Satara Election Final Result 2024: सातारकरांनी राखला गादीचा मान, उदयराजेंकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव

Satara Election Final Result 2024 : साताऱ्यात कोणाला तिकीट मिळणार येथून सुरु झालेली चुरख विजयापर्यंत टिकून राहिली. भाजपकडून उदयनाराजे भोसले यांना तिकीट मिळाल्यानंतर राष्ट्रवादी पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

Satara Election Final Result 2024: सातारकरांनी राखला गादीचा मान, उदयराजेंकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 5:36 PM

सातारा लोकसभा मतदारसंघा भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे मैदानात होते. एक्झिट पोलमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल असा दावा केला जात होता. पण तो चुकीचा ठरला. मतमोजणी सुरु झाल्यापासून दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत होती. त्यामुळे विजय कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता उदयनराजे भोसले यांनी गेल्या निवडणुकीत वचपा काढला आहे. त्यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. अखेर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी मुसंडी मारली आहे.

सातारा लोकसभेसाठी तिकीट मागत असताना आपण येथून विजयी होणारच असं उदयनराजे भोसले यांनी विश्वास व्यक्त केला होता. पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून राजेंंनी दिल्लीत मुक्काम ठोकावा होता. मावळते खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने शरद पवार गटापुढे कोणाला उमेवारी द्यावी म्हणून संभ्रम होता. त्यानंतर त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर कांटे की टक्कर होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. एक्झिट पोलमध्येही उदयनराजे भोसले पराभूत होईल अशीच शक्यता वर्तवली गेली होती. पण आता भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित झाला आहे. या हायहोल्टेज लढतीत अखेर उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली आहे. साताऱ्याचा गड राखण्यात त्यांना यश मिळाले आहे.

कराड दक्षिण मतदारसंघात उदयनराजे यांना अधिकच मताधिक्य मिळाले असून असुन विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्याचं आत्मचिंतन करावं असं सातारा लोकसभेचे भाजपचे प्रभारी डॉ अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

पहिली फेरीत – उदयराजे भोसले २७ हजार ५५६ मते, शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते दुसऱ्या फेरीत – उदयनराजे यांना ५३ हजार ३०४ मते, शशिकांत शिंदे यांना ५७ हजार ७४६ मते तिसऱ्या फेरीत – उदयनराजे यांना ७४ हजार ३१० मते, शशिकांत शिंदे यांना ८२ हजार ९४६ मते चौथ्या फेरीत उदयनराजे यांना ९९ हजार २७३ मते, शशिकांत शिंदे यांना १ लाख १२ हजार ४७५ मते पाचव्या फेरीत उदयनराजे यांना १ लाख २८ हजार ३७५मते, शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ मते

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.