VIDEO: कोबरा हूँ… हक छीनेगा तो खड़ा हो जाऊंगा; मिथुन चक्रवतींचा भाजपच्या रॅलीतून हुंकार!

कोलकाताच्या ब्रिगेड ग्राऊंडवर आज भाजपची मोठी रॅली पार पडली. (I'm A Pure Cobra: What Actor Mithun Chakraborty Said After Joining BJP)

VIDEO: कोबरा हूँ... हक छीनेगा तो खड़ा हो जाऊंगा; मिथुन चक्रवतींचा भाजपच्या रॅलीतून हुंकार!
Mithun Chakraborty
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 5:29 PM

कोलकाता: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसवर नाव न घेता घणाघाती हल्ला चढवला. मी कोब्रा आहे, कुणी आमचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर फना काढून उभा राहिल, असा इशाराच मिथुन चक्रवर्ती यांनी दिला. (I’m A Pure Cobra: What Actor Mithun Chakraborty Said After Joining BJP)

कोलकाताच्या ब्रिगेड ग्राऊंडवर आज भाजपची मोठी रॅली पार पडली. या रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मोदी रॅलीला येण्यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी स्टेजवर येऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्या गळ्यात भाजचं निवडणूक चिन्ह असलेला शेला देण्यात आला. त्यानंतर मिथुन यांनी भाजपचा झेंडा फडकवला आणि हात उंचावून लोकांना अभिवादन केला.

बंगालमध्ये राहणारे सर्वचजण बंगाली

थोडे शांत व्हा. मला बोलू द्या. मी जोडाबगान ठाणे रहिवासी आहे. त्यामुळे या परिसरात पोस्टमनही गोंधळून जायचा. त्यावेळी आयुष्यात काही तरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता हे स्वप्न पूर्ण होईल, असं वाटतंय. स्वप्न केवळ पाहण्यासाठी नसतं तर ते पूर्ण करण्यासाठी असतं. मी बंगाली आहे. त्याचा मला अभिमान आहे. बंगालमध्ये राहणारे सर्वचजण माझ्यासाठी बंगाली आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुमचा हक्क आहे. तुमचा हा अधिकार कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तुमच्यासाठी उभे राहू, असं मिथुन म्हणाले.

स्वप्न पूर्ण होतंय

त्यानंतर त्यांनी बंगालच्या जनतेला संबोधित केलं. मी 18 वर्षाचा होतो. तेव्हापासून गरिबांना मदत करावी असं मला वाटत होतं. आज माझं हे स्वप्नही पूर्ण झालं आहे. जर कुणाचा अधिकार हिसकावून घेतला जात असेल तर मी त्यासाठी उभा राहिल. मी एक नंबरचा कोब्रा आहे. दंश मारला तर फोटो बनून जाल, अशा इशाराही त्यांनी दिला. बंगाली असल्याचा मला अभिमान आहे. मी संपूर्णपणे कोब्रा आहे, असंही ते म्हणाले.

ममता बॅनर्जींकडून बंगालच्या जनतेचा विश्वासघात

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली. मला पश्चिम बंगालला येण्याचे मला भाग्य लाभले. या मैदानाने अनेक देशभक्त पाहिले आहेत. तसेच या मैदानाने बंगालच्या जनतेला वेठीस धरणारे लोकं सुद्धा पाहिली आहेत. बंगालच्या जनतेने परिवर्तनाची आस सोडली नाही. येथील जनतेने परिवर्तनासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्यांनी देशाचा विश्वासघात केला, अशी टीका मोदींनी केली. बंगलामध्ये रोजगाराच्या क्षमतेत बदल झाला का? असा सवाल करतानाच माँ, माटी, माणूषची सध्या बंगालमध्ये काय स्थिती आहे, हे सर्वांना माहीत आहे. बंगालमध्ये आजही महिलांवर अत्याचार होतात. मागील दहा वर्षांपासून बंगालमधील अशी एकही महिला नसेल जी कोणत्या न् कोणत्या अत्याचारामुळे रडलेली असेल, असंही ते म्हणाले. (I’m A Pure Cobra: What Actor Mithun Chakraborty Said After Joining BJP)

संबंधित बातम्या:

नंदीग्रामचं नेमकं गणित काय?, 62 हजार मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात?; वाचा दीदी जिंकणार की दादा?

ममता बॅनर्जींच्या पक्षात सहकाऱ्यांचे बंड का?; जुन्या मित्रानेच सांगितली इनसाईड स्टोरी

भाजपचे 57 उमेदवार ठरले, नंदीग्राममध्ये देशातील सर्वात मोठी लढत

(I’m A Pure Cobra: What Actor Mithun Chakraborty Said After Joining BJP)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.