मथुरा लोकसभा निकाल 2024: हेमा मालिनी पुन्हा संसदेत दिसणार?, कोण मारणार बाजी?
Mathura Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : मथुरा लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडलं. भाजपने दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेस-सपा आघाडीने मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. आता हेमा मालिनी पुन्हा संसदेत दिसणार? पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) राजकारणात सक्रिय आहेत. धार्मिक शहर आणि भगवान कृष्णाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरा लोकसभा मतदारसंघाची उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल मतदारसंघांमध्ये गणना केली जाते. जेव्हा पासून हेमा मालिनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तेव्हा पासून त्यांचा कोणी पराभव करु शकलेलं नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेचा कौल हेमा मालिनी यांच्या बाजू आहे की नाही, पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगायचं झालं तर 2014 पासून हेमा मालिनी मथुरा येथे खासदार म्हणून काम पाहात आहेत. 2014 च्या आकड्यांनुसार, मथुरा मतदार संघात 17 लाख मतदार आहे. ज्यामध्ये 9.3 पुरुष आणि 7 लाखांपेक्षा अधिक महिला मतदारांची संख्या आहे. मथुरा लोकसभेच्या अंतर्गत छटा, मंत, गोवर्धन, मथुरा आणि बलदेव जागा येतात.
2019 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)
मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात होत्या. तर त्यांच्या विरोधात इतर 12 उमेदवार देखील होते. काँग्रेसने महेश पाठक, राष्ट्रीय लोकदलाने कुंवर नरेंद्र सिंह, स्वतंत्र जनता पक्षाने ओम प्रकाश यांना उमेदवारी दिली होती.
2019 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हेमा मालिनी यांचा विजय झाला. त्यांना 6,71,293 जनतेनं मत दिलं होतं. दुसऱ्यांदा हेमा मालिनी मथुरा येथील खासदार म्हणून निवडून आल्या होत्या
2014 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2014)
2014 च्या मोदी लाटेत अभिनेत्री हेमा मालिनी भाजपच्या तिकिटावर 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजयी झाल्या होत्या. 2014 मध्ये हेमा मालिनी पहिल्यांदा खासदा म्हणून निवडूण आल्या होत्या. 2014 मध्ये हेमा मालिनी यांच्या विरोधात जयन्त चौधरी आणि पं. योगेश कुमार द्विवेदी देखील होते.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स