साडी नव्हे, बरमुडा नेसा, ममता बॅनर्जींवर टीका करताना ‘या’ भाजप नेत्याची जीभ घसरली
पश्चिम बंगाल निवडणुकीत हाणामारी होत असतानाच आता राजकीय नेत्यांनी बोलण्याचं ताळतंत्रही सोडलं आहे. (Wear Bermudas: BJP Bengal Chief's Shocking Remark On Mamata Banerjee)

कोलकाता: पश्चिम बंगाल निवडणुकीत हाणामारी होत असतानाच आता राजकीय नेत्यांनी बोलण्याचं ताळतंत्रही सोडलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजपचे नेते दिलीप घोष यांची जीभ घसरली. ममता दीदींनी साडी नव्हे बरमुडा परिधान केला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे टीएमसी कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (Wear Bermudas: BJP Bengal Chief’s Shocking Remark On Mamata Banerjee)
निवडणूक प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला मार लागला होता. त्यामुळे त्यांनी काही दिवस व्हिलचेअरवरून प्रचार केला. त्यावर पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी आक्षेपहार्य विधान केलं. प्लास्टर कापलेलं आहे. क्रॅप बँडेज बांधलेलं आणि पायवर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेलं कधीच कुणाला पाहिलेलं नाही. पायच उघडे ठेवायचे असतील तर साडी तरी का नेसली? बरमुडा का नाही परिधान केला? असं धक्कादायक वक्तव्य दिलीप घोष यांनी केलं आहे.
अन् या माकडांना बंगाल जिंकणार असं वाटतंय
घोष यांच्या या विधानावर पश्चिम बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. घोष यांच्या या विधानावर टीएमसीने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून घोष यांचा समाचार घेतला आहे. ‘भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत ममता दीदीने साडी का नेसली? असा सवाल केला आहे. त्यांनी आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असं घोष यांनी म्हटलं आहे आणि या माकडांना वाटतंय ते बंगाल जिंकतील?’ असा सवाल मोईत्रा यांनी केला आहे.
या आधीही टीका झाली
ममता बॅनर्जी यांना मार लागल्यानंतर त्यावर टीका झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर ममता दीदींनी त्यांचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर, ममता दीदी सहानुभूती मिळवून मते मागण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. मात्र, आज भाजपच्या बंगालच्या अध्यक्षाची जीभ अधिकच घसरली.
नंदीग्राममध्ये जखमी झाल्या
ममता बॅनर्जी 10 मार्च रोजी नंदिग्राममध्ये नामांकन अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. अर्ज भरल्यानंतर त्या संध्याकाळी 6 वाजता मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून निघाल्यानंतर त्या गाडीत बसल्या होत्या. यावेळी हल्ला झाल्याने त्यांच्या पायाला मार लागला. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता. (Wear Bermudas: BJP Bengal Chief’s Shocking Remark On Mamata Banerjee)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/363zMEtrB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
West Bengal Assam Opinion Poll LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं बहुमताजवळ,आसाममध्ये भाजप पुन्हा
(Wear Bermudas: BJP Bengal Chief’s Shocking Remark On Mamata Banerjee)