Parshottam Rupala
Union Minister
पुरुषोत्तम रुपाला गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते केंद्रातील मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रीपद सांभाळत आहेत. गुजरातच्या पाटीदार वा पटेल समुदायातून येणाऱ्या रुपाला यांचा जन्म गुजरातच्या अमरेली ईश्वरिया गावात झाला. रुपाला पहिल्यांदा 1991मध्ये अमरेली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. रुपाला गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. 2008मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं.