स्मृती इराणींनी ज्या मतदारसंघात नुकतंच बनवलं घर; जनतेनं तिथूनच केलं ‘बेघर’

2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांचा 4,68,514 मतांनी विजय झाला होता. तर काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 4,13,394 लोकांनी मत दिलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या केएल शर्मा यांनी स्मृती इराणींना दणका दिला आहे.

स्मृती इराणींनी ज्या मतदारसंघात नुकतंच बनवलं घर; जनतेनं तिथूनच केलं 'बेघर'
Smriti IraniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 6:36 PM

लोकसभा निवडणूक निकालातील आतापर्यंतचे कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशच्या निकालाने अनेकांना चकीत केलं. 80 लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यांमध्ये भाजपा 40 जागांपर्यंतही पोहोचू शकत नाहीये. तर इंडिया आघाडी 40 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं होतं. मात्र यंदा स्मृती इराणी हरताना दिसत आहेत. फक्त निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडा समोर येणं बाकी आहे. इराणींना काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी जोरदार टक्कर दिली आहे. स्मृती इराणींनी नुकतंच अमेठीमध्ये स्वत:चं घर बनवलं होतं. मात्र जनतेनं त्यांना त्याच मतदारसंघातून आता बेघर केलं आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात टक्कर झाली होती. स्मृती इराणींनी राहुल यांना हरवत 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा सूड घेतला होता. आता काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना हरवत पुन्हा एकदा अमेठीची जागा आपल्याकडे घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्मृती इराणींनी किशोरी लाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी किशोरी लाल शर्मा यांना ‘चौकीदार’ म्हटलं होतं. यंदा काँग्रेस अमेठीसोबतच रायबरेली मतदारसंघातूनही हरणार, असा विश्वास इराणींनी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांनी रायबरेली या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी दिनेश प्रताप सिंह यांना हरवलं आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा ज्याप्रकारे परायज झाला, त्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. विविध एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 68 जागा सांगितल्या गेल्या होत्या. तर इंडिया आघाडीला फक्त 12 जागा मिळणार असल्याचा अंदाज होता. मात्र निवडणुकीच्या निकालाने एक्झिट पोल्सना ‘फोल’ ठरवत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीनेही या निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने पाच जागा जिंकल्या होत्या. यावेळी 34 जागांवर सपा आघाडीवर आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.