Jagdish Thakor
Gujarat Pradesh Congress President
जगदीश ठाकोर गुजरात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जगदीश ठाकोर हे उत्तर गुजरातमधील ठाकोर समुदायातून येतात. ते विधानसभेवर दोनदा विजयी झालेले आहेत. 2002 आणि 2007मध्ये सलग दुसऱ्यांदा ते दहेगाम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. जगदीश ठाकोर 2002 ते 2007 आणि 2007 ते 2009 पर्यंत आमदार राहिले आहेत. 2009मध्ये लोकसभा निवडणुकीत जगदीश ठाकोर यांनी पाटन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अशा प्रकारे जगदीश ठाकोर 2009 ते 2014 पर्यंत खासदार राहिले आहेत.