Alpesh Thakor
OBC youth leader
अल्पेश ठाकोर भाजपचे ओबीसी नेते आहेत. अल्पेश ठाकोर राज्यातील पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या काळात ओबीसी नेते म्हणून उदयास आले. पाटीदार आंदोलनानंतर त्यांनी 2016मध्ये ओबीसी एकता मंचाची स्थापना केली. 2017मध्ये ते काँग्रेसमध्ये आले. 2017मध्ये ते राधनपूरमधून आमदार म्हणून निवडून आले. 2019मध्ये त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले. ऑक्टोबर 2019मध्ये गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत ते राधनपूरमधून भाजपच्या तिकीटावर उभे होते. पण त्यांना पराभूत व्हावं लागलं.