मतदार अन् लोकशाही लग्न, पुणे शहरातील अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

voter and marriage card: पुण्यात सध्या एक विवाह निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. १३ मे च्या पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका आहे.

मतदार अन् लोकशाही लग्न, पुणे शहरातील अनोखी लग्नपत्रिका व्हायरल
पुणे शहरात व्हायरल झालेली अनोखी लग्नपत्रिका
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 9:47 AM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यासाठी मतदान १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. त्याचवेळी निवडणूक आयोग आणि सामाजिक संघटनांकडून मोहीम सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाकडून सार्वजनिक ठिकाणी मतदार जगजागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे. विविध माध्यमांतून लोकांना मतदानासाठी जागृत केले जात आहेत. त्याचवेळी सामाजिक संघटनांकडून जागृती केली जात आहे. पुणे शहर यासंदर्भात वेगळे ठरले आहे. पुणेकरांनी मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिका केली आहे. ती व्हायरल झाली आहे. १३ मे च्या लग्नासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण दिले गेले आहे.

कशी आहे लग्नपत्रिका

पुण्यात सध्या एक विवाह निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. १३ मे च्या पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका आहे. मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभमुहूर्तावर होणार आहे.

पुणे शहरात व्हायरल झालेली अनोखी लग्नपत्रिका

असे केले आवाहन

लोकसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक, एक मतदानरुपी आशीर्वाद देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, हे अगत्याचे निमंत्रण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

या अनोख्या लग्नाचे निमंत्रण आम्ही भारताचे लोक यांनी दिले आहे. आपले मतदान हाच आमचा आहेर अण् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असणार आहे, असे या पत्रिकेत म्हटले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.