‘प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला’ मनसे नेते म्हणतात, ‘पर्याय उपलब्ध असतात’
Punjab Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबमध्ये 2017 साली भाजपला तीन काँग्रेसला 77, अकाली दलाला 15 आणि आपला 20 जागा मिळाल्या होत्या.
मुंबई : मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या (5 State Assembly Election Result) पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे, असं त्यांनी म्हटलंय. इतकंच काय तर पर्या उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असंहीते म्हणालते. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पंजाबमधील मतमोजणी (Punjab Assembly Election Result LIVE 2022) दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनंतर विधान केलं आहे. सकाळी 10.30 वाजेपर्यंत समोर आलेल्या मतमोजणीनुसार, सुरुवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा तब्बल 80 पेक्षा जास्त जागांसह पुढे होते. तर भाजप पाच, काँग्रेस 13 आणि अकाली दलाला 8 जागी आघाडी होती. तर 15 अपक्ष उमेदवार हे आघाडीवर होते. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आप 88 जागांवर आघाडीवर होती.
प्रस्थापितांविरोधात मतदान
पंजाबमधील स्थानिक पक्षांना नाकारत, तसंच प्रस्थापितांविरोधात मतदान झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे. शेतकरी आंदोलन, पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यावरुन गाजलेलं राजकारण या सगळ्यामुळे पंजाबच्या निवडणुका गाजल्या होत्या. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही डोकं वर काढू लागली होती. या सगळ्या घडामोडींत आज जे निकाल हाती आले आहेत, त्या अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबामध्ये निवडणुका लढवल्या होत्या. भगवंत मान हे स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून सगळ्यांना माहीत आहेत. त्यांच्या राजकीय इन्ट्रीवरुनही बरीच चर्चा रंगली होती.
काँग्रेसच्या जागा घटल्या!
पंजाबमध्ये 2017 साली भाजपला तीन काँग्रेसला 77, अकाली दलाला 15 आणि आपला 20 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, आज सुरु असलेल्या मतमोजणीनंतर आपच्या जागांमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. इतकंच काय तर आपचं सरकार आता पंजाबमध्ये स्थापन होऊ शकतं, अशीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या जागा प्रचंड घटल्या आहेत.
सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे. पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 10, 2022
चन्नी पिछाडीवर
पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी हे देखील पिछाडीवर असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार पंजाबमध्ये जितक्या जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यापेक्षा जास्त जागा आपला मिळत असल्याचं मतमोजणीच्या कलांमधून दिसतंय. दरम्यान, अंतिम निकालानंतर पंजाबमधील राजकीय स्थिती स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
संबंधित बातम्या :
वाचा पंजाब विधानसभा निकालाचे लाईव्ह अपडे्स – LIVE Update
मुख्यमंत्र्यांवर पराभवाची टांगती तलवार; सावंत, धामी, बीरेन यांचे काय होणार?
पंजाबात आपची विजयी घोडदौड, दिल्लीच्या कार्यालयात फुलांचा घमघमाट