विजय देवरकोंडा 100 चाहत्यांना पाठवतोय मनाली ट्रिपसाठी; तुमची देखील आहे मोफत फिरण्याची इच्छा?
नव्या वर्षानिमित्त विजय देवरकोंडाकडून चाहत्यांना मोठं गिफ्ट; अभिनेता १०० चाहत्यांना मनालीला नेणार फिरायला, तुम्हीही जावू शकता मोफत ट्रीपला
मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक ठिकाणी अभिनेता दिसल्यानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अभिनेता देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतो. पण आता तर अभिनेत्याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नव वर्षाच्या निमित्तने चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. नव्या वर्षानिमित्त विजय देवरकोंडा चाहत्यांना मानालीला फिरायला नेणार आहे. नुकताच अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने चाहत्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.
अभिनेता १०० चाहत्यांना मनालीला फिरायला नेणार आहे. ही ट्रीप पाच दिवसांची असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ट्रीपमध्ये १०० चाहत्यांचं खाणं, राहणं आणि फिरण्याचा खर्च विजय करणार आहे. तुम्ही देखील विजयचे चाहते असाल आणि तुम्हाला मोफत मनाली येथे आनंद लुटायचा असेल, तर अभिनेत्याने पोस्टमध्ये दिलेल्या एका लिंकवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर दिलेल्या देवरासंता लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा. या ट्रीपची एक अट आहे, आणि ही अट म्हणजे तुमचं वय १८ वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्हाला जर का मोफत ट्रीपचा आनंद घ्यायचा असेल, तर लवरकर अभिनेत्याने पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा.
याआधी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवराकोंडाने देवरसंता लिंकमध्ये चाहत्यांना विचारले होतं की त्याला कुठे फिरायला आवडेल. तेव्हा अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी पर्वतावर जायला आवडेल असं सांगितलं. म्हणूनच या अभिनेत्याने मनालीची निवड केली. या ट्रीपमध्ये 100 निवडक चाहत्यांना बर्फाच्छादित पर्वत पहायला मिळतील आणि ते संपूर्ण प्रवासाचा मोफत आनंद घेता येणार आहे.