Goa Election Result 2022 Live : पुढची 5 वर्षे गोव्याच्या समृध्दीची असतील – देवेंद्र फडणवीस
Goa Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: : गोव्यात भाजप (Goa Elections result 2022) पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. मात्र यावेळी काँग्रेसही जोरात टक्कर देताना दिसूत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निवडणुकीला रंगत आणली आहे.
गोवा : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Elections result 2022) अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप उत्सुक आहे. मात्र काँग्रेस कडवी टक्कर देताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने निवडणुकीत उडी घेतली असली, तरी त्यांचा मतवाटा नगण्य ठरला. निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन भाजपची डोकेदुखी वाढली होती. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी बंड केलं. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसल्याने भाजपला फटका बसला नाही. मात्र गोव्यात युतीचे सकार येणार का, की भाजप किल्ला गमावणार का? याविषयी अजूनही चर्चा सुरु आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
गोव्यातील जनतेचे आभार, त्यांच्यामुळे विजय शक्य झाला – देवेंद्र फडणवीस
We’ve won 20 seats. MGP has also given us a letter of support. 3 independent MLAs have also supported us. So now we are 20+3+2 =25. There is a possibility that more candidates will join us. So we are forming the govt: BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/feEnOXtNjm
— ANI (@ANI) March 10, 2022
-
पुढची पाच वर्षे गोव्याच्या समृध्दीची असतील
अतिशय चांगलं काम आमच्या सरकाने केलंय
गोव्याच्या टीमने चांगली काम केलं त्यामुळे विजय मिळाला आहे. गोव्यातल्या टीमचा विजय आहे
गोव्यातल्या मोठ्या नेत्यांचं मार्गदर्शन लाभलं
पुढची पाच वर्षे गोव्याच्या समृध्दीची असतील
गोव्यात मोठा विजय मिळाल्याने गोव्याच्या जनतेचे आभार मानतो
-
-
तिस-यांदा सत्ता स्थापण करण्यात आम्हाला यश
गोव्यात सगळ्या जनतेचे अभिनंदन आणि आहभार
आजचा विजय हा जनतेचा विजय आहे
देवेंद्र फडणवीसांचे देखील आभार
तिस-यांदा सत्ता स्थापण करण्यात आम्हाला यश
-
विरोधी पक्ष राहुन आक्रमकपणे मुद्दे मांडू – दिनेश गुंडू राव
परिणामांमुळे निराश,चांगल्या परिस्थितीची अपेक्षा आहे.
#GoaElectionResult2022 Disappointed by the results, expected a better situation. We’ll continue to be a responsible Opposition & take up issues aggressively. The Opposition has an important role, in and outside State Assembly: Dinesh Gundu Rao, Congress pic.twitter.com/ofu2ecIuOt
— ANI (@ANI) March 10, 2022
-
गोव्याच्या जिल्हाधिका-यांची माहिती
गोव्याच्या जिल्हाधिका-यांची माहिती
Out of 19 seats in North Goa, 10 seats have been won by candidates of BJP, 6 seats have been won by Indian National Congress and one each by MGP, Revolutionary Goans Party, and an Independent candidate: Ajit Roy, North Goa collector#GoaElections pic.twitter.com/X2TICqsnjZ
— ANI (@ANI) March 10, 2022
-
-
देवेंद्र फडणवीसांनी मानले गोव्यातील जनतेचे आभार
देवेंद्र फडणवीसांनी मानले गोव्यातील जनतेचे आभार
गोव्यात आमचं पुन्हा एकदा सरकार येईल
महाराष्ट्रात सध्या अशा लोकांच्या हातात सरकार की, केव्हाही पडण्याची शक्यता
गोव्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापण करणार
संजय राऊतांनी स्वत: ला समजून सांगावं
अशी सरकार अधिककाळ टिकत नाहीत
-
भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात विजयी
गोवा – पणजी आणि तळेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात विजयी झाले आहेत. वालपोई आणि पोरीम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी देविया विश्वजित राणे विजयी झाले आहेत.
-
त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विजय
ज्याचा विजय होतो, त्याचं अभिनंदन करण्याची देशात परंपरा
शिवसेना पक्षाकडून आपचं अभिनंदन
काँग्रेस पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष होता, पण सपाटून पराभव
गोवा, उत्तराखंडात विजयाची शक्यता होती, मात्र अपेक्षेहून कमी परफॉर्मन्स
त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो, हे खरं आहे
यूपी आणि गोव्यात आम्ही आमच्या परिने लढलो, जय-पराजय अंतिम नसतो
पंजाबमध्ये मोदी आणि शाहांचा चेहरा वापरुन लढूनही यूपीसारखं यश नाही
भाजपने विजय पचवला पाहिजे,
-
अखिलेश यादव यांनी काँग्रेस सोबत युती केली असती तर चित्र वेगळं असतं : संजय राऊत
भाजपचा मोठा विजय झाला आहे. पंजाबमध्ये आपनं ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विजय मिळवलाय. राजकारणात, लोकशाहीत ज्याचा विजय होतो त्याचं अभिनंदन करण्याची परंपरा आहे. त्यामुळं ज्या ज्या राज्यात ज्यांचा विजय झालाय त्यांचं मी अभिनंदन करतो. काँग्रेस पंजाबमध्ये सत्तेत होती त्यांचा पराभव झाला. गोवा आणि उत्तराखंडमध्ये पराभूत झाले. अखिलेश यादव यांच्याकडून ज्या कामगिरीची अपेक्षा केली होती. त्या पेक्षा कमी कामगिरी दिसून आली. पंजाबमध्ये लोकांना पर्याय मिळाला आहे. दिल्लीतून एक पार्टी पंजाबमध्ये गेली. दिल्लीत केलेल्या कामाचा फायदा आपला पंजाबमध्ये झाला. पंजाबमध्ये काँग्रेसचं इलेक्शन मॅनेजमेंट चांगलं नव्हतं. भाजपच्या इलेक्शन मॅनेजमेंटचं यश आहे. गोव्यात त्यांनी ज्या नोटा वापरल्या त्या आम्ही न वापरल्यानं कमी मतं.
उत्तर प्रदेश आणि गोव्यात आम्ही लढलो, लढाई सुरु राहिल. जय पराजय ही सुरुवात आहे. शिवसेना म्हणून आम्ही जिथं लढलो ती आमची सुरुवात आहे. भविष्यात आम्ही काम करत राहू, या निकालामुळं भाजपला मोठा आनंद झाला पण त्यांनी विजय पचवायला हवा. विजय मिळालेल्या राज्यांमध्ये लोकशाही मार्गानं सूडाचं राजकारण न करता कारभार करा.
दिल्लीत संसदेचं कामकाज सुरु झाल्यावर भेट होईल. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर त्याचा परिणाम वेगळा दिसला असता. काँग्रेस पक्षाला त्यांच्या धोरणात बदल करावं लागेल. उत्तर प्रदेश आणि गोव्यात काँग्रेस सोबत लढण्याची तयारी होती, पण यश मिळाले नाही. भविष्यात कसं एकत्र काम करता येईल, हे पाहू. काँग्रेसला स्वत: च्या भूमिकेत बदल करावा लागेल. गोवा आणि उत्तराखंडमध्ये तितल्या सरकारांविरोधात असंतोष होता. तरी प्रमुख विरोधी पक्षाला का फायदा घेता आला नाही. याचं आत्मपरिक्षण करावं. विजयाचं अजीर्ण होऊ देऊ नका. आजचा विषय निकालापुरता आहे. निकाल स्वीकारयाच असतो आणि पुढं जायचं असतं.
-
भाजपच्या विजयाचा आनंद, फडणवीसांची प्रतिक्रिया
गोव्यातील भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस पणजी कार्यालयात दाखल
भाजपच्या विजयाचा आनंद, फडणवीसांची प्रतिक्रिया
-
गोव्यात भाजपला तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा, सूत्रांची माहिती
गोव्यात भाजपला तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा, सूत्रांची माहिती
-
आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी
-
ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात, केजरीवालांचे ट्वीट
गोव्यात ‘आप’ने दोन जागा जिंकल्या. कॅप्टन वेंझी आणि क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे, असे ट्विट आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले.
“AAP wins two seats in Goa. Congratulations and best wishes to Capt Venzy and Er Cruz. It’s the beginning of honest politics in Goa,” tweets AAP’s Arvind Kejriwal
(file photo) pic.twitter.com/AeYXmPXK8s
— ANI (@ANI) March 10, 2022
-
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा 14 मार्चला शपथविधी : सूत्र
14 मार्चला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शपथविधी होणार, सूत्रांची माहिती
-
डिचोलीचे अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देणार
डिचोलीचे अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देणार
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा भाजपला पाठिंबा
निकाल जाहीर होताच शेट्ये यांचा पाठिंबा जाहीर
भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
-
भाजपने राज्यपालांची भेट मागितली
भाजपने राज्यपालांची भेट मागितली
राज्यपाल पिल्लई यांच्याकडे भेटीची वेळ मागितली
सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यात भाजपच्या हालचाली
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी, साखळी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी पराभूत
-
विजयी झाल्यानंतर विश्वजीत राणे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
विजयी झाल्यानंतर भाजपचे उमेदवार विश्वजीत राणे महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
-
भाजपचे बाबुश मोन्सरात कोण आहेत?
-
शिरोडा मतदारसंघ – भाजपचे सुभाष शिरोडकर विजयी
शिरोडा मतदारसंघ – भाजपचे सुभाष शिरोडकर विजयी
-
गोवा फाॅरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई विजयी
फातार्डो मतदारसंघातून गोवा फाॅरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई विजयी
काँग्रेस आणि गोवा फाॅरवर्डची आघाडी
-
डिचोली मतदारसंघात अपक्ष चंद्रकांत शेट्ये विजयी
डिचोली मतदारसंघात अपक्ष चंद्रकांत शेट्ये विजयी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघाच्या बाजूला डिचोली मतदार संघ
-
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर पराभूत
केपेमध्ये भाजपला मोठा धक्का, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर पराभूत
बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. त्यांना प्रमोद सावंत सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यांच्या पराभवानं भाजपला मोठा धक्का बसलाय. 2019 साली पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. तेव्हा भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसमधील काही आमदार रातोरात भाजपात गेले होते. या सगळ्यात राजकीय हालचालींमध्ये कवळेकर यांची भूमिकाही महत्त्वाची होती.
-
गोव्यात पहिले चार निकाल जाहीर, तीन जागा भाजपला
गोव्यात पहिले चार निकाल जाहीर, तीन जागा भाजपला, तर काँग्रेसच्या बाजूने एक निकाल,
पणजीतून बाबूश मोन्सेरात, नावेलीतून उल्हास तुवेकर आणि सावर्डेतून गणेश गावकर विजयी
मडगावमध्ये काँग्रेसचे दिगंबर कामत 7760 मतांनी जिंकले
-
मनोहर पर्रिकरांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का
पणजी मतदारसंघातून पराभव, भाजपचे बाबुश मोन्सरात विजयी
-
आतापर्यंतच्या मतमोजणीनंतर विजय निश्चित असलेले उमेदवार
-
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार ताजी सद्यस्थिती
-
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं?
Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?
-
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा काढता पाय
मतांमध्ये पिछेहाट होत असल्याचे दिसताच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मतमोजणी केंद्रावरुन निघून गेले, केपेत आतापर्यंत काँग्रेसचे एल्टॉन डिकॉस्ता आघाडीवर
-
चौथ्या फेरीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुन्हा आघाडीवर
चौथ्या फेरीनंतर साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 605 मतांनी आघाडीवर, शिवोलीत दयानंद मांद्रेकर, मडगावात दिगंबर कामत पुढे
-
गोवा विधानसभा निवडणुकांचा पहिला निकाल हाती
गोवा विधानसभा निवडणुकांचा पहिला निकाल हाती
वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी
विश्वजित राणे हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव
-
गोव्यात मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्रीही पिछाडीवर
दुसऱ्या फेरीनंतर साखळीत धर्मेश सगलानी 417 मतांनी आघाडीवर. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुन्हा पिछाडीवर. केपेत काँग्रेसच्या एल्टॉन डिकॉस्ता यांची तब्बल 2424 मतांची आघाडी. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मागे.
-
सासष्टी विभागाच्या सात मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर
दक्षिण गोवा सासष्टी विभागाच्या सात मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर, मोठ्या प्रमाणात कॅथलिक वोट बँक
-
प्रियोळ – मगोपचे दीपक ढवलीकर आघाडीवर
प्रियोळ मतदारसंघातून महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे दीपक ढवलीकर 100 मतांनी आघाडीवर
-
पणजीमध्ये भाजप आघाडीवर, उत्पल पर्रिकरांना पिछाडी
तिसऱ्या फेरी अखेर पणजीमध्ये भाजप आघाडीवर
भाजपचे बाबुश मोन्सरात यांना 2981 मते
अपक्ष उत्पल पर्रिकर यांना 2647 मते
-
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार ताजी सद्यस्थिती
-
गोव्यात कोण किती जागांवर आघाडीवर
ताजे कल
भाजप – 19
काँग्रेस – 14
आप – 01
मगो-तृणमूल – 00
इतर – 06
-
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना हुश्श! अखेर 140 मतांनी आघाडी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखेर दिलासा
साखळी मतदारसंघातून अखेर 140 मतांनी आघाडी
काँग्रेस उमेदवार धनेश सगलानी यांना पिछाडी
-
महत्त्वाच्या चेहऱ्यांचे सुरुवातीचे कल काय सांगतात?
साखळी – मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप) पिछाडीवर
पणजी – उत्पल पर्रिकर (अपक्ष) पिछाडीवर
मडगाव – दिगंबर कामत (काँग्रेस) आघाडीवर
फातोर्डा – विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड पक्ष) आघाडीवर
काणकोण – जनार्दन भंडारी (काँग्रेस) आघाडीवर
-
दुसरी फेरी – पणजीत उत्पल पर्रिकर 342 मतांनी मागे
पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवार उत्पल परिकर पिछाडीवर
भाजपचे बाबूश मोन्सेरात दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर
बाबूश मोन्सेरात यांना 1989 मते, तर उत्पल पर्रीकर यांना 1647 मते
-
पणजीतून उत्पल पर्रिकर पिछाडीवर
-
गोव्यात कोण किती जागांवर आघाडीवर
ताजे कल
भाजप – 21
काँग्रेस – 12
आप – 00
मगो-तृणमूल – 00
इतर – 07
-
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार ताजी सद्यस्थिती
-
काणकोण मतदारसंघातून काँग्रेसचे जनार्दन भंडारी आघाडीवर
काणकोण मतदारसंघातून काँग्रेसचे जनार्दन भंडारी आघाडीवर
-
मडकईमधून मगोपचे सुदिन ढवळीकर आघाडीवर
मडकईमधून मगोपचे सुदिन ढवळीकर आघाडीवर
-
दाबोलीम मतदारसंघात काँग्रेसला आघाडी
दक्षिण गोवा दाबोलीम मतदारसंघामधून काँग्रेसचे वेरिटर फर्नांडिस आघाडीवर
-
उत्तर गोव्यात भाजप आघाडीवर
उत्तर गोव्यात भाजप आघाडीवर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई फातोरडा मतदारसंघातून आघाडीवर काँग्रेस आणि गोवा फाॅरवर्ड यांची आघाडी
-
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर
साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर
काँग्रेस उमेदवार धनेश सगलानी आघाडीवर
दक्षिण गोव्यातल्या वास्कोमधून भाजपचे दाजी साळकर आघाडीवर
-
अपक्ष उत्पल पर्रिकर पिछाडीवर
पणजी मतदारसंघातून भाजपचे बाबूश मोन्सेरा 1167 मतांनी आघाडीवर, अपक्ष उत्पल पर्रिकर पिछाडीवर
-
विधानसभा सभापती राजेश पाटणेकर पिछाडीवर
डिचोली मतदारसंघातून भाजपचे विधानसभा सभापती राजेश पाटणेकर मागे
-
गोव्यात कोण किती जागांवर आघाडीवर
ताजे कल
भाजप – 17 काँग्रेस – 18 आप – 01 मगो-तृणमूल – 04 इतर – 00
-
पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत मागे
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत पिछाडीवर
पोस्टल मतमोजणीत 436 मतांनी प्रमोद सावंत मागे
-
मतमोजणीनंतर भाजप उमेदवारांची बैठक
मतमोजणीनंतर भाजपची बैठक
भाजप मुख्यालयात उमेदवारांची बैठक बोलवली
सायंकाळी चार वाजता पणजीतील भाजप मुख्यालयात होणार बैठक
-
पोस्टल मतमोजणीत कोणकोणत्या उमेदवारांना आघाडी
पोस्टल मतमोजणीत पणजीत उत्पल पर्रीकर, साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर तर वाळपईत विश्वजीत राणे आघाडीवर
शिवोलीमधून दयानंद मांद्रेकर, पर्येमध्ये विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे, तर म्हापशात जोशुआ डिसोझा आघाडीवर
-
भाजपचे विश्वजीत राणे-पत्नी दिव्या राणे आघाडीवर
वाळपई मतदारसंघातून भाजपचे विश्वजीत राणे आघाडीवर
तर पर्रीमधून विश्वजीत राणे यांच्या पत्नी आणि भाजप उमेदवार दिव्या राणे पुढे
-
VIDEO | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक देवळात
-
उत्पल पर्रिकर पोस्टल मतदानात आघाडीवर
उत्पल पर्रिकर पोस्टल मतदानात आघाडीवर पणजीमधून उत्पल अपक्ष उमेदवार
-
मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पारसेकर आघाडीवर
मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पारसेकर आघाडीवर मांद्रे मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीचया रिंगणात पोस्टल मतदानाचा कल
-
काँग्रेसची मुसंडी, 20 जागांवर आघाडी, भाजप 16 जागांवर पुढे
गोव्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर, तर भाजपला 16 जागांवर आघाडी, इतर आणि अपक्ष चार जागांवर पुढे
-
भाजप 17, तर काँग्रेस 14 जागांसह आघाडीवर
गोव्यात भाजप 17, तर काँग्रेस 14 जागांसह आघाडीवर, इतर पक्षांना 2 जागांवर आघाडी
-
गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोघांनी खातं उघडलं
गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोघांनी खातं उघडलं
सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना एक-एक जागेवर आघाडी
-
विश्वजीत राणेंच्या व्हॉट्सअप स्टेटसवर काँग्रेस नेत्यांचा फोटो
गोव्यात भाजपच्या विश्वजीत राणेंच्या मोबाईल फोनवरील व्हॉट्सअप स्टेटसमुळे राजकीय गदारोळ
काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांचा फोटो झळकला विश्वजीत राणे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर
भाजप नेत्यांना स्पष्टीकरण देताना नाकी नऊ, विश्वजीत राणे यांचे मौन
विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा
गदारोळ वाढल्यानंतर विश्वजीत राणे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून काँग्रेस नेत्यांचा फोटो हटवला
-
10 हजार 274 बॅलेट पेपरची मतमोजणी
पोस्टल मतदान आणि बॅलेट पेपर मोजणीला सुरुवात
दोन ठिकाणी पोस्टल बॅटेल पेपरच्या मतमोजणीला 15 मिनिटे लागणार
10 हजार 274 बॅलेट पेपरची मतमोजणी
80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले होते बॅलेट पेपर
12 हजार 774 झालंय पोस्टल मतदान
-
मतमोजणीला सुरुवात, काही वेळातच निवडणुकांचा पहिला कल हाती
मतमोजणीला सुरुवात, काही वेळातच निवडणुकांचा पहिला कल हाती
-
गोव्यात एक्झिट पोलनंतर भाजपचे सूर बदलले
गोव्यात भाजप नेत्यांचे सूर बदलले, एक्झिट पोलनंतर भाजपचे बदलले सूर
निवडणुकीच्या प्रचारात 22 प्लस चा आत्मविश्वास व्यक्त करणारे भाजप नेते आता म्हणतात की सत्तास्थापनेसाठी आम्ही छोट्या पक्षांनाही बरोबर घेऊ
गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे विधान की सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांना सोबत घेऊ
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपचा नैसर्गिक मित्र पक्ष : देवेंद्र फडणवीस
सत्ता स्थापनेसाठी अपक्षांनाही सोबत घेण्याचे आश्वासन : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा भाव वधारला
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर म्हणतात आम्ही ठरणार किंग मेकर.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी युतीत निवडणूक लढवल्या.
-
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक देवळात
मतमोजणीआधी साखळीतील दत्त मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची सपत्नीक प्रार्थना
-
काँग्रेसचे राजकीय डावपेच, मतमोजणी आधी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली
काँग्रेसने मतमोजणी आधी राज्यपालांची भेट मागितली 2017 मधील पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसचे राजकीय डावपेच राज्यपालांनी अद्याप काँग्रेसला वेळ दिलेला नाही 2017 मध्ये काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले असतानाही भाजपने केली होती सत्ता स्थापन
-
पणजीमध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
Goa set for counting of votes from 8 am; Visuals from Altinho, Panaji#GoaElections2022 pic.twitter.com/RAqSBuIGWI
— ANI (@ANI) March 10, 2022
-
स्ट्राँग रुम उघडल्या, मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात
उमेदवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. पोस्टल मतपत्रिका सुरक्षा कर्मचार्यांच्या कॉरिडॉरमधून मतमोजणी हॉलमध्ये नेल्या जातील.
Goa | The strong rooms have just been opened in the presence of candidates&observers. Postal ballots will be taken to the counting halls through a dedicated corridor of security personnel. Counting for South Goa will be done at Damodar College: Collector Ruchika Katiyal pic.twitter.com/APJLOv1U6Z
— ANI (@ANI) March 10, 2022
-
Goa Election Result 2022 : गोव्यातील जनतेचा कौल कुणाला? भाजप की काँग्रेस
गोव्यातील जनतेचा कौल कुणाला? भाजप की काँग्रेस हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. गोव्यात भाजपनं पूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला होता. मात्र, एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात
सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचे दमदार आगमन झाले आगमन.जिल्ह्यातील काही भागात वादळी वारा व गडगडाटासह अचानक दमदार पाऊस पडला. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा ही कोसळल्या.उकाड्याने हैराण झालेल्यांना हवेत थंडावा झाल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला.मात्र आंबा व काजू पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळजवळ तासभर या पाऊसाने झोडपून काढले.
Published On - Mar 09,2022 3:15 PM