C R PATIL
State President
सीआर पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपाचे बडे नेते म्हणून ते परिचित आहेत. पाटील यांचा जन्म 16 मार्च 1955 रोजी महाराष्ट्रातील पिंपरीमध्ये झाला. ते सध्या गुजरातच्या नवसारीतील खासदार आहेत. 2009पासून सलग तिसऱ्यांदा ते नवसारीतून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण गुजरातमध्ये झालं. तर सुरतमधून त्यांनी आयटीआय केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते खास विश्वासू आहेत. टेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे.