Karnataka Election Results 2023, Winner Updates LIVE : कर्नाटकातील विजयानंतर बोलताना राहुल गांधी यांनी मोदींना घेरले

| Updated on: May 14, 2023 | 7:15 AM

Karnataka Assembly Election Results 2023 Counting and Winner Live Updates in Marathi : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचे कल हाती येतील.

Karnataka Election Results 2023, Winner Updates LIVE : कर्नाटकातील विजयानंतर बोलताना राहुल गांधी यांनी मोदींना घेरले
Karnataka Assembly Election Results 2023 Image Credit source: tv9 marathi

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. एकूण 224 मतदारसंघांचे निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे होते. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजप ही सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास भाजप दक्षिण भारतातून नामशेष होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील एकमेवर राज्यात सत्ता टिकवून ठेवणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

राज्यात 10 मे रोजी मतदान झालं होतं. राज्यात मतदानासाठी 58,545 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत उभ्या असलेल्या 2,615 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 5.31 कोटी मतदार करणार आहेत. राज्यात 73.19 टक्के मतदान झालं. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात विधानसभेच्या 224 जागा आहेत. तसेच बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 May 2023 11:47 PM (IST)

    चारे देवेंद्र भाऊ खोटं बोल आणि रेटून बोल असं कर्नाटक निकालावर बोलले; सुषमा अंधारे यांची टीका

    मुंबईः

    – कुठला वक्ता चुकतो आणि आशिष जैसवाल यांना कळवतो.  त्यानंतर कुठले कलमं लावायाचे.  यासाठी पोलीस भाषणं व्हीडीओ शूट करतात

    – बिचारे देवेंद्र भाऊ खोटं बोल आणि रेटून बोल असं कर्नाटक निकालावर बोलले

    – आशिष जैसवाल यांना अनेक वेळा संधी दिली, खनिजकर्म महामंडळ दिलं, जिथे खोऱ्याने पैसे ओढले जातात

    – रामटेक मतदारसंघातील लोकांना प्रदुषित पाणी देणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळ खेळणं

    – फडणवीस आणि आशिष जैसवाल मित्र

    – अनेक गैरप्रकार असताना फडणवीस यांनी आशिष जैसवाल यांना सांभाळले

    – ‘आशिष जैसवाल यांनी वाळुघाट आरक्षित करुन घेतले आणि स्वताजवळ ठेवले’

    – किरीट सोमय्या यांना आम्ही शिंदे गटाच्या 40 आमदारांचे प्रकरणं दाखवत राहतो, पण ते गप्प आहे

  • 13 May 2023 11:33 PM (IST)

    कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष थेट कश्मीरमध्ये ; सांगली आणि मिरजेतल्या नागरिकांकडून जल्लोष

    सांगली:
    कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष थेट कश्मीरमध्ये
    कर्नाटकाच्या विजयाचा जल्लोष थेट कश्मीरमध्येही साजरा झाला
    सांगली आणि मिरजेतल्या नागरिकांकडून जल्लोष
    कश्मीर इथल्या पहेलगाम या ठिकाणी दौऱ्यावर असलेल्या सांगली व मिरज शहरासह जिल्ह्यातल्या डॉक्टर व केमिस्ट व्यापाऱ्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला
    फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकाला लाडू भरवून कर्नाटकमधल्या काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष
    या जल्लोषामध्ये कश्मीरच्या नागरिकांनी यावेळी सहभाग घेतला होता.
  • 13 May 2023 11:25 PM (IST)

    एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी विजयी

    धारवाड:

    एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांनी धारवाडची लढाई जिंकली

    जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा हत्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या कुलकर्णी यांना न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी

    या कारणामुळे कुलकर्णी यांना मतदारसंघात प्रचारासाठी जाता आले नाही.

    पत्नी शिवलिला, तीन मुले व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुलकर्णी यांना निवडून आणले

    कुलकर्णी यांचा विजय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला

  • 13 May 2023 11:19 PM (IST)

    भाईंदर पूर्व स्थित नवघर पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक

    भाईंदर :

    भाईंदर पूर्व स्थित नवघर पोलीस ठाणेचे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक

    आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत,

    साई सरोवर बिल्डींग, आरएमपी पार्क, काशीनाथ मंदिर येथे राहणारे परमार कुटुंबीय बुधवारी लग्नानिमित्त बाहेर गेले होते.

    घरी कुणी नसल्याचे पाहून तिजोरी फोडून ऐवज लंपास

  • 13 May 2023 08:44 PM (IST)

    कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर बारामतीमध्ये जल्लोष, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

    कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर बारामतीमध्ये जल्लोष

    फटाक्यांची आतिषबाजी करत केला आनंदोत्सव साजरा

    राहुल गांधी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा

  • 13 May 2023 08:31 PM (IST)

    सांगलीतील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

    मिरज शहरासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

    सुमारे अर्धा तास पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली

    वादळी वाऱ्यामुळे मिरज शहरामध्ये काही काळ विद्यूत पुरवठा खंडित

  • 13 May 2023 08:16 PM (IST)

    कर्नाटकात काँग्रेसच्या जल्लोषात दुचाकी पेटली, सुदैवाने जीवितहानी नाही

    कर्नाटकात काँग्रेसच्या जल्लोषात दुचाकी पेटली

    सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

    फटाक्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीने घेतला पेट

  • 13 May 2023 07:23 PM (IST)

    नागपुरात तापमानाचा पारा वाढला

    आज तापमान 42.7°c वर म्हणजेच 43 अंशावर

    आता खऱ्या अर्थाने कडकडच्या उन्हाला आणि गर्मीला सुरुवात

    घराच्या बाहेर निघताना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत

    प्रत्येक जण तोंडाला कपडा बांधून असल्याचे चित्र पाहायला मिळते

  • 13 May 2023 06:55 PM (IST)

    पिंपरी चिंचवड : बस-कारचा अपघात

    बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएल बस-खाजगी कारचा अपघात

    पिंपळे गुरव येथे बससह चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले

    अपघातात दोन जण जखमी, जखमींना रुग्णालयात दाखल केले

  • 13 May 2023 06:39 PM (IST)

    पिंपरी चिंचवड : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालास अटक

    भोजपुरी फिल्म अभिनेत्री आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना ओढले जाळ्यात

    वाकडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवले

    पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन तरुणींची केली सुटका

  • 13 May 2023 06:23 PM (IST)

    अहमदनगर : फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट

    जामखेडमधील स्फोटात दोन जणांचा होरपळून मृत्यू

    जहीर अब्दुल सत्तार आणि ज्ञानेश्वर भोंडवे यांचा मृत्यू

    पूजा गाडे या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

    आग आटोक्यात आल्याची पोलीस प्रशासनाची माहिती

  • 13 May 2023 06:08 PM (IST)

    इंदापूर : कर्नाटकात काँग्रेसची सरशी

    इंदापुरात पेढे भरवत केला आनंदोत्सव साजरा

    कर्नाटक विधानसभेत काँग्रेसची एकहाती सत्ता

    काँग्रेस कार्यकर्त्यांची पुणे-सोलापूर महामार्गावर आतषबाजी

    राहुल गांधी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा

  • 13 May 2023 05:56 PM (IST)

    भाजपला लोकसभा निवडणुकीत 100 जागा पण जिंकणे अवघड

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हल्ला

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तिखट प्रतिक्रिया

    कर्नाटकच्या जनतेचे केले अभिनंदन

    विरोधकांच्या एकजुटीने चमत्कार घडण्याचा व्यक्त केला आशावाद

  • 13 May 2023 05:49 PM (IST)

    बजरंग बलीने भाजपवर गदा फिरवली

    कर्नाटक हे देशातील अत्यंत प्रगतीशील राज्य आहे

    या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल दिला

    राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी हाणला सणसणीत टोला

  • 13 May 2023 05:37 PM (IST)

    हे भारत जोडो यात्रेचे यश आहे

    आम्ही 2024 साठी सर्व जण एकत्र आहोत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा जिथे गेले तिथे पराभव

    राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा का असू शकत नाही

    संजय राऊत यांची सणसणीत टोलेबाजी

  • 13 May 2023 05:35 PM (IST)

    2024 साली केंद्रात भाजपची सत्ता नसेल

    देवेंद्र फडणवीस यांना पैजवर सांगतो

    संजय राऊत यांनी दिले आव्हान

    ढेकणाच्या नादाला लागून हिरा भंगला

    राऊत यांनी साधला निशाणा

  • 13 May 2023 05:34 PM (IST)

    2024 च्या लोकसभेचा मार्ग कर्नाटकच्या विजयातून

    भाजपच्या हातून कर्नाटक ही गेले

    भाजपची आता किती राज्यात सत्ता आहे

    ईडी,सीबीआय यांना काँग्रेस पक्ष पुरुन उरला

    कर्नाटकची जनता कौतुकास पात्र आहे

    संजय राऊत यांनी तोफ डागली

  • 13 May 2023 05:32 PM (IST)

    भाजपचा पराभवानंतर जनता दंगली नव्हे तर आनंद साजरा करत आहे

    हुकूमशाही चालणार नाही, एकाधिकार शाही चालणार नाही

    संजय राऊत यांची भाजपवर सणसणीत टीका

    कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरुन वाद होतील असे वाटत नाही

  • 13 May 2023 05:26 PM (IST)

    Karnataka Election Results : पंतप्रधानांनी दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला जनतेने दिलेला कौल केला मान्य

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेसचे केले अभिनंदन

    लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात काँग्रेस यशस्वी होईल, असा आशावाद केला व्यक्त

  • 13 May 2023 05:20 PM (IST)

    Karnataka Election Results : कर्नाटकच्या जनतेचे मनापासून अभिनंदन

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्या शुभेच्छा

    अंहकार, एजेंसी पॉलिटिक्सला लोकांनी तगडे आव्हान दिले

    छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील निवडणुकीत भाजपला धक्का बसेल-बॅनर्जी

  • 13 May 2023 05:12 PM (IST)

    Karnataka Election Results : खरेदी-विक्रीच्या धोरणाला दिली मुठमाती

    Karnataka Election Results : खरेदी-विक्रीच्या धोरणाला दिली मुठमाती

    कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपने केला खोक्यांचा वापर

    राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

    या राज्यातील सरकारे केंद्रीय यंत्रणेच्या वापर करुन पाडण्यात आली

    लोकांना सुडाचं राजकारण आवडत नाही, हेच कर्नाटकच्या निकालावरुन स्पष्ट – आव्हाड

  • 13 May 2023 05:07 PM (IST)

    मांजरी खुर्द ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी मतदान

    यापूर्वी तीन वेळा ही ग्रामपंचायत झाली होती बिनविरोध

    राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये असणार चुरस

    ही ग्रामपंचायत आधी अनेक वर्ष होती राष्ट्रवादी काँग्रेसकडे

  • 13 May 2023 05:06 PM (IST)

    Karanataka Election Results : चामराजनगरची जागा काँग्रेसने राखली

    काँग्रेसने चौथ्यांदा राखली जागा

    चामराजनगर मतदारसंघात काँग्रेसचे पुट्टारंगा शेट्टी जिंकले

    भाजप मंत्री के. व्ही सोमन्ना यांचा पराभव

  • 13 May 2023 05:05 PM (IST)

    युपीमध्ये झालेल्या निवडणुकीत राहुल गांधींचे प्रेम का ओतू आलं नाही – गिरीश महाजन

    यूपीमध्ये आजपर्यंत नसेल झाले, एवढी हार त्या ठिकाणी काँग्रेसची झाली आहे

    राहुल गांधींना बऱ्याच वर्षानंतर हा विजय मिळाला आहे, त्यामुळे असे वक्तव्य करतायत

  • 13 May 2023 05:02 PM (IST)

    महाराष्ट्रातील लोकांना पण बदल हवा

    शरद पवार यांची महत्वाची प्रतिक्रिया

    मविआ एकत्र लढल्यास राज्यात नक्कीच बदल

    तिघांनी एकत्र तर यावंच, पण इतर समविचारी पक्षांनी एकत्र यावं

  • 13 May 2023 04:59 PM (IST)

    Karanataka Election Results : काँग्रेस 103 जागांवर विजयी

    काँग्रेस पक्ष 33 जागांवर आघाडीवर

    कर्नाटक निवडणुकीची मतगणना सुरुच

    भाजप आतापर्यंत 50 जागांवर विजयी

    भाजपची 14 जागांवर आघाडी

  • 13 May 2023 04:56 PM (IST)

    खडसे साहेब आधी तुम्ही मुक्ताईनगर पुरते बघा – गिरीश महाजन

    एक मार्केट कमिटी तुम्ही जितली तर तुम्ही पोकलँडवर मिरवणूक काढता

    एक मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटी जिंकली आणि पोकलँड वर चढून नाचून राहिलाय

    मला तर खडसेंची कमालच वाटली

    खडसे साहेब जिल्ह्यात तुमचं काहीच राहिलेलं नाही

    एक मार्केट कमिटी घेतली तर त्यांना असं वाटते की पुरा महाराष्ट्रात जितला…

    खडसे साहेब तब्येतीला मानेल तेवढेच करा

    गिरीश महाजनांचा खडसेंना सल्ला

  • 13 May 2023 04:55 PM (IST)

    कर्नाटकच्या निवडणुकीसाठी गिरीश महाजन जिल्ह्याचे नेते गेले होते – एकनाथ खडसे

    गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं

    आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही हे जाऊनही होत्या

    त्या भाजपच्या जागा त्यांना टिकवता आल्या नाही

    कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही

    एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जाहिरी टीका

    कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रात जर आजही निवडणुका झाल्या

    तर भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही

    आणि विरोधी पक्षाचेच सरकार महाराष्ट्रात येईल 100%

  • 13 May 2023 04:50 PM (IST)

    दक्षिणात्य राज्यात दर पाच वर्षाला कौल देतात, त्याच पद्धतीने यंदा झाले – सुरेश धस

    ज्या ठिकाणी रोड शो झाले त्या ठिकाणी आम्हाला चांगला निकाल मिळाला

    कर्नाटक सीमा भागातील बिदर जिल्ह्यात सहापैकी चार जागा भाजपच्या निवडून आल्या

    थोडासा भाजपला कर्नाटकमधून विरोध झाला आहे

    काही समाज कंटक आमच्या विरोधात गेले आहेत, त्यामुळे हे चित्र दिसत आहे

    कुठल्याही निवडणुकांचा निकाल लागल्यावर इथं धोरण ठरविले जाते

    काँग्रेस आणि जेडीएस ने कर्नाटकात संयुक्त सरकार बनविले होते

    आजचा निकाल लोकसभा निवडणुकीला लागू होणार नाही

    राजकारणात हार जित सुरू असते, आमच्या कडून विजयाच्या सतत अपेक्षा होत्या

    एखाद्या राज्यात घोडदौड थांबली असेल याचा अर्थ परिणाम करणारा नाही

    भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे

    कर्नाटकमधील कौल आम्हाला मान्य आहे

    काही तरी चूक झालीच आहे त्यामुळे भाजपला जागा कमी आल्या

  • 13 May 2023 04:40 PM (IST)

    आम्ही निवडणूक हरलो म्हणून संजय राऊत तोंड सुख घेतात – गिरीश महाजन

    बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत गिरीश महाजन यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    दुसऱ्याला मुलगा झाला म्हणून संजय राऊत पेढे वाटतात मात्र स्वतः वांजोटे आहेत

    म्हणून संजय राऊत यांनी तिकडे लक्ष द्यावं

    संजय राऊत यांनी आमच्या गदा पेक्षा त्यांच्या धनुष्यबाणाकडे बघावं

    धनुष्यबाण आमदार खासदार कोणीच त्यांच्याकडे राहिले नाही, म्हणून तुमचं काय आधी ते दाखवावं

    महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट कुठे आहे हे आधी संजय राऊत यांनी बघावं

  • 13 May 2023 04:35 PM (IST)

    कर्नाटकमध्ये काँग्रेसने पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळवलं आहे – गिरीश महाजन

    आम्हाला अपेक्षा होती त्या पद्धतीनं काम झालेलं नाही

    आम्ही कमी पडलो, का कमी पडलो याचा नक्की शोध घेऊ

    इतक्या कमी जागा आपल्या येतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती

    या साऱ्या बाबींचं आत्मपरीक्षण करू, कारणमीमांसा करू

  • 13 May 2023 04:20 PM (IST)

    संजय राऊताचं खोचक ट्विट

    बजरंगबली काँग्रेससोबत आणि बजरंग दल मोदीसोबत ट्विटमधून टोला

    मतमोजणीच्या आकडेवारीचा फोटो ट्विट करत टोला

  • 13 May 2023 04:19 PM (IST)

    विकासाच्या मुद्द्यावर भाजप सपशेल फेल ठरले – अशोक चव्हाण

    यामुळं त्यांनी देवदेवतांचे‌ मुद्दे पुढे आणले
    काँग्रेसनं लोक कल्याणकारी योजनांचा अवलंब केलाय
    त्याला प्रतिसाद जनतेनं दिला आहे
    डबल इंजिन रूळावरून घसरलेलं आहे

    महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण

    तिन्हीही पक्ष व्यवस्थितपणे विचारविनमय करून लढले तर यश मिळेल

    बजरंग बली , आरएसएस पूरेपुर प्रचाराचा उपयोग झाला ना

    बजरंग बली की जय एवढचं भाजपानं सांगितलं

    महाराष्ट्र एकिकरण समितीला कमी यश

    काँग्रेसचे अनेक महत्वाचे निर्णय होते

    महिलांची मतदानांची टक्केवारी जास्त झाल्याचं पहायला मिळतं

    राहुल गांधीचा खासदार की रद्द करणं लोकांना आवडलं नाही

    आकसं ठेवून लोकांवर कारवाई करणं आवडलेलं नाही

    सामान्य माणसाला हे पटलेलं नाही

    भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी सर्वकडे फिरले

    राज्यातील नेत्वृव कमी पडतं तेव्हा केद्राला पहिलं लागतं

    माणसाला रिझल्ट मिळत असतील पाहण्याची गरज नसते

  • 13 May 2023 04:17 PM (IST)

    आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना

    आमदारांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे दिल्लीच्या दिशेने

    वैयक्तिक कारणासाठी दिल्लीला गेल्याची माहिती

  • 13 May 2023 04:16 PM (IST)

    कर्नाटकात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही – देवेंद्र फडणवीस

    1985 पासून कुठलीही सरकार रिपीट होत नाही

    2018 मध्ये 106 जागा आल्या होत्या आमच्याकडे 36 टक्के मत होती आणि 0.4 टक्के आमची कमी झाली

    आमच्या 40 जागा कमी झालेल्या आहेत

    जेडीएसला 18 टक्के मत होती

    हि पाच टक्के जेडीएसकडे ट्रासन्फर झालेली आहे

    भाजपची मतं कमी झालेली आहे

    काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहतोय

    त्यांना वाटतं देशचं जिंकले आहेत

    त्यांनी इतर निवडणुकांचे निकाल बघितले पाहिजे

    आजचं उत्तरप्रदेश लोकल बॉडीचे निकाल आलेले आहेत

    उत्तर प्रदेशात वन साईटेड निवडून आलेली आहे

    जे उत्तर प्रदेश जिंकतात ते देश

    बेगानी शादी मै अब्दुला दिवाना पाहिला मिळतात

    ज्यांच्या पक्षाच्या जागा नाही

    असे अनेक लोक तिथे नाचतात

    कर्नाटक निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रात नाही

    2024 देशात आणि महाराष्ट्रात आम्ही जिंकू

    पवारसाहेबांनी तिथे जागा लढवल्या तिथे एकही जागा जिंकता आली नाही

    पवार साहेबांचा पँक करून परत पाठवल्या

    ज्यांना जग पिवळं दिसत त्यांच्याबद्दल काय बोलणार

    मुगेरीलाल के हसीन सपने पुरे नही होगे

  • 13 May 2023 04:12 PM (IST)

    राहुल गांधी जोडो की तोडो यात्रा सुरू होती, तेव्हा तीन राज्यात विजय मिळवलाय – शरद पवार

    एखाद्या राज्यावर अनूमान काढणं म्हणजे स्वतःच पाठ थोपटून घेण्यासारखे आहे

    लोकांनी कोमात गेलेलं सरकार पाहिलं आहे

    आमचं सरकार जोमात काम करतंय

    येणाऱ्या निवडणुकीत काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता उभी राहिल

    आम्ही अजून जोमानं काम करू

    येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका ताकदीने लढवू अणि जिंकू

    पराभव कोणाचा विजय कोणाचा

    दुसऱ्याचं घर जळताना आपलं घर जळतंय ते विझवायचं सोडून दुसऱ्याचं बघायच

    असुरी आनंद घेणारी काही लोकं आहेत

    बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना

    महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे

  • 13 May 2023 04:10 PM (IST)

    सर्वसामान्य माणसाचं सरकार या राज्यात आहे – एकनाथ शिंदे

    लोकहिताचे निर्णय घेतले

    अडीच वर्ष प्रकल्प बंदहोते

    सर्वसामान्य माणसांना शासनाच्या योजना लाभ मिळवण्यासाठी त्यासाठी लागणायी कागदपत्रे खेटे मारायला लागू नये

    यासाठी हा उपक्रम राबवलाय

    सातारा जिल्ह्यात साडेचार लाख लोकांची नोंदणी झाली

    एकाच छताखाली लाभ मिळणार

    यामध्ये 4 ते 5 हजार जणांना नोकऱ्या मिळतील

    यामध्ये भाजपा आमचा मित्रपक्ष आहे

    जनमताचा आदर करणारे आम्ही लोक आहोत

    यामध्ये मी एवढंच सांगेन एखाद्या राज्याच्या निकालावर अनुमान बांधू शकत नाही

  • 13 May 2023 04:08 PM (IST)

    ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची 17 तारखेला मुंबईत बैठक

    शिवसेनाभवनात होणार दुपारी 12 वाजता बैठक

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

  • 13 May 2023 03:06 PM (IST)

    कर्नाटक विजयानंतर ठाण्यात काँग्रेस कडून जल्लोष सुरु..

    कर्नाटक विजयानंतर ठाण्यात काँग्रेस कडून जल्लोष सुरु..

    काँग्रेस चे ठाणे जिल्हाधिकारी अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि पदाधिकारी ठाणे काँग्रेस ऑफिस येथे मोठ्या संख्येने उपस्थित..

    तर काँग्रेस पदाधिकारी यांच्या हातात हनुमानाची गधा

    हनुमानाचा गधा घेऊन भाजप ने केला होता प्रचार

    ढोल ताशे वाजवत पेढे वाटतं करत आहेत जल्लोष साजरा..

  • 13 May 2023 03:00 PM (IST)

    शहाजीबापू तुमच्या कवितेचा आधार हा संजय राऊतांना घ्यावा लागतो – चंद्रकांत पाटील

    शहाजीबापू तुमच्या कवितेचा आधार हा संजय राऊतांना घ्यावा लागतो

    त्यांनी तुमचा आधार घेऊन एक लिहीलं होत

    मात्र त्यांना माहिती.नाही की कोर्टानं अधिकार अध्यक्ष नार्वेकरांना दिला आहे

    संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेत

    त्यांना काही कळतंच नाहीत

  • 13 May 2023 02:53 PM (IST)

    कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला गरीब जनता होती आणि एका बाजूला ताकतवर होते – राहूल गांधी

    कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला गरीब जनता होती आणि एका बाजूला ताकतवर होते

    आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो , आम्ही द्वेषाने राजकारण करत लढाई लढलो नाही

    कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे प्रेमाची दुकान खोलली आहेत

    आम्ही कर्नाटकच्या जनतेला जे वादे केले होते ते आम्ही पूर्ण करणार आहोत

  • 13 May 2023 02:47 PM (IST)

    हिंमत असल्यास अमित शहांनी कर्नाटकात दंगे करावेत – संजय राऊत

    मोदी शहाचं जनतेचं ऐकलं नाही

    विजयाचा कंदील राहूल गांधीच्या खांद्यावर

  • 13 May 2023 02:41 PM (IST)

    कर्नाटकमधील कार्यकर्ते आणि जनतेचे आभार, हा सगळ्यांचा विजय आहे – राहूल गांधी

    कर्नाटकमधील कार्यकर्ते आणि जनतेचे आभार

    सामान्य जनतेचं भाजपला हरवलं

    हा सगळ्यांचा विजय आहे

    कर्नाटकमधील जनतेचे आभार मानतो

  • 13 May 2023 02:32 PM (IST)

    कर्नाटक निवडणूक निकालावर येडियुरप्पा यांची प्रतिक्रिया

    कर्नाटक निवडणूक निकालावर येडियुरप्पा यांची प्रतिक्रिया भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा म्हणाले, “लोकांच्या मतदानाच्या हक्काचा आदर करा. विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कार्यकर्त्यांसोबत बसून जिथे चूक झाली तिथे विचारमंथन करू. भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले आहे. त्यांचे आभार. सार्वजनिक.”

  • 13 May 2023 02:30 PM (IST)

    विजयी रॅली दरम्यान भाजपं आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

    विजयी रॅली दरम्यान भाजपं आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

    भाजपं चे विजयी उमेदवार अभय पाटील यांच्या रॅली दरम्यान घडला प्रकार

    दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठी चार्ज

    अभय पाटील यांच्या विजयी रॅली वेळी भाजपं कार्यकर्त्यानी दिल्या जय श्रीराम च्या घोषणा

    काँग्रेस उमेदवार समर्थका कडून अल्ला हू अकबर ने प्रत्युत्तर

    पोलिसांच्या हस्तक्षेपा नंतर वाद निवळला

  • 13 May 2023 02:29 PM (IST)

    बाळासाहेब थोरातांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष…

    बाळासाहेब थोरातांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष… कर्नाटक विजयाचा संगमनेरात जल्लोष… पेढे वाटून फुगडी खेळत केला कर्नाटकचा विजय साजरा… भाजपला चपराक तर काँग्रेसचा भविष्यकाळ उज्वल… माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया…

    काँग्रेसला प्रचंड मोठा विजय मिळाला… भाजपच्या द्वेषाच्या कार्यपद्धतीला जनतेने नाकारले… विजयाचे श्रेय राहुल गांधींच्या पदयात्रेला… पदयात्रेनंतर हिमाचल आणि कर्नाटकमध्ये विजय मिळाला… देशातील वातावरण बदलण्यात राहुल गांधी यशस्वी झाले ही वस्तुस्थिती… भारत जोडो यात्रा यशस्वी झाली हा संदेश देणारा कर्नाटकचा विजय…

    काँग्रेस कधीच संपू शकत नाही… काँग्रेस केवळ पक्ष नाही तर विचार… सर्वांना बरोबर घेऊन जाणार विचार म्हणजे काँग्रेस… स्वायत्त संस्थावर भाजपचा दबाव… भाजपची कार्यपद्धती पाहून जनतेला काँग्रेसचा विचारच महत्वाचा वाटतोय… पुढच्या काळात देश वाचवण्याचे आणि घडवण्याचे काम काँग्रेसच करणार…

    पक्ष आणि तत्वज्ञान या घटनेने दिलेल्या गोष्टी… द्वेषाचे, दहशतीचे आणि दबावाचे राजकारण भाजपने थांबवावे… कर्नाटक विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचा भाजपला सल्ला…

  • 13 May 2023 02:27 PM (IST)

    बाबासाहेब पाटील काँग्रेस 76913 विजयी

    कित्तूर बेळगाव

    बाबासाहेब पाटील काँग्रेस 76913 विजयी

    महांतेश दोडगौडर bjp 73523

  • 13 May 2023 01:51 PM (IST)

    महाराष्ट्रात बदल होणार- शरद पवार

    कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही बदल होणार -पवार

    राज्यातील चित्र बदललेले आहे, राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल

    राज्यात आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार

  • 13 May 2023 01:45 PM (IST)

    फोडाफोडीचे राजकारण होणार नाही- पवार

    कर्नाटकात फोडाफोडीचे राजकारण होणार नाही, याची काळजी जनतेने घेतले

    कर्नाटकात जनतेने काँग्रेसला भरभरुन जागा दिल्या

    भाजपला फोडाफोडीचे राजकारण करण्याची संधी नाही

  • 13 May 2023 01:40 PM (IST)

    Karnataka Election Results : 2024 मध्ये बदल होणार

    कर्नाटकच्या निवडणूक निकालातून २०२४ मधील बदलाची नांदी- शरद पवार

    कर्नाटकच्या जनतेने केलेल्या बदलाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो

    आगामी निवडणुकीचे चित्र कर्नाटकने दाखवले

  • 13 May 2023 01:38 PM (IST)

    Karnataka Election Results : मोदी, शहा यांनी सभा घेऊन भाजपचा पराभव

    मोदी, शहा यांनी सभा घेऊनही भाजपचा पराभव झाला- शरद पवार

    निपाणीत विजयाची खात्री नाही, पण प्रतिसाद चांगला

    विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन

  • 13 May 2023 01:30 PM (IST)

    निपाणी मतदारसंघातून भाजप च्या शशिकला जोल्ले विजयी

    निपाणी मतदारसंघातून भाजप च्या शशिकला जोल्ले विजयी

    राष्ट्रवादी च्या उत्तम पाटील यांचा केला परभव

    आयत्या वेळी राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवून ही उत्तम पाटील यांची माजी मंत्री जोल्ले यांना कडवी झुंझ

    काँग्रेस चे काका पाटील तिसऱ्या स्थानी

  • 13 May 2023 01:29 PM (IST)

    निपाणी मतदारसंघातून भाजप च्या शशिकला जोल्ले विजयी

    निपाणी मतदारसंघातून भाजप च्या शशिकला जोल्ले विजयी

    राष्ट्रवादी च्या उत्तम पाटील यांचा केला परभव

    आयत्या वेळी राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवून ही उत्तम पाटील यांची माजी मंत्री जोल्ले यांना कडवी झुंझ

    काँग्रेस चे काका पाटील तिसऱ्या स्थानी

  • 13 May 2023 01:28 PM (IST)

    बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी बंधुचा दबदबा

    बेळगाव

    बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी बंधुचा दबदबा

    जारकीहोळी ब्रदर्स पुन्हा एकदा विजयी

    भाजप कडून गोकाक मतदारसंघातुन रमेश जारकीहोळी, तर अरभावी मतदारसंघातुन भालचंद्र जारकीहोळी विजयी

    तर काँग्रेस कडून यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी विजयी

  • 13 May 2023 01:23 PM (IST)

    विजयपूर जिल्ह्यातील इंडी मतदारसंघातून काँग्रेसचे यशवंतराव गौडा पाटील विजयी

    – विजयपूर जिल्ह्यातील इंडी मतदारसंघातून काँग्रेसचे यशवंतराव गौडा पाटील विजयी

    – यशवंतराव गौडा पाटील हे सलग तीनवेळा विजयी

    – जेडीएसचे बी.डी. पाटील यांचा पराभव

    – भाजपाचे उमेदवार कासुगौडा बिरादार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले

    – भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता प्रचार

    – मात्र दिग्गज नेते येऊनही भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले

  • 13 May 2023 01:21 PM (IST)

    मुंबईत दादरच्या काँग्रेस टिळक भवन कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेस कमिटी कडून टिळक भवन या ठिकाणी विजय जल्लोष साजरा करायला सुरुवात

    मुंबईत दादरच्या काँग्रेस टिळक भवन कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    – काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाके फोडून घोषणाबाजी करत पेढे वाटत जल्लोष साजरा

    – पुरोगामी आणि सेक्युलर विचाराचं सरकार आता संपूर्ण देशामध्ये येणार असा कार्यकर्त्यांना विश्वास

    – काँग्रेसला हनुमान पावला तिथली लोक पावली भाजपला कुणी पावलं नाही अशी टिका

  • 13 May 2023 01:17 PM (IST)

    कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुखांनी विजयाचे श्रेय पक्षाच्या नेत्यांना दिले

    कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुखांनी विजयाचे श्रेय पक्षाच्या नेत्यांना दिले

    कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार म्हणाले, “मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना श्रेय देतो ज्यांनी खूप मेहनत केली, लोकांनी खोटे उघड केले. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजयाची हमी दिली होती. “मी विसरू शकत नाही. जेव्हा सोनिया गांधी तुरुंगात मला भेटायला आल्या तेव्हा मी पदावर राहण्याऐवजी तुरुंगातच राहणे पसंत केले, पक्षाचा माझ्यावर इतका विश्वास होता.

  • 13 May 2023 01:14 PM (IST)

    तर ‘ऑपरेशन लोटस’ होऊ शकते

    काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, “जर त्यांनी (भाजप) करोडो रुपये खर्च केले तर ‘ऑपरेशन लोटस’ होऊ शकते, पण काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे, कर्नाटकात सिंधिया नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचे मोठं आव्हान आहे.

  • 13 May 2023 01:08 PM (IST)

    कर्नाटकच्या जनतेने भाजपला धडा शिकवलाय – खासदार विनायक राऊत

    कर्नाटकच्या आजच्या निकालाने दाखवून दिलं आहे

    कर्नाटकच्या जनतेने भाजपला धडा शिकवलाय

    कर्नाटकच्या जनतेने दादागिरी गुंडगिरी तडपशाही याच्या विरोधात कौल दिलाय

    ही राजकीय परिवर्तनाची सुरुवात आहे

    2024 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात हेच परिवर्तन होईल

    उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुन्हा जोमाने उभी राहील

  • 13 May 2023 01:05 PM (IST)

    राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार

    नवी दिल्ली

    राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार

    दुपारनंतर काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद होण्याची शक्यता

  • 13 May 2023 01:04 PM (IST)

    कोणत्या पक्षाला किती जागा

    कोणत्या पक्षाला किती जागा

    भाजप- 66

    काँग्रेस – 128

    जेडीएस- 22

    इतर – 6

  • 13 May 2023 01:02 PM (IST)

    भाजपला पराभव मान्य, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं विधान

    भाजपने पराभव स्वीकारला, आता लोकसभा निवडणुकीकडे लक्ष आहे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, “लोकशाहीत जिंकणे किंवा हरणे ही मोठी गोष्ट नाही. आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून लढणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे.”

  • 13 May 2023 12:55 PM (IST)

    भाजपा हा पराभव पचवू शकणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

    भाजपा हा पराभव पचवू शकणार नाही

    भाजपच्या क्लूप्या सुरू राहणार आहे

    महाराष्ट्रात घोडेबाजार करण्यात आलं

    कर्नाटकच्या सरकारची निर्मिती पापानं झाली

    कर्नाटकमध्ये दरपत्रक जाहीर केलं होतं

    बोम्मई भाजपातून दुस-या पक्षातून आलेल्या आहेत

    मोदीची करिष्माचा परिणाम कमी झाला का ?

    लोकांमध्ये राग असा होता

    मोठ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत

    कर्नाटकच्या नेत्वृवात होतं

    मता करता तुम्ही येत आहेत

    राहुल गांधी भारत जोडोच्या विजयामुळे

    लोकसभेतलं सदस्यत्व रद्द केलं आहे

    राज्यातील नेत्यांना महत्व

    स्थानिक नेत्वृवाला हकालपट्टी करण्यात आली

    भाजपला स्वबळावर काहीही करता येणार नाही

    जेडीएसला भाजपला सोबत घ्यावं लागेल

    आँपरेशन कश्यावरून होणार

    संपूर्ण विश्लेषण करणं अवघड आहै

    प्रक्टीकल सदकृत दर्शनी जेडीएसची

  • 13 May 2023 12:53 PM (IST)

    एक्झिट पोलचे निकाल खरे ठरले

    कर्नाटकातील एक्झिट पोलचे निकाल योग्य असल्याचे दिसून येत आहे. आठपैकी सहा वेगवेगळ्या एक्झिट पोल एजन्सींनी काँग्रेसच्या विजयाचा दावा केला होता. त्यांच्या मते, काँग्रेस स्वबळावर किंवा जेडीएसच्या सहकार्याने सरकार बनवत होती. हे दावे योग्य ठरताना दिसत आहेत.

  • 13 May 2023 12:52 PM (IST)

    बेळगाव ग्रामीण लक्ष्मी हेब्बळकर विजयाच्या उंबरट्यावर…

    बेळगाव ग्रामीण लक्षमी हेब्बळकर विजयाच्या उंबरट्यावर…

    महाराष्ट्र एक्कीकरण समितीचे आर. एम चौगुले 37 हजार 585 मतांनी पिछडीवर..

    बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेसच्या उमेदवार लक्षमी हेबबाळकर यांचा विजय निश्चित

  • 13 May 2023 12:50 PM (IST)

    हनुमानाची गदा भाजपच्या डोक्यात पडली आहे – चंद्रकांत खैरे

    हनुमानाची गदा भाजपच्या डोक्यात पडली आहे.

    दक्षिण भरतातून भाजप आता हद्दपार झाली आहे.

    मस्तीत वागू नका नका मस्ती कधीही जमिनीवर आणते

    बाळासाहेबांचा यांना शाप लागला आहे म्हणून यांचं अधःपतन सुरू झालं आहे

  • 13 May 2023 12:46 PM (IST)

    कर्नाटक निकालानंतर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया

    – कर्नाटकामध्ये धर्माचा प्रचार केला बजरंग बली यांना उतरवला पण बजरंग बली आणि तोडतो दुश्मन की नली हे कर्नाटकात पाहायला मिळाले…

    – संपूर्ण देशामध्ये आता परिवर्तन घडेल आणि इतर दिल्लीमध्ये पहा तिथे केजरीवर आले महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहिलं तर आता पुढे भविष्यामध्ये पुन्हा एकदा बरेचशे बदल होण्याचे संकेत मिळत आहे

    मोठे मोठे दिग्गज नेते कर्नाटकात जाऊन बसले होते त्यांनी प्रचार केला पण अखेर सत्याचा विजय झाला आणि लोकांनी भाजपला तिथे नाकारलेला आहे

    उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता आणि तो योग्यच होता असा आम्हा सगळ्यांचे मत आहे आणि आम्ही यासाठी सात खंडपीठाची मागणी केली होती ती देखील मागणी मान्य झाली आता गेम आणि चेंडू टप्प्यात आलाय आणि आता या टप्प्यांमध्ये कोणाची विकेट जाते हे तुम्ही पहाच…

  • 13 May 2023 12:43 PM (IST)

    कर्नाटकात काँग्रेस ‘किंग’, भाजपने स्वीकारला पराभव, 16 जागांवर उमेदवार एक हजाराच्या फरकाने

    कर्नाटकात काँग्रेस ‘किंग’, भाजपने स्वीकारला पराभव, 16 जागांवर उमेदवार एक हजाराच्या फरकाने

  • 13 May 2023 12:39 PM (IST)

    मला आनंद आहे फोडाफोडी करता येणार नाही, जितेंद्र आव्हाडाची पहिली प्रतिक्रिया

    मला आनंद आहे फोडाफोडी करता येणार नाही

    त्याच्या स्टाईल वर राजकारण होऊ शकत नाही

    दक्षिणेतील सर्व राज्य गेली

    द्वेष धर्म यावर राजकारण होऊ शकत नाही हे द्राविडीयन संस्कृतीे दाखवली

    पंतप्रधान यांचे रोड शो हे लोकांच्या डोक्यात गेले इंदिरा गांधी १९७७साली पराभूत झाल्या

    लोकसभा निवडणुकीत त्यांनी ताकदवर उमेदवाराचा पराभव केला

    १९८० साली पूर्ण बहुमत घेतले

    १९८८चा पराभव व नंतर सत्ता स्थापन

    बजरंग बली ज्यावर अत्याचार होतो त्याच्या बाजूने उभा राहतो

    बजरंगबलीने त्याचे काम केले आहे भविष्यात निवडणुकांवर या निकालाचे परिणाम दिसतील

  • 13 May 2023 12:32 PM (IST)

    काँग्रेसचे नेते आनंदात, जल्लोष सुरु

    कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा विजय पाहून नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले, “भाजप मुक्त दक्षिण भारत.”

  • 13 May 2023 12:31 PM (IST)

    पोटनिवडणुकीतही भाजप पिछाडीवर, पहा कोण कुठे आहे आघाडीवर…

    कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मतमोजणी सुरू असतानाच देशात पंजाबमधील लोकसभेच्या एका जागेसाठी, उत्तर प्रदेशातील दोन जागा, मेघालय आणि ओडिशातील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी सुरू आहे.

    याशिवाय उत्तर प्रदेशातील 17 महानगरपालिका, 200 नगरपालिका आणि 544 नगर पंचायतींच्या जागांसाठीही मतमोजणी सुरू आहे.

    – पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघामध्ये आपने आघाडी घेतली आहे.

    – उत्तर प्रदेशमध्ये दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

    – यातील स्वार विधानसभा मतदारसंघात भाजप तर छानबे मतदारसांघात समाजवादी पार्टी आघाडीवर आहे.

    – ओडिशा राज्यातील झारसुगुडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बीजेडी आघाडीवर आहे.

    – मेघालय राज्यातील सोहियोंग विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत UDP आघाडीवर आहे.

  • 13 May 2023 12:30 PM (IST)

    जगदीश शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला

    भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर यांची पिछेहाट झाली आहे. यावर कर्नाटक सरकारमधील मंत्री सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले, “जगदीश शेट्टर यांचा पराभव सुरुवातीपासूनच निश्चित होता. यावेळी जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने जाताना पाहून आश्‍चर्य वाटत आहे.

  • 13 May 2023 12:27 PM (IST)

    विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित

    कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरीता आज शनिवार, दि १३ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वा मुंबई काँग्रेस कार्यालयात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

  • 13 May 2023 12:25 PM (IST)

    बेळगाव दक्षिणमधील निकाल

    बेळगाव दक्षिण Round 22

    भाजप अभय पाटिल. 73441 मते घेऊन आघाडीवर

    काँग्रस प्रभादेवी मासमार्डी 12416 मते घेऊन आघाडीवर

    रमाकांत कुंडुस्कर 62217 मते घेऊन आघाडीवर

    9532 मतानी अभय पाटिल आघाडीवर

  • 13 May 2023 12:23 PM (IST)

    1000 पेक्षा कमी फरकाने 16 जागांवर उमेदवार पुढे-मागे आहेत

    1000 पेक्षा कमी फरकाने 16 जागांवर उमेदवार पुढे-मागे आहेत

    1000 पेक्षा कमी फरक असलेल्या 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

    1000 पेक्षा कमी फरक असलेल्या 5 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

    जेडीएस 2 जागांवर आघाडीवर आहे जिथे मताधिक्य 1000 पेक्षा कमी आहे.

    1000 पेक्षा कमी फरक असलेल्या 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

  • 13 May 2023 12:21 PM (IST)

    दक्षिण बेळगावचा निकाल

    बेळगाव दक्षिण Round 21

    भाजप अभय पाटिल. 69468 आघाडीवर

    काँग्रस प्रभादेवी मासमार्डी 11813

    mes रमाकांत कुंडुस्कर 59936

    9532 मतानी अभय पाटिल आघाडीवर

  • 13 May 2023 12:20 PM (IST)

    बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का? काय आहे स्थिती ?

    – बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील आघाडीवरअसून महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर पिछाडीवर आहेत.

    – बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आघाडीवर तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर एम चौगुले 7000 मतांनी पिछाडीवर आहेत.

    – खानापूर मतदार संघात भाजपचे विठ्ठल हलगेकर आघाडीवर असून विद्यमान आमदार अंजली निंबाळकर पिछाडीवर आहेत

    – बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपचे रवी पाटील आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे असिफ उर्फ राजू शेठ हे पिछाडीवर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अमर येलोरकर मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

  • 13 May 2023 12:19 PM (IST)

    राहुल गांधी यांनी साडेतीन हजार किलोमीटर चालत लोकांना गळ्याला लावले – नाना पाटोले

    नाना पटोले बाईट

    राहुल गांधी यांनी साडेतीन हजार किलोमीटर चालत लोकांना गळ्याला लावले.

    लोंकांचे दुःख लोकसभेत मांडले आणि त्यांची लोकसभा सदस्यत्व रद्द झाले.

    कर्नाटक मध्ये काँग्रेसचा विजय हा त्याचा असर नाही

    ज्या भाजपने हजारो कोटी रुपये खर्च करून काँग्रेस नेतृत्वावाला बदनाम करण्याचा पाप केले. त्या परीक्षेला राहुल गांधी यांना सामोरे जावे लागले.

    जनतेने मान्य केले आहे की, राहुल गांधी हे देशाचे नेतृत्व करू शकतात.

    देशातील सत्तेत बसलेली अनपढ व्यवस्था देश विकून देश चालवू शकतात पण देश पुढे नेऊ शकत नाहीत.

    हे लोकांना कळाले म्हणून कर्नाटक मधील लोकांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब केले आहे.

  • 13 May 2023 12:15 PM (IST)

    शशिकला जोल्हे 39119 आघाडीवर

    निपाणी

    काकासाहेब पाटील. काँग्रेस 23314 उत्तम पाटिल. राष्ट्रवादी कांग्रेस 36475

    शशिकला जोल्हे 39119 आघाडीवर

  • 13 May 2023 12:13 PM (IST)

    भाजपच्या मिशन दक्षिणला मोठा धक्का, एकमेव राज्यही हातातून गेले

    – कर्नाटकमध्ये जोरदार प्रचार करूनही भाजपला मोठा झटका बसत असल्याचे दिसत आहे.

    – कर्नाटक जिंकण्यासोबतच दक्षिणेतील अन्य राज्यांमध्ये सत्ता स्थापण्यासाठी भाजपने मिशन दक्षिणची रणनीती आखली होती.

    – मात्र कर्नाटकमध्येच भाजपचा पराभव होत स्पष्ट झाल्याने भाजपच्या मिशन दक्षिणला मोठा धक्का बसला बसला आहे.

    – दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये भाजपला अद्याप आपला झेंडा फडकावत आलेला नाही.

    – कर्नाटकसह दक्षिणेच्या सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी सुमारे 25 टक्के म्हणजेच 130 जागा आहेत.

    – मात्र, भाजपच्या ताब्यात असलेली एकमेव राज्यही हातातुन गेल्याने भाजपच्या मिशन दक्षिणला मोठा धक्का बसला आहे.

  • 13 May 2023 12:13 PM (IST)

    माजी उपमुख्यमत्री लक्ष्मण सवदी काँग्रस 55144 आघाडीवर

    अथणी

    माजी उपमुख्यमत्री लक्ष्मण सवदी काँग्रस 55144 आघाडीवर

    महंतेस कुमठली भाजप 22495

  • 13 May 2023 12:11 PM (IST)

    कर्नाटकच्या निकालाचे परिणाम लोकसभा निकालावर दिसतील – यशोमती ठाकूर

    लोकांच्या मनात आहे ते इथे दिसत आहे.

    भाजपची जी पॉलिसी आहे खोटं बोल आणि रेटून बोल की आता लोकांच्या लक्षात आली आहे यांचं पितळ उघड पडलं आहे.

    महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करणारे जे नेते कर्नाटक मध्ये गेले ते तिथे सांगत होते की काँग्रेसचा आणि मराठी माणसाचा संबंध नाही..

    कर्नाटकच्या निकालाचे परिणाम लोकसभा निकालावर दिसतील ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है.

  • 13 May 2023 12:10 PM (IST)

    जनता भाजपाच्या विरोधात -ृ अरविंद सावंत

    गोकाक

    रमेश जर्केहोळी भाजप 59814 कांग्रेस. महंतेस कडाडी. 48414 आघाडीवर

  • 13 May 2023 12:08 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक

    – सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक

    – बैठकीला ठाकरे गटातील सर्व आमदारर आणि खासदार उपस्थित राहणार

    – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गट या बैठकित रणनीती ठरवणार

    – भास्कर जाधव, सचिन अहीर, राजन साळवी, अजय चौधरी, रमेश कोरगावकर, अंबादास दानवे, विलास पोतनीस,रविंद्र वायकर,किशोर दराडे,ऋतुजा लटके,वैभव नाईक,मातोश्रीवर बैठकीसाठी दाखल

  • 13 May 2023 12:05 PM (IST)

    देशाचे राजकारण बदलून टाकणारा निकाल – काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी

    – कर्नाटक आणि महाराष्ट्रात लोकशाहीला लुटून भाजपने सरकार बनवलं होतं

    – महाराष्ट्राचा निकाल भविष्यात कर्नाटक पेक्षा चांगला असेल

    – महाराष्ट्रात ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळेला भाजपाला समजेल

    – भाजपने देशात द्वेषाच राजकारण केलं

    – कर्नाटकचा हा निकाल देशाचं राजकारण बदलून टाकणारा असेल.

    – यापुढे महाराष्ट्र मध्य प्रदेशात कर्नाटक निवडणुकीचा परिणाम दिसेल

  • 13 May 2023 12:01 PM (IST)

    Karnataka Election Results 2023 : भाजपने कर्नाटकातली सत्ता गमावली

    दक्षिण भारतात सत्ता असलेलं एकमेव राज्य भाजपाने गमावलं

    स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसची वाटचाल

  • 13 May 2023 11:52 AM (IST)

    Karnataka Election Results 2023 : काँग्रेसला कर्नाटकात बहूमत

    जातीय समीकरण जुळविण्यात काँग्रेसला यश भाजप 68 जेडीएस 22 इतर 7

  • 13 May 2023 11:47 AM (IST)

    Karnataka Election Results 2023 : चिकमंगलूरूमधल्या सर्व 5 जागांवर काँग्रेस पुढे

    जेडीएस 22 ठिकाणी आघाडीवर

    मागच्या निवडणूपेक्षा काँग्रेसच्या 48 जागा वाढल्या

    काँग्रेसची 126 जागांवर आघाडी

  • 13 May 2023 11:41 AM (IST)

    Karnataka Election Results 2023 : भाजप आणि जेडीएसच्या जागा घटल्या

    कर्नाटकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

    काँग्रेसला कर्नाटकात मोठे यश

  • 13 May 2023 11:35 AM (IST)

    Karnataka Election 2023 : काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापण करण्याच्या मार्गावर 

    भाजप- 70 काँग्रेस – 125 जेडीएस – 22 इतर- 7

  • 13 May 2023 11:31 AM (IST)

    Karnataka Election 2023 : भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु : अरविंद सावंत

    शेतकरी, मच्छीमार वर्गाशी सुसंवाद ठेवल्याचा काँग्रेसला फायदा

    जेष्ठांना डावलनं भाजपला महागात पडलं

    उत्तरेतला भाजपचा फॉरम्युला दक्षिणेत अपयशी

  • 13 May 2023 11:22 AM (IST)

    Karnataka Election 2023 : ज्येष्ठांना डावलून नवख्यांना टिकीट देण भाजपाला नडलं

    भाजप- 74 काँग्रेस – 112 जेडीएस – 32 इतर- 6

  • 13 May 2023 11:15 AM (IST)

    सातारा दौऱ्यावर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

  • 13 May 2023 11:11 AM (IST)

    ‘कर्नाटकात काँग्रेस बहुमतासह सत्ता स्थापन करणार’ – संजय राऊत

    कर्नाटकातला भाजपाचा पराभव हा पंतप्रधान मोदींनी स्विकारला पाहिजे- संजय राऊत

    कर्नाटकच्या जनतेने मोदी आणि शहाला झिडकारलंय- संजय राऊत

  • 13 May 2023 11:05 AM (IST)

    घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेस अलर्टवर 

    सर्व आमदारांना दुसऱ्या राज्यातील हॉटेलमध्ये ठेवणार

    ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यात आमदारांना ठेवणार

  • 13 May 2023 10:56 AM (IST)

    Karnataka Election 2023 : काँग्रेस 114 जागांवर आघाडीवर , भाजपाची पिछेहाट सुरू

    काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरूच असून कर्नाटकमध्ये 114 जागांवर आघाडीवर आहे.

    भाजपाची पिछेहाट सुरू असून भाजपा 71 जागांवर आघाडीवर आहे

    जेडीएस 32 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत

  • 13 May 2023 10:50 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये झाला बिघाड

    सातारा दौऱ्यावर जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये झाला बिघाड

  • 13 May 2023 10:44 AM (IST)

    Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये आम्ही मोठ्या संख्येने जिंकत आहोत, जनतेने 40% कमिशन सरकार नाकारले – सचिन पायलट

    कर्नाटकात आम्ही मोठ्या संख्येने जिंकत आहोत.

    जनतेने 40% कमिशन सरकारला नाकारले आहे.

    प्रचार खूप झाला पण आम्ही मुद्द्यांवर ठाम होतो त्यामुळेच जनतेने आम्हाला बहुमत दिले

  • 13 May 2023 10:41 AM (IST)

    Karnataka Election 2023 : काँग्रेसची घोडदौड सुरूच, 115 जागांवर घेतली आघाडी

    कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतं.

    115 जागांवर घेतली आघाडी

  • 13 May 2023 10:35 AM (IST)

    Karnataka Election 2023 : येडियुरप्पा यांची नाराजी भाजपला भोवली ?

    येडियुरप्पा यांच्या नाराजीमुळे कर्नाटकमध्ये भाजपला फटका बसल्याची चर्चा

    गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपच्या 30 जागा कमी

  • 13 May 2023 10:33 AM (IST)

    Karnataka Election 2023 : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बंगळुरूतील महत्वाची बैठक

    काँग्रेस बहुमतापासून अवघ्या काही जागा दूर, 111 जागांवर आघाडी

    विजयी उमेदवारांना हैद्राबाद येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार

    भाजपा 73, जेडीएस 30 तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहे.

  • 13 May 2023 10:26 AM (IST)

    Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस 112 जागांवर आघाडीवर

    कर्नाटकमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू

  • 13 May 2023 10:23 AM (IST)

    Karnataka Election 2023 : बजरंग बलीची गदा भाजपाच्या डोक्यावर पडली – संजय राऊत

    कर्नाटकमध्ये फक्त लोकशाहीची स्टोरी चालली

    संजय राऊत यांची भाजपावर कडाडून टीका

  • 13 May 2023 10:21 AM (IST)

    Karnataka Election 2023 : कर्नाटकचा पराभव हा पंतप्रधान मोदींचा पराभव – संजय राऊत

    मोदी- शहांनी पराभव स्वीकारावा

    मोदी-शहा यांना मतदारांनी झिडकारलं.

    2024 मध्येही असाच निकाल लागणार

  • 13 May 2023 10:15 AM (IST)

    Shikaripura Election Result 2023 : येडियुरप्पांचे पुत्र आघाडीवर

    बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे बी विजयेंद्र आघाडीवर आहेत.

    शिकारपुरा विधानसभा मतदारसंघातून बी विजयेंद्र आघाडीवर आहेत.

  • 13 May 2023 10:12 AM (IST)

    Election Result 2023 : काँग्रेसने विधीमंडळ नेत्यांची बैठक बोलावली

    काँग्रेसने विजय उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू

    कर्नाटकमध्ये राजकीय हालचालींना आला वेग

  • 13 May 2023 10:10 AM (IST)

    Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर

    सत्तास्थापनेसाठी घेणार अपक्षांची मदत ?

  • 13 May 2023 10:07 AM (IST)

    Election Result 2023 : सिद्धरामय्या आघाडीवर

    वरूणा मतदारसंघात सिद्धरामय्या हे आघाडीवर आहेत.

  • 13 May 2023 10:00 AM (IST)

    Election Result 2023 : निपाणी मतदार संघात काँग्रेसची आघाडी

    काकासाहेब पाटील काँग्रेस 4940

    उत्तम पाटील. राष्ट्रवादी कांग्रेस 6370

    शशिकला जोल्हे 6693 आघाडीवर

  • 13 May 2023 09:55 AM (IST)

    Election Result 2023 : बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील आघाडीवर

    महाराष्ट्र एकीकरण समितीला अजून खाते उघडता आले नाही

    बेळगाव दक्षिणमध्ये भाजप अभय पाटील 19556

    काँग्रेस प्रभादेवी मासमार्डी 2246

  • 13 May 2023 09:53 AM (IST)

    निपानीत भाजपच्या शशिकला जोल्ले आघाडीवर

    निपाणी मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्ले आघाडीवर

    राष्ट्रवादीचे उत्तम पाटील पिछाडीवर

    निपाणी मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी चुरस

  • 13 May 2023 09:46 AM (IST)

    जेडीएस किंगमेकर ठरणार

    जेडीएस किंगमेकर ठरणार

    जेडीएस ३४ जागांवर आघाडीवर

    काँग्रेस बहुमतापासून दूर

  • 13 May 2023 09:43 AM (IST)

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीवर

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी.के.शिवकुमार आघाडीवर

    मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे शिवकुमार

  • 13 May 2023 09:38 AM (IST)

    तिसऱ्या फेरीत कुमारस्वामी आघाडीवर

    तिसऱ्या फेरीत कुमारस्वामी यांनी घेतली आघाडी

    दोन फेऱ्यांमध्ये कुमारस्वामी होते पिछाडीवर

    जेडीएस ३३ जागांवर आघाडीवर

  • 13 May 2023 09:34 AM (IST)

    इंडी मतदारसंघात कोणी घेतली आघाडी

    इंडी मतदारसंघ

    यशवंतरायगौडा पाटील (काॅग्रेस) 6538.

    बी.डी. पाटील (Jds) 2175

    कासूगौडा बिरादार (भाजपा) 1809

  • 13 May 2023 09:27 AM (IST)

    नागठाण मतदारसंघ काँग्रेसची आघाडी

    नागठाण मतदारसंघ

    विठ्ठल कटकदोंड काॅंग्रेस 4164

    देवानंद चव्हाण JDS – 2190

  • 13 May 2023 09:23 AM (IST)

    कुमारस्वामी दुसऱ्या फेरीत पिछाडीवर

    कर्नाटक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना धक्का

    दुसऱ्या फेरीत मागे

    कुमार स्वामी यांचा मुलाची आघाडी

  • 13 May 2023 09:16 AM (IST)

    बबलेश्वर मतदारसंघात भाजप पिछाडीवर

    बबलेश्वर मतदारसंघ

    एम.बी. पाटील (काॅंग्रेस) 10443

    विजूगौडा पाटील (भाजपा) 9207

  • 13 May 2023 09:14 AM (IST)

    भाजपचे रमेशजारहोळ पिछाडीवर

    गोकाक मतदार संघात भाजपचे रमेशजारहोळ पिछाडीवर

    काँग्रेसचे मानतेश कडाडी यांची मुसडी

    पहिल्या फेरीत आघाडीवर असणारे रमेश जारकीहोळ दुसऱ्या फेरीत मात्र पिछाडीवर

  • 13 May 2023 09:13 AM (IST)

    बबलेश्वर मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर

    बबलेश्वर मतदारसंघ

    आघाडी एम.बी. पाटील (काॅंग्रेस) 5224

    विजूगौडा पाटील (भाजपा)* 4670

  • 13 May 2023 09:13 AM (IST)

    विजयपूर शहर मतदारसंघात भाजप आघाडीवर

    विजयपूर शहर मतदारसंघ

    बसवनगौडा पाटील, भाजपा – 8367

    अब्दुल हमीद मुश्रीफ, काँग्रेस – 1231

  • 13 May 2023 09:12 AM (IST)

    निपानीमधून राष्ट्रवादीची आघाडी

    निपानीमधून राष्ट्रवादीने आघाडी घेतली

    उत्तम पाटील यांनी घेतली आघाडी

    शरद पवार यांनी केला होता उत्तम पाटील यांचा प्रचार

  • 13 May 2023 09:10 AM (IST)

    दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर

    माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पिछाडीवर

    माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पिछाडीवर

  • 13 May 2023 09:08 AM (IST)

    बेळगावात पोस्टल मतांची मतमोजणी

    पोस्टल बॅलेटमध्ये आतापर्यंत अंजली निंबाळकर काँग्रेस, रमेश जारकीहोळी भाजप लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेस आणि सतीश जारकीीहोळी काँग्रेस आघाडीवर

  • 13 May 2023 09:07 AM (IST)

    बसवनबागेवाडी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री शिवानंद पाटील आघाडीवर

    शिवानंद पाटील (काॅंग्रेस) – 2252 मते

    एस के बेळ्ळोबी (भाजपा) 1337

  • 13 May 2023 09:06 AM (IST)

    जेडीयुला धक्का

    जेडीयुचे नेते व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पिछाडीवर

    २११ जागांच्या कलानुसार काँग्रेसला बहुमत

    भाजपचे आठ मंत्री पिछाडीवर

  • 13 May 2023 09:02 AM (IST)

    बेळगाव | गोकाक मतदार संघात भाजपचे रमेश जारकीहोळ पिछाडीवर

    काँग्रेसचे मानतेश कडाडी यांची मुसंडी

    पहिल्या फेरीत आघाडीवर असणारे रमेश जारकीहोळ दुसऱ्या फेरीत मात्र पिछाडीवर

  • 13 May 2023 08:52 AM (IST)

    बेळगावमधील 6 महत्त्वाचे मतदारसंघ

    १. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर

    २. बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर समिती – अभय पाटील भाजप

    ३. बेळगाव उत्तर – आसिफ उर्फ राजू शेठ काँग्रेस – रवी पाटील भाजप – अमर येळ्ळूरकर समिती

    ४. बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेस – नागेश मन्नोळकर भाजप – आर. एम. चौगुले समिती

    ५. निपाणी – शशिकला जोल्ले भाजप – काकासाहेब पाटील काँग्रेस – उत्तम पाटील राष्ट्रवादी – जयराम मिरजकर समिती

    ६. यमकनर्डी – सतीश जारकोहोळ काँग्रेस – बसवराज हुंदरी भाजप – मारुती नाईक समिती

    ७. खानापूर – अंजली निंबाळकर काँग्रेस – विठ्ठल हलगेकर भाजप – मुरलीधर पाटील समिती

  • 13 May 2023 08:37 AM (IST)

    “भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू”

    “कर्नाटकच्या हितासाठी माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावं”

    काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

  • 13 May 2023 08:34 AM (IST)

    बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदार संघाच्या मतमोजणीला काही क्षणात होणार सुरुवात

    पोस्टल बॅलेट पेपरची विभागणी सुरु

  • 13 May 2023 08:24 AM (IST)

    Karnataka Election Results 2023 | काँग्रेसचे जगदीश शेट्टर पिछाडीवर

    भाजपमधून शेवटच्या क्षणी त्यांनी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश

  • 13 May 2023 08:18 AM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी इथल्या हनुमान मंदिराला दिली भेट

    कर्नाटकात मतमोजणी सुरू होताच केलं देवदर्शन

  • 13 May 2023 08:06 AM (IST)

    दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू

    कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी होणाऱ्या मजमोजणीपूर्वी जल्लोष

  • 13 May 2023 08:04 AM (IST)

    कर्नाटकात मतमोजणीला सुरुवात

    सुरुवातीला पोस्टल मतमोजणीला सुरुवात

  • 13 May 2023 07:49 AM (IST)

    कानडी जनतेचा कौल कुणाला? काही तासात स्पष्ट होणार

    सकाळी 8 वाजता होणार मतमोजणी ला सुरुवात

    बेळगावच्या आरपीडी कॉलेजमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघाची होणार मतमोजणी

    मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्ते यायला सुरुवात

  • 13 May 2023 06:48 AM (IST)

    कर्नाटकाची सिलिकॉन सिटी देखील मतमोजणीसाठी सज्ज

    बंगळुरूच्या 28 विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी

    निवडणूक आयोगाचे अधिकारी मतमोजणीसाठी सज्ज

    – बंगळुरू महापालिका अंतर्गत 28 मतदारसंघांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे,

    – गोविदराज नगर • विजयनगरा • बसवनगुडी • पद्मनाभनगर • BTM लेआउट • जयनगर • बोम्मनहल्ली

    3. बंगलोर उत्तर – माउंट कार्मेल कॉलेज वसंतनगर

    • के अर पुरम • महालक्ष्मी लेआउट • मल्लेश्वरम • अजगर • पुलकेशीनगर • सर्वज्ञाननगरा • सीव्ही रमण नगर

    4. बंगलोर – नगर (उरबन) सेंट जोसेफ कॉलेज विठ्ठल मलाया रोड

    • यालाहंका बटरायणपूर • यशवंतपूर • दसरहल्ली • महादेवपूर • बंगलोर दक्षिण • अॅनाकल

  • 13 May 2023 06:47 AM (IST)

    कर्नाटकात कोणत्या जातीचं किती वर्चस्व? कुणाच्या हाती सत्तेची दोरी?

    कर्नाटकात बौद्ध, जैन आणि इतर अल्पसंख्यांकांचा 24 जागांवर प्रभाव आहे

    15 जागांवर ब्राह्मण समुदायाचा प्रभाव आहे

    तर इतर जातींचा 10 जागांवर प्रभाव आहे

    ख्रिश्चनांचा 10 जागांव तर मुस्लिमांचा 50 जागांवर प्रभाव आहे

    दलितांसाठी 36 जागा राखीव आहेत

    ओबीसींचा 24 आणि वोक्कालिगा समाजाचा 48 जागांवर प्रभाव आहे

  • 13 May 2023 06:38 AM (IST)

    कर्नाटकातील 2615 उमेदवाराच्या भाग्याचा फैसला आज

    कर्नाटकात 224 जागांवर एकूण 2615 उमेदवार उभे आहेत

    यामध्ये 2430 पुरुष उमेदवार आहेत तर 184 महिला उमेदवार आहेत, एक तृतियपंथी उमेदवार आहे

    मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी आदी दिग्गज निवडणुकीच्या मैदानात आहेत

  • 13 May 2023 06:31 AM (IST)

    कर्नाटकात सत्ता कुणाची? थोड्याच वेळात फैसला

    कर्नाटकात 224 मतदारसंघांचे निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत

    कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे

    राज्यात 10 मे रोजी मतदान झालं होतं. राज्यात मतदानासाठी 58,545 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते

    या निवडणुकीत उभ्या असलेल्या 2,615 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 5.31 कोटी मतदार करणार आहेत

    राज्यात विधानसभेच्या 224 जागा आहेत. तसेच बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे

Published On - May 13,2023 6:27 AM

Follow us
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.