Mansukh Mandaviya
Union Health Minister
मनसुख मंडाविया केंद्रात विद्यमान आरोग्य मंत्री आहेत. ते गुजरातमधील बडे नेते आहेत. गुजरातच्या राजकारणात ते सतत सक्रिय असतात. भावनगर जनपदाच्या पलीताना तालुक्यातील हनोल नावाच्या गावात 1 जुलै 1972 रोजी त्यांचा जन्म झाला. मनसुख मंडाविया यांचे वडील लक्ष्मणभाई मंडाविया हे शेतकरी आहेत. मंडाविया हे पाटीदार समाजातील लेऊआ पटेल समुदायातून येतात. ते 2012मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर गेले. त्यानंतर 2018मध्ये पुन्हा राज्यसभेवर गेले. गुजरातच्या सौराष्ट्रातून येणारे मंडाविया हा नरेंद्र मोदी सरकारचा महत्त्वाचा चेहरा आहे. 5 जुलै 2016मध्ये त्यांना रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज आणि रसायन राज्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांनी राज्यशास्त्रातून एमए केलं आहे. ते आरएसएसच्या विद्यार्थी शाखा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर ते भाजयुमोत दाखल झाले. 2002मध्ये सर्वात कमी वयात आमदार होण्याचा रेकॉर्डही त्यांनी केला आहे.