West Bengal Election 2021 : मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढा; ममता बॅनर्जींच्या कथित ऑडिओने खळबळ

पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सध्या ऑडिओ क्लीपचा सर्वाधिक बोलबाला आहे. (BJP to meet EC over Mamata Banerjee's Sitalkuchi Audio tape)

West Bengal Election 2021 : मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढा; ममता बॅनर्जींच्या कथित ऑडिओने खळबळ
ममता बॅनर्जी 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 11:44 AM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सध्या ऑडिओ क्लीपचा सर्वाधिक बोलबाला आहे. आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायर झाल्यानंतर पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालेलं असतानाच आता ममता बॅनर्जी यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपने खळबळ उडवून दिली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ममतादीदी मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढण्याचे उमेदवारांना सांगत आहेत. त्यामुळे ममता दीदींवर चौफेर टीका होत आहे. (BJP to meet EC over Mamata Banerjee’s Sitalkuchi Audio tape)

ही ऑडिओ क्लिप भाजपने व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये ममता बॅनर्जी या शीतलकुची विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराशी चर्चा करत आहेत. त्यात त्या सीआरपीएफच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसोबत रॅली काढण्यास सांगत आहेत. भाजपने ही ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहांवरही आता टीएमसी राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर टीएमसीने ही ऑडिओ क्लिप बोगस असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारचं कोणतंच संभाषण झालं नाही, असं टीएमसीने म्हटलं आहे. तर, या ऑडिओ क्लिपबाबत निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

दंगल भडकावण्याचा प्रयत्न

दरम्यान, ही क्लिप खरी आहे की नाही माहीत नाही. मात्र, त्यातील आवाजावरून ममता बॅनर्जी आणि शीतलकुचीचे टीएमसीचे उमेदवार प्रीतम राय यांच्यात संभाषण सुरू असल्याचं दिसून येतं. मृतदेहांसोबत रॅली काढण्यास सांगून ममता बॅनर्जी या दंगल भडकावण्यास उत्तेजन देत असल्याचा आरोप भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.

कुचबिहारचे पोलीस अधीक्षक आणि सीआरपीएफ जवान फसतील अशा प्रकारे हे प्रकरण वाढवा, असं ममता बॅनर्जी सांगत असल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. केवळ अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

नड्डा संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला आहे. केवल राजकारणासाठी ममता बॅनर्जी मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृत्याबाबत टीएमसीला लाज वाटली पाहिजे, असा संताप नड्डा यांनी व्यक्त केला आहे. (BJP to meet EC over Mamata Banerjee’s Sitalkuchi Audio tape)

संबंधित बातम्या:

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगा विरुद्ध ममता बॅनर्जी आक्रमक, परवानगीशिवाय धरणं आंदोलन सुरु

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी!

West Bengal Election: मतदानावेळी बंगालमध्ये हिंसा उसळली, सीआयएसफ जवानांचा गोळीबार; पाच ठार

(BJP to meet EC over Mamata Banerjee’s Sitalkuchi Audio tape)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.