आसाम लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting
आसामला पूर्वोतर राज्यांचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा प्रदेश आहे. दुर्मीळ वनस्पती, घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, जत्रा, सण उत्सव यामुळे राज्याचा लौकीक भारतात सर्वदूर पसरलेला आहे. या राज्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. पौराणिक कथांमध्ये या राज्यांना प्राग्ज्योतिशा आणि कामरुपाची राजधानी मानलं जात होतं. त्याची राजधानी गुवाहाटीपासून प्राग्ज्योतिशपुरामध्ये होती. आसामच्या पूर्वेकडे नागालँड, मणिपूर आणि म्यानमार आहे. पश्चिमेमला पश्चिम बंगाल आणि उत्तरेला भुतान तसेच अरुणाचल प्रदेश आहे. दक्षिणेला मेघालय, बांग्लादेश, त्रिपुरा आणि मिझोराम आहे. तांदूळ आणि चहाच्या उत्पादनासाठी आसाम ओळखलं जातं. राज्यातून ब्रह्मपुत्रा नदी वाहते. आसाममध्ये भाजपचं सरकार आहे. राज्यात लोकसभेच्या केवळ 14 जागा आहेत.
असम लोकसभा मतदारसंघाची यादी
राज्य | जागा | उमेदवार | वोट | पक्ष | स्टेटस |
---|---|---|---|---|---|
Assam | Nagaon | PRADYUT BORDOLOI | - | INC | Won |
Assam | Dibrugarh | SARBANANDA SONOWAL | - | BJP | Won |
Assam | Guwahati | BIJULI KALITA MEDHI | - | BJP | Won |
Assam | Kaziranga | KAMAKHYA PRASAD TASA | - | BJP | Won |
Assam | Sonitpur | RANJIT DUTTA | - | BJP | Won |
Assam | Karimganj | KRIPANATH MALLAH | - | BJP | Won |
Assam | Silchar | PARIMAL SUKLABAIDYA | - | BJP | Won |
Assam | Jorhat | GAURAV GOGOI | - | INC | Won |
Assam | Diphu | AMARSING TISSO | - | BJP | Won |
Assam | Lakhimpur | PRADAN BARUAH | - | BJP | Won |
Assam | Kokrajhar | JOYANTA BASUMATARY | - | UPPL | Won |
Assam | Darrang-Udalguri | DILIP SAIKIA | - | BJP | Won |
Assam | Barpeta | PHANI BHUSAN CHOUDHURY | - | AGP | Won |
Assam | Dhubri | RAKIBUL HUSSAIN | - | INC | Won |
आसामला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते आणि ते चहाच्या मळ्यांसाठी ओळखले जाते. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या राज्यात दुर्मीळ वनस्पतीही मुबलक प्रमाणात आढळतात. पौराणिक कथांमध्ये हे राज्य प्राग्ज्योतिष आणि कामरूपाची राजधानी म्हणून ओळखले जात होते, ज्याची राजधानी प्राग्ज्योतिषपुरा असायची. गुवाहाटीमध्ये किंवा जवळ कुठेतरी ही राजधानी होती. आसाम हे नाव कुठून आले याविषयी असे म्हटले जाते की अहोम लोकांनी आसाम जिंकल्यानंतर हा शब्द वापरात आला. आसाम हे नाव असम म्हणजे असमान या शब्दावरून आला आहे, असेही म्हटले जाते.
आसाम भारताला बांगलादेशपासून वेगळे करतो. राज्याच्या पूर्व सीमेवर नागालँड आणि मणिपूरसह म्यानमार देश आहे, तर पश्चिमेला पश्चिम बंगाल आहे. उत्तरेला भूतान आणि अरुणाचल प्रदेश आणि दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा, मिझोराम तसेच बांगलादेश येतो. येथे ब्रह्मपुत्रा नदी वाहते. भातशेतीसाठीही हा परिसर ओळखला जातो. आसाम हे बिहू उत्सवासाठी जगभरात ओळखले जाते. आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. तर राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि सध्या हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री आहेत. आसामच्या राजकारणात भाजपची स्थिती अतिशय मजबूत आहे. काँग्रेसचीही येथे चांगली पकड आहे. तर बद्रुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष एआययूडीएफचीही आसाममधील अनेक भागात मजबूत पकड आहे.
प्रश्न - 14 लोकसभेच्या जागा असलेल्या आसाममध्ये 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी किती होती?
उत्तर – 81.60%
प्रश्न - आसाममध्ये 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने किती जागा जिंकल्या?
उत्तर - 9 जागा
प्रश्न - आसाममध्ये काँग्रेसच्या लोकसभेच्या किती जागा आहेत?
उत्तर - 3
प्रश्न - AIUDF नेते बदरुद्दीन अजमल यांनी लोकसभा कोणती जागा जिंकली?
उत्तर - धुबरी लोकसभा
प्रश्न - आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत कोणी अपक्ष उमेदवार जिंकला का?
उत्तर - होय, नब कुमार सरनिया कोक्राझारमधून विजयी झाले होते.
प्रश्न - आसाममध्ये 2019 च्या निवडणुकीत कोणाला सर्वाधिक मते मिळाली?
उत्तर - भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला.
प्रश्न - आसाममध्ये भाजपशिवाय एनडीएमध्ये कोणते दोन पक्ष होते?
उत्तर – आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट
प्रश्न - काँग्रेस नेते गौरव गोगोई कोणत्या जागेवरून विजयी झाले?
उत्तर - कालियाबोर
प्रश्न - राज्यात मतांच्या फरकाने सर्वात मोठा विजय कोणाला मिळाला?
उत्तर - दिब्रुगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रामेश्वर तेली यांनी काँग्रेसचे उमेदवार पवनसिंह घाटोवार यांचा 3,64,566 मतांनी पराभव केला.
प्रश्न - 2014 च्या निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या होत्या?
उत्तरः 7 जागा जिंकल्या.