उत्तराखंडच्या घटनेवर तयार होणार चित्रपट? ‘त्या’ पोस्टरमध्ये थेट अक्षय कुमार, मोठ्या हालचाली सुरू

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा तूफान चर्चेत आहे. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, असे असताना देखील अक्षय कुमार याच्या चित्रपटाला म्हणावा तसा फार जास्त धमाका करण्यात यश मिळताना दिसत नाहीये. सेल्फी हा चित्रपट देखील त्याचा फ्लाॅप गेला.

उत्तराखंडच्या घटनेवर तयार होणार चित्रपट? 'त्या' पोस्टरमध्ये थेट अक्षय कुमार, मोठ्या हालचाली सुरू
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 2:03 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट रिलीज होतात. सध्या अक्षय कुमार हा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये 17 दिवस एका निर्माणाधीन सुरंगमध्ये तब्बल 41 मजूर फसले होते. या मजूरांना 17 दिवसांनंतर बाहेर काढण्यात आले. या घटनेची जोरदार चर्चा रंगताना दिसली. सोशल मीडियावर सतत याबद्दलीच चर्चा लोकांमध्ये रंगताना दिसली. लोकांचे याबद्दलच्या प्रत्येक बारीक अपडेटवर लक्ष दिसले. आता या घटनेवर आधारित थेट चित्रपट तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

फक्त चित्रपट नाही तर या चित्रपटात अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जातंय. त्याबद्दलचे एक पोस्टर देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. अशाप्रकारच्या स्टोरीच्या चित्रपटामध्ये काम करण्यास अक्षय कुमार याला आवडते. आता याबद्दल मोठा खुलासा काही दिवसांमध्ये होऊ शकतो.

उत्तरकाशीमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये मजूरांना बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका ही अर्नोल्ड डिक्स नावाच्या व्यक्तीने पार पडली. आता चित्रपटात अक्षय कुमार हा अर्नोल्ड डिक्स याच्याच भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. जे चित्रपटाचे पोस्टर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये अर्नोल्ड डिक्स याच्या सारख्या लूकमध्ये अक्षय कुमार हा दिसत आहे.

जर खरोखरच उत्तरकाशीच्या घटनेवर चित्रपट तयार झाला तर तो चित्रपट धमाका करू शकतो. अक्षय कुमार या चित्रपटाबद्दलची घोषणा काही दिवसांमध्येच करू शकतो असे सांगितले जात आहे. अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला.

अक्षय कुमार याच्या सेल्फी या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार आणि परिणीची चोप्रा यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार दिसला. परिणीती चोप्रा हिने फार जास्त त्या चित्रपटाचे प्रमोशन देखील केले नाही.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.