Jairam Thakur
जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील भाजपच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत, ते 2017 मध्ये मंडी जिल्ह्यातील सिराज नावाच्या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते आणि मुख्यमंत्री म्हणून राहिले होते, त्यांचा जन्म 6 जानेवारी 1965 रोजी थुनाग तहसीलच्या तांगी येथे झाला होता. विद्यार्थीदशेतच त्यांनी अभाविपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जयराम ठाकूर यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांच्या कुटुंबात तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वडील शेती व मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. जयराम तीन भावांमध्ये सर्वात लहान आहेत. राजकारणात त्यांची एंट्री 1993 मध्ये झाली, 1998 मध्ये ते पहिल्यांदाच विजयी झाले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि एकापाठोपाठ एक पाच वेळा जिंकून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली. जयराम ठाकूर हे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 1993 मध्ये जयराम ठाकूर यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नव्हते. तरीही त्यांनी निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला, त्यांची कामगिरी पाहता 1998 मध्ये त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आणि यावेळी ते विजयी झाले.