दलबदलूंचं चांगभलं, पक्ष बदलताच तिकीटाची लॉटरी; कोण आहेत पक्षांतर केलेले नेते?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पक्षांतर केलं आहे. उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी पक्षांतर केलं. तर काहींना पक्षश्रेष्ठींशी जमलं नाही म्हणून पक्षांतर केलं. काहींनी तर राज्यात नवीन समीकरण उदयाला आल्याने त्यात आपली स्पेस शोधण्यासाठी पक्षांतर केलंय. यातील बहुतेक दलबदलूंना तिकीट देण्यात आलं आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत तिकीट दिल्याचं सांगितलं जात आहे.

दलबदलूंचं चांगभलं, पक्ष बदलताच तिकीटाची लॉटरी; कोण आहेत पक्षांतर केलेले नेते?
sanjay dina patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 12:54 PM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास सर्वच पक्षांनी जागा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी यात आघाडी घेतली आहे. यात अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही इच्छुकांनाही तिकीट देण्यात आलं आहे. तर अनेकांना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडी आणि महायुतीने तिढा असलेल्या जागांचा पेच सोडवण्यासाठी जोरबैठकांवर भर दिला आहे. असं असलं तरी यात सर्वाधिक फायदा दलबदलूंचा झाला आहे. ज्या ज्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात पक्ष बदलला, त्यातील बहुतेकांना तिकीट मिळालं आहे. त्यामुळे दलबदलूंची चांदीच झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने दोन्ही पक्षाचे खासदार दोन गटात विभागले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाकडे उमेदवारांची वाणवा निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांचा फायदा झाला आहे. बंडखोरांच्या जागेवर दुसरा उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात स्वकियांचाच स्वकियांविरोधात लढा पाहायला मिळणार आहे. काही मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना (शिंदे विरुद्ध ठाकरे गट) आणि काही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ( अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट) असा सामना पाहायला मिळणार आहे.

भावना गवळींचं काय होणार?

संजय देशमुख यांनी 22 ऑक्टोबर 2022 मध्ये ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता. त्यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी आहेत. भावना गवळी या शिंदे गटात आहेत. त्यांना तिकीट मिळाल्यास गवळी विरुद्ध देशमुख अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

मावळमध्ये चुरस वाढणार

संजोग वाघेरे-पाटील यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी अजित पवार गटातून ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता. त्यांना ठाकरे गटाने मावळमधून तिकीट दिले आहे. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत. ते शिंदे गटात आहेत. त्यामुळे बारणे विरुद्ध वाघेरे असा सामना या मतदारसंघातून होताना दिसणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाऊसाहेब वाकचौरे टफ देणार?

भाऊसाहेब वाकचौरे यांनी 23 ऑगस्ट 2023मध्ये ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता. त्यांनाही ठाकरे गटाने शिर्डीतून तिकीट दिलं आहे. सदाशिव लोखंडे हे शिर्डीचे खासदार आहेत. ते शिंदे गटात आहेत. त्यांनाच पुन्हा शिर्डीतून तिकीट दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर, आरपीआयचे नेते रामदास आठवलेही शिर्डीतून लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे हे तिकीट कुणाच्या पदरात जाणार हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सलग दोन वेळा या मतदारसंघातून सदाशिव लोखंडे निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अत्यंत टफ फाईट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काकां विरुद्ध पैलवान

ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रहार पाटील यांनी 11 मार्च 2024 रोजी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता. चंद्रहार काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात आल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रहार पाटील हे मल्ल आहेत. डबल महाराष्ट्र केसरी आहेत. आता त्यांचा मुकाबला सांगलीतील विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याशी होणार आहे. संजयकाका पाटील हे भाजपचे खासदार आहेत.

संजय दिना पाटील विरुद्ध कोटेचा

संजय दिना पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केला होता. पाटील यांनी 4 ऑक्टोबर 2019 मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला होता. संजय दिना पाटील हे माजी खासदार आहेत. त्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देण्यात आलं आहे. ईशान्य मुंबईत मनोज कोटक हे भाजपचे खासदार होते. पण त्यांचा पत्ता कापून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.