काँग्रेसचा आघाडीला विरोध, शिवसेना पडली एकटी
गोव्यात काँग्रेस बरोबर आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ते थोडे वेगळ्याच लाटेवर आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. सगळं ठिक आहे, त्यांना जसं तरंगायचं तसं तरंगू दे जेव्हा तडाखे बसतील तेव्हा त्यांना जाग येईल असा टोमणा संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला.
गोवा – महाराष्ट्राप्रमाणे (maharashtra) गोव्यातही (goa) आघाडी व्हावी अशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची इच्छा होती. परंतु काँग्रेस त्याला दाद देत नसल्याने शिवसेना एकटी पडल्याचं गोव्यात पाहावयास मिळत आहे. गोव्यात येत्या 14 तारखेला मतदान होणार आहे. त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने तेथील काँग्रेस आणि तृणमृल काँग्रेस यांच्याशी चर्चा असल्याची म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेना एकटी किती जागांवर उमेदवारी जाहीर करते हेही महत्त्वाचे आहे. या सगळ्या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत हे गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर असल्याचे म्हटले जात आहे.
गोव्यात काँग्रेस बरोबर आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ते थोडे वेगळ्याच लाटेवर आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. सगळं ठिक आहे, त्यांना जसं तरंगायचं तसं तरंगू दे जेव्हा तडाखे बसतील तेव्हा त्यांना जाग येईल असा टोमणा संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला. गोव्यात शिवसेना स्वतंत्र लढेल, तसेच शिवसेना इथे पहिल्यांना निवडणूक लढवत नाहीये, प्रत्येक निवडणुकीवेळी शिवसेनेची ताकद गोव्यात वाढत असल्याचे सुध्दा संजय राऊत यांनी सांगितले.
भाजप ज्यावेळी पहिल्यांदा गोव्यात निवडणुक लढला होता, त्यावेळी त्यांचीही परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा भाजप हा फक्त 13 जागांवर लढला होता. विशेष म्हणजे त्यावेळी सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. सुरूवातीच्या काळात अनेक पक्षांसोबत असे होते. लोकसभेत भाजपच्या साधारण साडेतीनशे उमेदवारांचे जादुई आकडा न गाठल्याने डिपॉझिट जप्त झाले होते. डिपॉझिट जप्त होते, म्हणून निवडणूक लढायची नाही का ? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
गोव्यात कधीही भाजपचे स्वबळावर सरकार झालेले नाही, त्यामुळे त्यांना प्रत्येकवेळी इतर पक्षाचा आधार घ्यावा लागला आहे. भाजपवरती गोव्यात जनता नाराज आहे, त्यामुळे कधीही बहुमत सिध्द करू शकलेले नाहीत. गोव्यात बहुमतासाठी फोडा आणि राज्य करा अशी आत्तापर्यंत भाजपची भूमिका राहिलेली आहे, त्यामुळे आम्ही कधीही चिंता करीत नाही असंही संजय राऊत म्हणाले.