADAV) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीवर (SAMAJWADI PARTY) कडाडून टीका केली. त्यामुळे यादवांच्या घरात दुफळी झाल्याची लोकांची चर्चा होती. परंतु आज अपर्णा यादव यांच्या घरी जाऊन मुलायम सिंह यादव (MULAYAM YADAV)यादव यांचा आशीर्वाद घेतला आहे. अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यांनी अपर्णा यादव यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्यांचा वैयक्तीक पातळीवर निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.

आशीर्वाद घेतल्यामुळे युपीत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती. परंतु अखिलेश यादव यांना ज्यावेळी आशीर्वाद याविषयी पत्रकारांनी विचारले, त्यावेळी अखिलेश यादव यांनी अपर्णा यादव यांचे लग्न मुलायम यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक यादव यांच्याशी झाले आहे, तर अखिलेश यादव हे पहिल्या लग्नातील त्यांचे पुत्र आहेत असे उत्तर दिल्याने अनेक कार्यकर्त्यांना आधार मिळाला असल्याची चर्चा आहे.

अपर्णा यादव यांनी समाजवादी पक्ष सोडून भाजप प्रवेश केला, त्यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाचे राज्य प्रमुख स्वतंत्र देव सिंह हे उपस्थित होते. यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार प्रमोद गुप्ता आणि अनेक नातेवाईकांनी भाजपला समर्थन दर्शविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपर्णा यादव यांनी वारंवार कौतुक केले आहे. तसेच स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि रोजगार यासाठी काम करत असलेल्या भाजप सरकारचं अपर्णा यादव यांच्याकडून वारंवार कौतुक केलं आहे. तसेचं भाजपचं काम मला आवडत असल्याने मी त्या पक्षात प्रवेश करत असल्याचे सुध्दा अपर्णा यादव यांनी स्पष्ट केले होते.त

युपीत लोकांना बदल हवाय, त्यामुळे ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. समाजवादी पार्टी अनेक लोकांशी जोडली गेलेली आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीत कोणीही आमच्या पक्षाशी राजकीय स्पर्धा करू शकत नाही.

मुलायम सिंह यादव जिथे शिकले, नोकरीला लागले तिथूनच अखिलेश यादव लढणार; अखेर सस्पेन्स संपला!

Goa Assembly Elections : गोवा निवडणुकीत उत्पल पर्रीकर पोकसमध्ये, तिकीट कुठून? भूमिका काय?

UP Assembly Election: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 41 पैकी 16 महिलांना तिकीट; उन्नाव पीडितेच्या आईला उमेदवारी!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.