Bhupendra Patel
Chief Minister
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र रजनीकांत पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. गुजरातील भाजपचे बडे नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत. 15 जुलै 1962 रोजी अहमदाबादच्या शिलाज येथे त्यांचा जन्म झाला. राजकीय वर्तुळात त्यांना प्रेमाने दादाजी म्हटलं जातं. ते पाटीदार समुदायातून येतात. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते विश्वासू असल्याचं बोललं जातं. ते व्यवसायाने इंजीनियर आहेत. गुजरात भाजपवर त्यांची मजबूत पकड आहे. गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे चेअरमन होते. त्याशिवाय 1999-2000 स्थायी समिती आणि मेमन नगर पालिकेचे अध्यक्ष होते. 2008 ते 2010 पर्यंत ते एएमसीच्या स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. ते पाटीदार समाजाच्या सरदारधाम आणि विश्व उमिया फाऊंडेनशचेही ट्रस्टी आहेत. 2017मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती.