Punjab Election 2022: ना सिद्धू, ना जाखड, चरणजीत सिंग चन्नीच काँग्रेसचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, राहुल गांधी यांची मोठी घोषणा

आम आदमी पार्टीने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसही पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करणार का? की मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकून नंतर नवा मुख्यमंत्री राज्याला देणार? असा सवाल केला जात होता.

Punjab Election 2022: ना सिद्धू, ना जाखड, चरणजीत सिंग चन्नीच काँग्रेसचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, राहुल गांधी यांची मोठी घोषणा
ना सिद्धू, ना जाखड, चरणजीत सिंग चन्नीच काँग्रेसचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, राहुल गांधी यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 6:03 PM

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसही पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करणार का? की मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकून नंतर नवा मुख्यमंत्री राज्याला देणार? असा सवाल केला जात होता. तसेच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला तर तो चेहरा कोणता असेल? चरणजीतसिंग चन्नी? नवज्योत सिंग सिद्धू? (Navjyot Singh Siddhu) की सुनील जाखड? यापैकी कोण मुख्यमंत्रीपदाचा काँग्रेसचा चेहरा असेल असा सवालही केला जात होता. मात्र, या सर्व सवालांचं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा चरणजीत सिंग चन्नीच (Charanjit Singh Channi) असणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाच्या रेसला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंजाबमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राहुल गांधी यांनी लुधियानातील व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. काँग्रेसमध्ये अनेक हिरे आहेत. मी 2004 पासून मी राजकारणात आहे. माझ्याकडेही थोडा अनुभव आणि दूरदर्शीपणा आहे. सीएमपदासाठी काँग्रेसमधील हिऱ्यांची निवड करणं तशी कठिण टास्क आहे. काही लोक आहेत. जे आमच्या पक्षाला बदनाम करत आहेत. कोणताही नेता 15 दिवसात जन्माला येत नाही. जे टीव्हीवर दिसतात तेच नव्हे तर संघर्ष करणाराही राजकीय नेता बनतो, असं राहुल गांधी म्हणाले.

चन्नींना अहंकार नाही

चन्नी मुख्यमंत्री झाले. त्यांच्यामध्ये कोणताही अहंकार नाही. ते लोकांमध्ये जातात. तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांमध्ये मिसळताना पाहिलंय का? रस्त्यावर कधी कुणाला मदत करताना पाहिलं काय? ते करणार नाहीत. कारण ते पंतप्रधान नाहीत तर राजा आहेत, असं सांगतानाच चरणजीत सिंग चन्नी हेच काँग्रेसचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असतील, असं राहुल यांनी जाहीर केलं.

पंजाबच्या नागरिकांनी काम सोपं केलं

पंजाबच्या लोकांनी सांगितलं गरीब घरातील मुख्यमंत्री हवा आहे. गरीबांचं म्हणणं ऐकून घेणारा मुख्यमंत्री हवा. पंजाबला समजून घेणारा मुख्यमंत्री पाहिजे. कारण पंजाबला अशा व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणं कठिण काम होतं. मात्र पंजाबच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी हे काम सोपं केलं, असं त्यांनी सांगितलं.

मी केवळ माध्यम असेल

तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नाव घोषित झाल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी आभार मानले. तुमच्या कृपेने माझं सर्व काम होत आहे. तुम्हीच करत आहात आणि नाव माझं होत आहे. मला हिंमत, पैस आणि साथ पंजाबच्या लोकांची हवी आहे. तरच मी ही लढाई लढू शकेल. मी कोणतंही चुकीचं काम करणार नाही. चुकीच्या मार्गाचा पैसा घरात येऊ देणार नाही. केवळ पारदर्शकता राहील. पंजाबला सोन्या सारखं चमकवेल. नवज्योत सिंग सिद्धूंचं मॉडल पंजाब बनवेल. सिद्धूंना जे हवं तेच करू. जाखड यांची लीडरशीप पंजाबला पुढे घेऊन जाईल. मी केवळ माध्यम बनून राहील, असं चन्नी म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने एक ट्विट करत आता पंजाबची लढाई एकत्र मिळवून लढवू. त्यातच पंजाबी जनतेचं भलं आहे, असं म्हटलं आहे. चरणजीत सिंग चन्नी आणि सिद्धू यांची गळाभेट घेतानाच फोटो ट्विट करत त्यावर ही कमेंट करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Punjab Election 2022 : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य, कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

Assembly election 2022 | पंजाब काँग्रेसमधील चन्नी-सिद्धू वाद चव्हाट्यावर, उमेदवारीवरून मतभेद

Punjab Assembly Election 2022: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांसह दहा ठिकाणी छापेमारी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.