Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका आठवड्यात ४ सेलिब्रीटींनी घेतला अखेरचा श्वास; दोघांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

बॉलिवूडला मोठा धक्का... एका आठवड्यात ४ मोठ्या सेलिब्रिटींचं निधन; एकाने पुरस्कार सोहळ्यात घेतला अखेरचा श्वास

एका आठवड्यात ४ सेलिब्रीटींनी घेतला अखेरचा श्वास; दोघांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 11:22 AM

मुंबई : गेल्या आठवड्यात फिल्म इंडस्ट्रीला (film industry) मोठा धक्का बसला आहे. कारण एकामागे एक चार मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांनाच नाही तर, बॉलिवूडचं देखील मोठं नुकसान झालं. चार कलाकारांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. चार कलाकारांच्या निधनामुळे चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत अभिनेते गुरु दत्त यांची बहीण आणि प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी, ‘मिर्झापूर’ फेम शाहनवाज यांच्या निधनाच्या वृत्तामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

अभिनेते शाहनवाज प्रधान ‘मिर्झापूर’ फेम शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १७ फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान (award ceremony) त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी शाहनवाज यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.

तारक रत्न ज्युनियर एनटीआरचा (Junior NTR) चुलत भाऊ अभिनेता तारक रत्न (Tarak Ratna) यांचं देखील निधन झालं. हृदय विकाराचा झटका आल्यामुळे तारका रत्न यांचं निधन झालं. तारक रत्न यांनी हृदय विकाराचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते कोमात असल्याची बातमी समोर आली. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे सुद्धा वाचा

अभिनेते जावेद खान अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan) यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्री मोठा धक्का बसला आहे. जावेद खान अमरोही यांनी अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘लगान’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. वयाच्या ६० व्या वर्षी जावेद खान अमरोही यांनी अखेरचा श्वास घेतला. जावेद खान अमरोही यांनी राज कपूर, शबाना आझमी यांच्यापासून आलिया भट्टपर्यंत अनेक कलाकारांसह काम केलं आहे. निधनानंतर शबाना आझमी आणि आमिर खान यांनीही जावेद खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

चित्रकार ललिता लाजमी दिग्गज दिवंगत अभिनेते गुरु दत्त (Guru Dutt) यांची बहीण आणि प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी (Lalita Lajmi) यांच १३ फेब्रुवारी रोजी निधन झालं. ललिता लाजमी यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. ‘तारे जमीन पर’ सिनेमात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका पार पाडली होती.

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.