अंधेरीतल्या हॉटेल रुममध्ये मॉडेलने उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण

मॉडेल, इंजीनिअर, MBA, उत्तम डान्सर, फिटनेस फ्रीक.. तरीही घेतला टोकाचा निर्णय

अंधेरीतल्या हॉटेल रुममध्ये मॉडेलने उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण
Akanksha MohanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 1:59 PM

मुंबई- मायानगरी मुंबईत अनेकजण मोठी स्वप्नं घेऊन येतात. काहींची स्वप्नं इथे पूर्ण होतात तर काहींच्या पदरी निराशा येते. ग्लॅमरच्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) इथं राहणाऱ्या आकांक्षा मोहन या 30 वर्षीय मॉडेलने (Model) आत्महत्या केली. चार बंगला परिसरातील एका हॉटेलमध्ये पंख्याला लटकून तिने आत्महत्या केली. याप्रकणी वर्सोवा पोलीस पुढील तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी या मॉडेलने एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत तिने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेलने बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये चेक-इन केलं. रात्री तिने जेवणाची ऑर्डरसुद्धा दिली होती. दुसऱ्या दिवशी गुरुवारी जेव्हा वेटरने रुमची बेल वाजवली तेव्हा तिने दार उघडलं नाही. बराच वेळ होऊनसुद्धा दार न उघडल्याने वेटरने हॉटेलच्या मॅनेजरला कल्पना दिली. मॅनेजरने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

हॉटेलमध्ये पोलीस पोहोचल्यानंतर मास्टर चावीने रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी मॉडेल पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. हॉटेलच्या रुममध्ये त्यांना तिने लिहिलेली सुसाईट नोट मिळाली.

‘मला माफ करा. माझ्या आत्महत्येसाठी कोणीच जबाबदार नाही. मी खूश नाही, मला फक्त शांती हवी आहे’, असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं. संबंधित मॉडेलचा मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवण्यात आला आहे. मॉडेलने नैराश्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं की त्यामागे आणखी कुठलं कारण होतं, याचा तपास पोलीस करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.