पुणे, बारामती, सातारा, शिरूर, अहमदनगर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल Final Result 2024
West MAHARASHTRA Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : लोकसभा निवडणुकीच्या निकाल आज समोर येणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या लढती पाहायला मिळणार आहेत. निकालाच्या प्रत्येक अपडेट्स पाहा टीव्ही9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगवर.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे जगाचंही लक्ष लागलेलं असणार आहे. एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं अंदाज वर्तवला गेलाय. मात्र महाराष्ट्रात वारं फिरताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला असून पोलमध्येही दिसून आलं. मात्र आज निकालामध्ये सर्व काही स्पष्ट होणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामती मतदारसंघात आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार की विद्यमान खासदार सुप्रिया सुळे? बारामतीकरांनी पसंती कोणाला? हे स्पष्ट होणार आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 12 लोकसभा मतदार संघ असून त्यामधील सात लढतींकडे विशेष लक्ष असणार आहे. बारामती, पुणे, मावळ, शिरूर, सांगली, सातारा आणि अहमदनर या जागांवर काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विजयाचा गुलाल उधळण्याआधी निकालाच्या सर्व अपडेट्स टीव्ही9 मराठीवर पाहा.
LIVE NEWS & UPDATES
-
Solapur Lok Sabha Election Result 2024 : प्रणिती शिंदे पहिल्या महिला खासदार
प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार झाल्या आहेत. प्रणिती शिंदे यांनी 74, 814 मतांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला आहे.
-
Madha Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभेची मतमोजणी संथगतीने
माढा लोकसभेच्या अद्याप 5 फेऱ्या मोजणे बाकी आहे. राज्यातील बहुतांश निकाल जाहीर झाले असताना माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही मतमोजणी संथगतीने सुरू आहे.
-
-
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : सुजय विखेंना मोठा धक्का, निलेश लंके विजयी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. निलेश लंके यांनी 29 हजार 317 मतांनी विजयी लंके विजयी झाले आहेत.
-
Maval Lok Sabha Election Result 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 96 हजार मतांनी विजयी
मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना 5 लाख 96 हजार 217 इतकी मते मिळाली. यात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 96 हजार 615 मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी महायुती चे उमेदवार यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र दिले.
-
Madha Lok Sabha Election Result 2024 : धैर्यशील मोहिते पाटील विजयाच्या उंबरठ्यावर
19 व्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील 85 हजार 483 मतांनी आघाडीवर
- धैर्यशील मोहिते पाटील… 484521
- रणजीत सिंह नाईक निंबाळकर.. 399038
-
-
Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे विजयी
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांनी 64 हजार 470 मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला आहे.
-
Sangli Lok Sabha Election Result 2024 : तीन पाटलांच्या तिरंगी लढतीत अपक्ष पाटील विजयी
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या संजयकाका पाटील आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आहे. तीन पाटलांच्या तिरंगी लढतीत अपक्ष पाटील विजयी झाले आहेत.
-
Satara Lok Sabha Election Result 2024 : निलेश लंके आघाडीवर
लोकसभा निवडणुकातील सातारा मतदार संघाचा निकाला लागला आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. मविआकडून उभे असलेले शरद गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे.
-
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : निलेश लंके आघाडीवर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके 21 व्या फेरीत 22 हजार 868 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या सुजय विखेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
-
Pune Lok Sabha Election Result 2024 : पुणे मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विजयी
पुणे मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.
-
Shirur Election Result 2024 : अजित पवारांना मोठा धक्का
शिरूर मतदार संघामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव-पाटील यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाच्या नेते अमोल कोल्हे यांनी एक लाखांपेक्षा जास्तीचं लीड घेत विजय मिळवला आहे. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
-
Shirur Election Result 2024 : अमोल कोल्हेंकडे लाखोंचं लीड
शरद पवारा गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी एक लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.
शिवाजीराव आढळराव-पाटील – 445859 अमोल कोल्हे – 550734
-
Shirur Election Result 2024 : अमोल कोल्हे विजयी
शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे.
-
Pune Lok Sabha Election Result 2024 : मुरलीधर मोहोळ मतमोजणी केंद्रावर दाखल
पुणे लोकसभा मतदार संघामध्ये मुरलीधर मोहोळ मतमोजणी केंद्रावर दाखल कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी मोहोळ यांना खांद्यावर उचलून स्वागत केलं.
-
Baramati Lok Sabha Election Result 2024 : सुप्रिया सुळेंचा विजय
देशातील सर्वात हायव्होल्टेज आणि लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघ शरद पवार यांनी कायम राखला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.
-
Baramati Lok Sabha Election Result 2024 : बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव
बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे. सुप्रिया सुळे यांनी १ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.
-
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : सुजय विखे पाटील पिछाडीवर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील पिछाडीवर पडले आहेत. तर शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी 14 हजारांची लीड घेतली आहे.
-
Pune Lok Sabha Election Result 2024 : मुरलीधर मोहोळ यांच्याकडे 79472 मतांटची आघाडी
पुणे लोकसभा मतदार संघामध्ये 12 व्या फेरी अंती मुरलीधर मोहोळ यांना 79472 मतांची आघाडी मिळाली आहे. रवींद्र धंगेकर पिछाडीवर पडले आहेत.
-
सुदैवाने देशपातळीवर आशादायक चित्र- शरद पवार
सुदैवाने देशपातळीवर आशादायक चित्र आहे. आता पुढील परिस्थिती पाहून चर्चा करून नीती ठरवू. जनतेने कणखर साख दिली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
-
Sangli Lok Sabha Election Result 2024 : अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर
सांगली लोकसभा 17 व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 83 हजार 774 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.
- विशाल पाटील – 443779
- संजय काका पाटील – 359955 मते
-
Solapur Sabha Election Result 2024 : प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूर मतदार संघामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. 33207 त्या आघाडीवर असून दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची चिंता वाढली आहे.
- – काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 352075 मते
- – तर भाजपच्या राम सातपुते यांना 318868 मते
-
Madha Lok Sabha Election Result 2024 : धैर्यशील मोहिते-पाटील आघाडीवर
पश्चिम महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात 11 व्या फेरी अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील हे 38 हजार 215 मतांनी पुढे आहेत.
- धैर्यशील मोहिते-पाटील- 2 लाख 67 हजार 643
- रणजितसिंह नाईक निंबाळकर-2 लाख 29 हजार 428
-
Satara Lok Sabha Election Result 2024 : उदयनराजे भोसले आघाडीवर
16व्या फेरी अखेर सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले 12,781 मतांनी आघाडीवर आहेत. शशिकांत शिंदे आता पिछाडीवर पडले आहेत.
-
Pune Sabha Election Result 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठी अपडेट
पुणे लोकसभा मतदारसंघात 11 व्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ यांची 66,906 मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
-
Satara Lok Sabha Election Result 2024 : शशिकांत शिंदे पिछाडीवर
सातारा लोकसभा मतदार संघात शेवटच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे पिछाडीवर पडले आहेत, सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते मात्र आता फासे पलटायला लागले आहेत.
-
Pune Lok Sabha Election Result 2024 : मुरलीधर मोहोळ आघाडीवर
पुणे लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरी अखेरीस भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांना 60,431 मतांचे लीड मिळाली आहे. काँग्रेसेचे नेते रवींद्र धंगेकर आता पिछाडीवर आहेत.
-
Satara Lok Sabha Election Result 2024 : शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंमध्ये काँटे की टक्कर
सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे आघाडीवर होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण काही वेळात चित्र बदललं. सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले 4 हजाराने आघाडीवर गेले आहेत.
-
Satara Lok Sabha Election Result 2024 : शशिकांत शिंदे पिछाडीवर
सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आता लीड मिळाली आहे.
-
Maval Lok Sabha Election Result 2024 : श्रीरंग बारणे आघाडीवर
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये नवव्या फेरीमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे 40,872 मतांनी आघाडीवर आघाडीवर आहे.
- श्रीरंग बारणे (महायुती) – 272341
- संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) – 231469
-
कोल्हापुरातून शाहू महाराज यांना 47 हजारांची आघाडी
कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज आघाडीवर आहे. सातव्या फेरीअखेर शाहू महाराज यांना 47 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
-
विशाल पाटील यांना मोठी लीड
सांगली लोकसभा आठव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 33 हजार 486 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.
-
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे आघाडीवर
मावळ मतदारसंघात पाचवी फेरी पूर्ण झाली आहे. पाचव्या फेरीत महायुतीचे श्रीरंग बारणे यांना 156253 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना 127417 मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 28,836 मतांनी आघाडीवर आहेत.
-
सुप्रिया सुळेंना आघाडी मिळताच बारामतीत फटाके फुटले
बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर सुप्रिया सुळे 19000 मतांनी आघाडीवर आल्याने शरद पवार गटाकडून बारामतीत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर फटाके फोडत जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली.
-
धैर्यशील मोहिते पाटील तिसऱ्या फेरीत आघाडीवर
माढा लोकसभा पहिली फेरी…
धैर्यशील मोहिते पाटील…24243 रणजितसिंह नाईक निंबाळकर…. 19645 ————————— पहिल्या फेरीत मोहितेंना 4598 मतांचे लीड ………………………………. दुसरी फेरी
मोहिते … 23762 निंबाळकर … 19923 ————————— दुसऱ्या फेरीत मोहिते 3839 मतांनी आघाडीवर ……………………………… तिसरी फेरी
मोहिते …. 22785 निंबाळकर … 20910 ……………………………… तिसऱ्या फेरीत मोहिते 1875 मतांनी आघाडीवर ……………………………….. तिसऱ्या फेरी अखेरीस 10312 मतांनी धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर
-
उदयनराजेंना कराड उत्तर आणि साताऱ्यातून आघाडी
कराड उत्तर, साताऱ्यातून उदयनराजेंना आघाडी मिळाली आहे. वाई, पाटण, कराड दक्षिण, कोरेगावमधून शशिकांत शिंदेना आघाडी मिळाली आहे. कराड उत्तर मधून उदयनराजेंना पहिल्या फेरीत 2 हजार मते जास्त आहेत.
-
माळशिरस तालुक्यातील दोन ईव्हीएम मशीन पडल्या बंद
माळशिरस तालुक्यातील दोन ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. ईव्हीएम मशीन उघडण्यास दाखवला जातोय एरर. माढा मतदार संघाचा तिसरी फेरी थांबवली होती. टेक्निकल टीमकडून ईव्हीएमची तपासणी करण्यात आली.
-
अमोल कोल्हे चौथ्या फेरीत आघाडीवर
शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे शिरुरमध्ये चौथ्या फेरीत आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
-
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 5 हजार मतांनी आघाडीवर
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 29,472 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या राम सातपुते यांना 24,321 मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे 5 हजार 151 मतांनी आघाडीवर आहेत.
-
मुरलीधर मोहोळ पहिल्या फेरीत पुढे
मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या फेरीत 29369 मते मिळाली आहेत. तर रवींद्र धंगेकर 24604 मते मिळाली आहेत. मोहोळ पहिल्या फेरीनंतर चार हजार 765 मतांनी आघाडीवर आहेत.
-
सांगलीत विशाल पाटील 11 हजार मतांनी आघाडीवर
सांगली लोकसभा दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.
-
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. शहर उत्तर , दक्षिण सोलापूर, मंगळवेढा पंढरपूर, मोहोळ या मतदारसंघातून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत.
-
अमोल कोल्हे 63 मतांनी आघाडीवर
शिरूर लोकसभेतील हडपसर विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर डॉक्टर अमोल कोल्हे यांना 5063 मते पडली आहेत. शिवाजी आढळराव पाटील यांना 5000 मते मिळाली आहेत. 63 मतांनी अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
-
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये कांटे की टक्कर
करवीर, दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघात शाहू महाराजांची आघाडी. कागलमध्ये संजय मंडलिक यांची आघाडी. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी, आजरा, चंदगड या विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपती यांची आघाडी. कागल वगळता इतर विधानसभा मतदारसंघात शाहू महाराजांची मोठी आघाडी.
-
फिकर नॉट… रवींद्र धंगेकर यांचा मिसळवर ताव
मतमोजणीला सुरूवात झालेली असताना दुसरीकडे पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पुण्यातील मिसळ हाऊसमध्ये मिसळवर ताव. मिसळचा आस्वाद घेत रवींद्र धंगेकर मोबाईलवर tv9 वर पाहत आहेत निकाल. पोस्टल मतदानामध्ये मुरलीधर मोहोळ आघाडीवर असले तरी काही वेळात निकाल येईल. त्यामध्ये पुणेकरांचा विजय झालेला असेल, असं म्हणत धंगेकरांनी पुन्हा एकदा विजयाचा व्यक्त केला विश्वास.
-
लोकसभा तो झांकी है, विधानसभा अभी बाकी है… पोस्टर्स झळकले
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे तर निकाल आधीच सांगलीच्या कवठेमंकाळ मध्ये विशाल पाटील यांचे खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. मिरज तालुक्यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे किंग मेकर आणि विशाल पाटील खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. लोकसभा तो झांकी है, विधानसभा अभी बाकी है, असे बॅनर वर उल्लेख करत बॅनर कवठेमंकाळच्या चौकात झळकले आहेत.
-
अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदार संघातून आघाडीवर
अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदार संघातून आघाडीवर आहेत. पोस्टल मतदानात अमोल कोल्हे यांना २३९ तर शिवाजी आढळराव पाटील यांना ५५ मते मिळाली आहेत. पोस्टल मतमोजणी अद्यापही सुरूच आहे
-
सांगलीत टपाली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात
सांगलीत टपाली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सांगलीत पहिल्यांदा होणार टपाली मतमोजणीला सुरुवात. 6 हजार 961 टपाली मतदानाची पहिल्यांदा होणार मतमोजणी. मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रात दाखल.
-
मावळ लोकसभेसाठी विधानसभा निहाय मतदान आकडेवारी
1) पनवेल विधानसभा झालेले एकूण मतदान -295995 (23 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार)
2) कर्जत विधानसभा झालेले एकूण मतदान-189854 (25 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार)
3) उरण विधानसभा झालेले एकूण मतदान-214162 (25 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार)
4) मावळ विधानसभा झालेले एकूण मतदान-206943 (25 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार)
5) चिंचवड विधानसभा झालेले एकूण मतदान-322724 (23 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार)
6) पिंपरी विधानसभा झालेले एकूण मतदान-188778 (25 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार)
-
सांगली काहीवेळातच मतमोजणीला सुरुवात होणार
सांगलीत सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी एकाच वेळी होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. साडेआठ वाजता प्रत्यक्षात ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल लावण्यात आलेले आहे, एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. काही टेबलांवर 22 तर काही टेबलांवर 25 फेऱ्या होणार आहेत. अंतिम निकाल 5 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.
-
मिरजमध्ये थोड्याच वेळात मतमोजणी, विशाल पाटील मतदान केंद्रावर
सांगली लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील मिरज मतदान केंद्रावर दाखल. काही वेळात सुरू होणार टपाली मतमोजणी.
-
थोडीशी धाकधूक आहे, संजोग वाघेरे यांची पहिली प्रतिक्रिया
मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मतदार राजा महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय देईल. निकाल असल्याने थोडीशी धाकधूक आहे. दिवसभर पक्ष कार्यालयात बसून निकालावर लक्ष असेल, नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहे, असं संजोग वाघेरे म्हणाले.
-
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 8 वाजता सुरू होणार
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. 8 वाजता पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे. 8.30 वाजता EVMची मोजणी सुरू करण्यात येणार आहे. एकूण 28 फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येणार आहे. 1200 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीच्या हॉलमध्ये उपस्थित असणार आहेत.
-
Pune Lok Sabha Election Result 2024 : पुण्यातील तिरंगी लढतीत कोण उधळणार गुलाल?
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे यांच्यात ही लढत आहे. तिघांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published On - Jun 04,2024 1:14 AM