Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election: ममता बॅनर्जी देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री, हॅट्रीक साधणार की विकेट पडणार?; नंदीग्रामचे मतदार देणार कौल

पश्चिम बंगालमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. (mamata banerjee is only one chief minister in india, will she defeat bjp?)

West Bengal Election: ममता बॅनर्जी देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री, हॅट्रीक साधणार की विकेट पडणार?; नंदीग्रामचे मतदार देणार कौल
ममता बॅनर्जी 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 6:59 PM

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. नंदीग्राममध्येही उद्याच मतदान होणार आहे. देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून लढत आहेत. अत्यंत चुरशीच्या या असलेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची हॅट्रीक साधणार की त्यांची विकेट पडणार? हे उद्या नंदीग्रामचे मतदारच ठरवणार आहेत. त्यामुळे नंदीग्राममध्ये काय होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (mamata banerjee is only one chief minister in india, will she defeat bjp?)

आधी डाव्यांविरोधात आता उजव्यांविरोधात

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील डाव्यांचा किल्ला उद्ध्वस्त करून सत्ता मिळवली होती. स्वत:च्या बळावर आणि नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी हा करिश्मा घडवून आणला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांचा लढा थेट डाव्यांच्या विरोधात नसून उजवी विंग समजल्या जाणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी कधीकाळी ममता बॅनर्जींचेच सैनिक असलेल्या शुभेंदू अधिकारी यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. तसेच अधिकारी यांच्या प्रचारात प्राण फुंकण्यासाठी कधीकाळी ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेत पाठवलेल्या अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही भाजपने मैदानात उतरवले आहे. नंदीग्राममध्ये ममता दीदी विरुद्ध शुभेंदू अधिकारी असा थेट सामना होत असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

पहिल्या मुख्यमंत्री

5 जानेवारी 1955 रोजी कोलकात्यात जन्मलेल्या ममतादीदींनी प्रचंड संघर्ष करून राजकीय स्थान निर्माण केलं आहे. अत्यंत साधी राहणीमान असलेल्या ममतादीदींनी माँ, माटी आणि मानुषचा नारा देऊन 2011मध्ये डाव्यांचा किल्ला ढासळून राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता. पाच वर्षानंतर त्या अधिक शक्तीशाली नेत्या म्हणून उदयास आल्या आणि पुन्हा त्या सत्तेत आल्या. आता पुन्हा त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून नंदीग्रामच्या रणसंग्रामात उतरल्या आहेत.

पंतप्रधान पदाच्या दावेदार होणार?

देशात आतापर्यंत केवळ 14 महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. मात्र काळाच्या ओघात त्या सर्वांना सत्ता गमवावी लागली आहे. ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यास आणि टीएमसीची पुन्हा सत्ता आली नाही तर देशातील एकमेव महिला मुख्यमंत्रीही सत्तेतून दूर होणार आहे. मात्र, ममता बॅनर्जी विजयी झाल्या आणि त्यांची सत्ता आली तर त्या देशातील सर्वात शक्तीशाली महिला मुख्यमंत्री आणि महिला नेत्याही ठरणार आहेत. त्याशिवाय त्या देशातील बलाढ्य नेत्या म्हणूनही उदयास येतील. तसेच भावी पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाईल. त्याशिवाय विरोधी पक्षाचं नेतृत्वही त्यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (mamata banerjee is only one chief minister in india, will she defeat bjp?)

संबंधित बातम्या:

भाजपच्या विरोधात एकत्र या, ममता बॅनर्जी यांचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझं गोत्र ‘शांडिल्य’, असदुद्दीन ओवेसी भडकले!

West Bengal Election: भाजपच्या ‘या’ नेत्याला महिला सुरक्षारक्षकांचं संरक्षण कवच; वाचा, कारण काय?

(mamata banerjee is only one chief minister in india, will she defeat bjp?)

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.