Uttar pradesh assembly election 2022: अखिलेश यादव आझमगडच्या गोपालपुरातून विधानसभा लढणार
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढणार आहेत. अखिलेश यादव आझमगडमधील गोपालपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. ते आताही आझमगडमधूनच खासदार आहेत.
लखनऊः समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) ही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवित आहेत. (Uttar Pradesh Assembly elections) ते आझमगडमधील गोपालपूरातून (Gopalpur Legislative Constituency) आपले नशीब अजमविणार आहेत. आताही ते आझमगडचे खासदार आहेत. याआधी नोव्हेंबर महिन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले होते की, यावेळी ते विधानसभा लढविणार नाहीत. त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.
माध्यमांमधून त्यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी आता फक्त समाजवादी पक्षाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
मोहसिन रजा यांचा टोमणा
उत्तर प्रदेशचे मंत्री मोहसिन रजा यांनी अखिलेश यादव यांच्या निवडणूक लढविण्यावर मत व्यक्त करताना म्हणाले की, त्यांना निवडणूक लढविणे आवडते कारण, निवडणूकीसाठी उभा राहणारे लोक नेहमीच निवडणूकीच्या रिंगणात दिसतात. अखिलेश यादव ही निवडणूक ते मनापासून लढणार नाहीत, तरीही त्यांनी धाडस केले आहे कारण, भाजपकडून मुख्यमंत्री योगी आणि उपमुख्यमंत्री केशव जी यांनी निवडणूकीसाठी विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच अखिलेश यादव यांच्या पक्षातील सदस्यांनी त्यांना नक्कीच सवाल केला असेल की, ही निवडणूक तुम्ही का लढवित नाही.
पक्षाच्या निर्णयानंतर ‘अखिलेश’ रिंगणात
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि आझमगडचे खासदार अखिलेश यादव जर उत्तर प्रदेश विधानसभा लढविणार असतील तर त्यांना त्यांची खासदारकी सोडावी लागणार आहे. यावर निवडणूकीवर माध्यमांबरोबर संवाद साधताना त्यांनी सांगितले की, पक्षाच्या निर्णयानंतर आपण विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहोत.
‘समाजवादी’ला मिळणार ‘तृणमूल’ची साथ
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत टीएमसी समाजवादी पक्षासोबत जाणार आहे. त्यासाठी अखिलेश यादव यांच्या समर्थनासाठी टीएमसीकडून जाहीर सभाही घेतली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच समाजवादी पक्षाकडून भाजपला हरविण्यासाठी अन्य पक्षांसोबत हातमिळविणी करण्याची राजकीय खेळी सुरू केली आहे. राजकारणाच्या या पटलावर समाजवादी पक्षाला आता टीएमसीकडून जोरदार पाठींबा मिळत आहे. अखिलेश यादव यांच्या समर्थनासाठी यावेळी ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशमध्ये सभाही घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडून एका जागेवर उमेदवारी जाहीर करत आहे. तरीही समाजवादी पक्षाकडून छोट्या छोट्या पक्षांबरोबर हातमिळवणी करण्यात येत आहे. या गठबंधनामध्ये सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनवादी पक्ष (समाजवादी), राष्ट्रीय लोकदल (आरएलडी), अपना दल (कमेरावादी) प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया), महान दल, टीएमसी या पक्षांचा समावेश असणार आहे. या गठबंधनामध्ये फक्त चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाचा अजून निर्णय झाला नाही.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी एकूण ४०३ जागा आहेत. यासाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. ते सात टप्पे पुढीलप्रमाणे ; १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर निवडणूकीचा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे.
संबंधित बातम्या