Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Assembly Election: काँग्रेसने राजकीय मैदानात उतरवली बिकनी गर्ल, बॉलिवूडमध्ये केलंय काम

या अभिनेत्रीचं नाव अर्चना गौतम असं असून हीला मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता तिच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार हा चर्चेचा विषय आहे.

UP Assembly Election: काँग्रेसने राजकीय मैदानात उतरवली बिकनी गर्ल, बॉलिवूडमध्ये केलंय काम
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 2:15 PM

उत्तर प्रदेश – काँग्रेसने (congress) भाजपच्या (bjp) विरोधात विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी अनेक शक्कल लढवल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. कारण पहिल्या यादीत 40 टक्के महिला उमेदवारांना संधी देऊन भाजप समोर मोठं आवाहन उभं केलं आहे. निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून बंडखोर आमदारांचे राजीनामे आणि नवीन पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यातचं आज काँग्रेसने भाजपच्या विरोधात अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) यांना उमेदवारी जाहीर करून भाजपची मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे नुकतीच काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली होती. त्यात उन्नाव पीडीतेच्या आईला तिकीट जाहीर केल्याने चर्चेला पेव फुटला होता. त्याशिवाय अभिनेत्री अर्चना गौतम हीचं देखील नाव आहे.

या अभिनेत्रीचं नाव अर्चना गौतम असं असून हीला मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता तिच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार हा चर्चेचा विषय आहे. अर्चनाने बॉलिवूडमध्ये काम केल्याने तिचा परिचय अवघ्या देशाला आहे. त्यामुळे मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवाराला मोठा संघर्ष करावा लागणार हे निश्चित आहे.

अभिनेत्रीची संपुर्ण माहिती आत्तापर्यंत अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती नावाच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अर्चना गौतम हसीना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. विशेष म्हणजे जंक्शन वाराणसी चित्रपटात तीने आयटम साँग केला होता.

2014 मध्ये अर्चनाने मिस उत्तर प्रदेश किताब मिळवला, त्यानंतर अर्चनाने मिस बिकिनी इंडिया, मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती. विशेष म्हणजे तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मधे तिला भारताकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. तसेच तीची ब्युटी पेजेंट विजेती म्हणून ओळख आहे.

बिकिनी गर्ल म्हणून प्रसिध्द असलेल्या अर्चनाने मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली आहे. आता अर्चना राजकीय आखाड्यात उतरली असून काँग्रेसकडून जाहीर झालेल्या 125 उमेदवारांच्या यादीत तीचं नावं आहे. बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावल्यानंतर राजकारणातल्या रिंगणात बाजी कशी मारते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॅन असून ती तिथे नेहमी आपली मतं मांडून फोटो शेअर करत असते.

भाजपचे 9 बंडखोर आमदार आज समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात शिवसेना इतक्या जागा लढणार ? संजय राऊतांनी केलं स्पष्ट

UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.