Hum Aapke Hai Kaun | एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

'हम आपके हैं कौन' चित्रपट 90 च्या दशकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

Hum Aapke Hai Kaun | एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या 'हम आपके हैं कौन'च्या खास गोष्टी
हम आपके हैं कौन चित्रपटाची 27 वर्षे
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 3:02 PM

सूरज बडजात्यांचा (Suraj Badjatya) सुपरहीट चित्रपट ‘हम आप के हैं कौन’ (Hum Aapke Hai Kaun) ला रिलीज होऊन आज 27 वर्षे पूर्ण होत आहेत. 27 वर्षांनंतरही या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. यासोबतच अनुपम खेर (Anupam Kher), आलोक नाथ(Aloknath), मोहनिश बहल (Mohnish Bahl) आणि रीमा लागू(Rima Lagu) सारखे दिग्गज कलाकारही या सिनेमात पाहायला मिळाले होते. (27 years of the release of Suraj Barjatya’s superhit film Hum Aap Ke Hain Kaun)

‘हम आपके हैं कौन’ चित्रपट 90 च्या दशकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘हम आप के हैं कौन’मध्ये दोन कुटुंबांच्या लग्नाची कथा दाखवली होती. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. सलमान खान तरूणांच्या गळ्यातला ताईत होताच पण माधुरीनंही चित्रपटातल्या आपल्या नटखट अदांनी तरूणांना घायाळ केलं होतं. आज या चित्रपटाला रिलीज होऊन 27 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आम्ही तुम्हाला चित्रपटाच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.

1. ‘हम आपके हैं कौन’ चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्या 1982 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘नदिया के पार’चं मॉडर्न व्हर्जन आहे.

2. लेखक आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना हा चित्रपट लिहीण्यासाठी 2 वर्ष लागले होते. सुरूवातीचे 5 महिने त्यांनी ‘मैने प्यार किया’चं लेखन केलं. त्यानंतर त्यांनी ‘हम आप के है कौन’च्या स्क्रिप्टवर काम केलं

3.  हम आप के हैं कौन हा पहिला हिंदी चित्रपट होता ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली होती.

4. प्रेमच्या भूमिकेसाठी आमिर खानला निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण आमिरला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि त्याने नकार दिला. त्यानंतर हा रोल सलमान खानला ऑफर करण्यात आला. त्यावेळी सलमानचं करिअरच्या वाईट काळात होता. त्यामुळे त्याने लगेच चित्रपटासाठी होकार दिला.

5.  हम आपके हैं कौन चित्रपट अल्ट्रा स्टिपिओ ऑप्टिकल साऊंडमध्ये रिलीज करण्यात आला होता. ऑडिओ व्हिज्युअल्सच्या चांगल्या अनुभवासाठी असं करण्यात आलं होतं. ज्या थिएटरर्समध्ये ही सिस्टीम नव्हती तिथं चित्रपट रिलीज केला गेला नव्हता.

6. ‘जुते दो पैसे दो’ गाण्याचा म्युझिक पार्ट राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातलं गाणं ‘कबूतर जा’ आणि ‘आजा शाम होने आई’पासून घेतला होता.

7. हम आप के हैं कौन च्या शूटिंगदरम्यान अनुमप खेर यांना फेशियल पॅरालिसीस झाला होता. हे कळू नये यासाठी त्यांनी चित्रपटात शोलेच्या शराबीवाचा सीन शूट केला होता.

8. माधुरी दीक्षितने चित्रपटात निशाची भूमिका करण्यासाठी 3 कोटी रुपये घेतले होते. हे सलमानच्या फीपेक्षाही जास्त होते.

9. चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी जवळपास 4 वर्षे लागली. चित्रपटाची शूटिंग ऊटीमध्ये झाली होती.

10. आलोकनाथ यांच्या भूमिकेसाठी आधी राजेश खन्ना यांना विचारण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी त्यासाठी नकार दिला होता.

संबंधित बातम्या :

शाहरुख आमिरला म्हणाला काजोल चांगली अभिनेत्री नाही! आता म्हणतोय सुहानाने तिच्याकडूनच अभिनयाचे धडे घ्यावेत!  

अभिनेता स्वप्नील जोशीची नवी भरारी, लवकरच सुरू करणार ‘भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म’!

‘मला आजही मनासारखे चित्रपट मिळतात’, अभिनेत्री निशिगंध वाड यांनी व्यक्त केला आनंद!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.