ऐश्वर्याची एकाचवेळी 600 साड्यांची खरेदी, पाण्यासारखा पैसा ओतला; ‘त्या’ सिनेमावेळी काय घडलं होतं?
Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळे तूफान चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचेही सांगितले जातंय.
नुकताच एक मोठा खुलासा करण्यात आलाय. ‘देवदास’ चित्रपटात ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान हे मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे देवदास हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 50 कोटी लागले. संजय लीला भन्साळी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी ऐश्वर्या हिच्यासाठी तब्बल 600 साड्या खरेदी करण्यात आल्या होत्या.
देवदास चित्रपटात ऐश्वर्या राय हिने डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केले कपडे घातले होते. यावेळी नीता लुल्ला आणि संजय लीला भन्साळी यांनी स्वतः कोलकाता शहरात 600 साड्या खरेदी केल्या होत्या. नीता यांनी स्वत: वेगवेगळ्या साड्यांचे मिश्रण करून खास स्टाईल तयार केली. या चित्रपटासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता.
फक्त ऐश्वर्या हिच्यासाठी या 600 साड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. देवदास चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. सुपरहिट हा चित्रपट ठरला. कोट्यवधीची कमाई देवदास चित्रपटाने केली. हेच नाही तर दररोज तीन तास पारोचे लूक तयार करण्यासाठी लागत असत.
देवदास चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानने एक वेगळी छाप नक्कीच सोडली. ऐश्वर्या हिची भूमिका देखील लोकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाने मोठा काळ गाजवला. फक्त देवदासच नाही तर ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.