कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सर्वात मोठा झटका, घडामोडी कुठपर्यंत जाणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एका प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सर्वात मोठा झटका, घडामोडी कुठपर्यंत जाणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 11:39 PM

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) येत्या 10 मे ला मतदान होणार आहे. तर 13 मे ला निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. या प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैऱ्या झडत आहेत. असं असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना झटका दिला आहे. कारण त्यांच्या चिरंजीवांना निवडूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

खरंतर निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन स्टार प्रचारकांना दणका दिला आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे आणि भाजप उमेदवार बसन गौड पाटील यांचा समावेश आहे.

नेमके वादग्रस्त वक्तव्ये काय?

प्रियांक खर्गे यांचे वक्तव्य – ‘पंतप्रधान यांच्यासारखा नालायक व्यक्ती असेल तर घर कसं चालेल?’

हे सुद्धा वाचा

पाटील यांचे वक्तव्य – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी नाग आहेत तर सोनिया गांधी या विषकन्या आहेत’

स्पष्टीकरणासाठी उद्या संध्याकाळपर्यंतची मुदत

केद्रीय निवडणूक आयोगाने दोघांना नोटीस जारी केली आहे. तसेच आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवावे लागणार आहेत. त्यांना आता आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देणं जरुरीचं असणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाने उद्या (गुरुवारी) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोघांनाही निवडणूक आयोगासमोर उत्तर देण्यासाठी वेळ दिली आहे.

संजय राऊत यांचा बेळगावात मोठा दावा

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात गेले आहेत. संजय राऊत यांची आज बेळगावात सभाही झाली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद बद्दल मोठा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

“शिवसेना नसती तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. बाबरी पाडणारे शिवसैनिक होते. शेपूट टाकून पळणारे भाजपावाले होते. बाबरी यांनी पाडलीचं नाही आणि आम्हाला शिकवतात”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठी विरोधात सभा घेणार आहेत. थू तुमच्या जिंदगानीवर. बेळगाववरील भगवा उतरवला तेव्हा अभय पाटील कुठे होता? कोरोना काळात कोडुसकर येथे उतरले होते. आमच्या पराभवासाठी मुख्यमंत्री येथे येत आहेत. मराठी माणसाच्या पराभवासाठी शिंदे येतात हे निर्लज्जपणाचा कळस आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.