Election Result 2022 Live: पंजाबमधील बंपर विजयाने ‘आप’ला लॉटरी, राज्यसभेवर 7 सदस्य निवडून जाणार; वाचा गणित काय?
Election Result 2022 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये बंपर विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये आपचे 92 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आपचीच सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चंदीगड: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये बंपर विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये (Punjab Assembly Election 2022) आपचे 92 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आपचीच सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयामुळे आम आदमी पार्टीला (aap) बंपर लॉटरीच लागली आहे. आपला केवळ पंजाबमध्येच सत्ता मिळणार नाही तर पंजाबमधून त्यांचे राज्यसभेवर सात सदस्यही निवडून जाणार आहेत. जुलै अखेरपर्यंत आपचे सात सदस्य राज्यसभेवर निवडून गेलेले दिसतील. त्यामुळे राज्यसभेतील आपची सदस्य संख्या 7 वरून 10 वर पोहोचेल, असं सूत्रांनी सांगितलं. सध्या राज्यसभेत आपचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे आता राज्यसभेतही आप मजबूत होणार आहे. दरम्यान, आपचे खासदार हे भगवंत मान यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे त्यांना आता संगरुर लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागणार असून या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
प्रताप सिंग बाजवा, शमशेर सिंग दूलो, सुखदेव सिंग ढिंडसा, नरेश गुजराल आणि अंबिका सोनी आदी नेते पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे. पंजाबमध्ये या पाच जागांवर पुढील महिन्यात एप्रिलमध्ये निवडणुका होतील. जर आजच्या निवडणुकीचा कल असाच राहिला म्हणजे आपला 90 किंवा 95 जागा मिळाल्या तर आपचे पाच सदस्य एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. जुलैमध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणुका होत आहेत. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत ही संख्या सातवर जाऊ शकते. त्यामुळे राज्यसभेतील आपच्या सदस्यांची संख्या दहा होईल.
इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई। pic.twitter.com/BIJqv8OnGa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
काय आहे गणित?
पंजाबमध्ये एका राज्यसभेच्या जागेसाठी 18 ते 20 आमदारांच्या मतांची गरज आहे. त्यामुळे आपचे चार ते पाच सदस्य राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकतात. तर दुसरीकडे सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. राज्यसभेवर सदस्य निवडून देता येईल एवढे आमदारही काँग्रेसचे निवडून येताना दिसत नाहीये.
देश में ईमानदार राजनीति की नई उम्मीदों की ये शानदार जीत आप सभी को मुबारक हो | LIVE https://t.co/di2lAP83FJ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
राज्यसभेत महत्त्वाचा रोल
पंजाबमधून आपचे सात सदस्य राज्यसभेवर गेल्यास आपचं राज्यसभेतील संख्याबळ 10 होणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या विधेयकांवर आपची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. काँग्रेसचे राज्यसभेत 34 सदस्य आहेत, तर भाजपचे 97 सदस्य आहेत.
संबंधित बातम्या:
Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट