ओबीसी नेत्यांनी भाजपा सोडली, त्यानंतरचं राजकीय गणित असं असणार ?
ओमप्रकाश राजभर हे मागासवर्गीय कल्याण मंत्री होते. तेव्हा उत्तर प्रदेशातील 7 लाख विद्यार्थ्यांना 700 कोटी आणि 25 लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 700 कोटींचे बजेट जाहीर केले होते.
लखनऊ – ओबीसी (OBC) नेत्यांनी भाजप सोडल्यानंतर होणा-या नुकसानाचे संपूर्ण गणित ओमप्रकाश राजभर (OMPRAKASH RAJBHAR) यांनी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. जे नेते पक्ष सोडून समाजवादी पार्टीतमध्ये (SAMAJWADI PARTY) गेले किंवा सपाच्या आघाडीत सामील झाले आहेत. त्यामुळे नेत्यांची समाजात पकड मजबूत आहे, ते सर्व तळागाळातील नेते आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे.
मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयात मागास जातीची मते अधिक मिळाली होती. त्यावेळी मी भाजपसोबत होतो, केशवप्रसाद मौर्य यांच्यामुळे मागासलेल्यांनी भाजपला मतदान केले होते असं ओमप्रकाश राजभर यांनी मुलाखतीतं सांगितलं.
त्यावेळी केशवप्रसाद मौर्य मुख्यमंत्री होतील, असा विश्वास मागास जातीच्या मतदारांना वाटत होता. निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केले आण केशवप्रसाद यांना टाळल्याने मागासवर्गीयांची नाराजी सुरू झाली. तसेच पोलिस ठाण्यात गैरव्यवहार सुरू झाला, तसेच शिक्षक भरतीत मागासवर्गीय व दलितांच्या हक्काची लूट झाली. या सर्व कारणांमुळे युपीत भाजपच्या विरोधात दलितांची नाराजी सुरू झाली. मागच्या 5 वर्षात झालेल्या नाराजी यंदा भाजपला भोवल्याशिवाय राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
ओमप्रकाश राजभर हे मागासवर्गीय कल्याण मंत्री होते. तेव्हा उत्तर प्रदेशातील 7 लाख विद्यार्थ्यांना 700 कोटी आणि 25 लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 700 कोटींचे बजेट जाहीर केले होते. त्यावेळी राजभर यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. पण नकार मिळाल्याचं मी सगळ्या मागास समाज्यातील मंत्र्यांना तात्काळ सांगितले. त्यानंतर हे प्रकरण चांगलेचं तापले होते. या प्रकरणामुळे युपीतील सामान्य आणि मागासवर्गीय समाज प्रचंड नाराज झाला होता.
अशा अनेक समस्या युपीत आहेत. शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे. बेरोजगारी आणि आरक्षणामुळे विद्यार्थीही चिंतेत होते. ज्यावेळी विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे पोहोचले. पण दोन्ही ठिकाणी पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. स्वतंत्र देव सिंह हे न्याय निवाडा करतील म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. परंतु पदरी निराशा आल्याने दलित विद्यार्थ्यांच्यामध्ये भाजप विरोधी निराशा वाढली.
जेव्हा भाजपला सरकार स्थापन करावेसे वाटले. तेव्हा दारा चौहान यांच्याकडे भाजपने मोठे नेते म्हणून पाहिले, स्वामी प्रसाद मौर्य, ओमप्रकाश राजभर यांच्याकडेही मोठे नेते म्हणून पाहिले, आता आम्ही तिघांनीही पक्ष सोडल्यामुळे आम्हाला भाजपकडून छोटा नेता म्हटले जात आहे. यावर ओमप्रकाश राजभर म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य हे मोठे नेते आहेत, तळागाळातील नेते आहेत, लोकांमध्ये त्यांची पकड आहे. त्यामुळे भाजपचा तोटा होणार हे नक्की.
पुढे ओमप्रकाश राजभर म्हणाले की, “मी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्याशी भांडू लागलो, त्यानंतर अमित शहा यांना दोनदा लखनौला येऊन बैठक घ्यावी लागली. हे सगळं चुकीचे घडत असल्याचे मी त्यावेळी भाजपमधील सर्व मागास समाजाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना सांगितले होते. तर ते म्हणाले की तुमचा स्वतःचा पक्ष आहे, तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहात. तुमचा मुद्दा आम्ही आमच्या पक्षाच्या मंचावर ठेवू. मी पक्ष सोडला आणि मागासलेल्या समाजातील नेत्यांना विचारले की तुम्ही काय करणार? तर ते म्हणाले की, आता आम्ही पक्ष सोडू शकत नाही, कारण आम्हाला सीबीआय आणि ईडीच्या खोट्या प्रकरणात अडकवले जाईल. त्यानंतर मी भाजपच्या मागासलेल्या नेत्यांना भेटत राहिलो. ६ महिन्यांपूर्वी काय करायचे, असे पुन्हा विचारले असता, त्या नेत्यांनी निवडणूक आचारसंहिता लागू होऊ द्या, मग निर्णय घेऊ,” असे सांगितले.