Suresh Bhardwaj
सुरेश भारद्वाज हिमाचल प्रदेशच्या राजकारणात अतिशय सक्रीय असतात. ते भाजपच्या तिकिटावर शिमला मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत आणि जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये कायदा आणि शिक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांचा जन्म शिमलामधील शारधानन्द या ठिकाणी 15 मार्च 1952 रोजी झाला. शिमल्यातच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनापासून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत. संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर 2003 ते 2006 पर्यंत ते हिमाचल भाजपचे अध्यक्ष होते. यापूर्वी ते राज्यसभेवरही निवडून आले होते.