TV series | प्रसिद्ध टीव्ही मालिकेचा सेट आगीच्या कचाट्यात, कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण, अभिनेत्रीने दिली मोठी अपडेट

नुकताच मुंबईमध्ये एका टीव्ही मालिकेच्या सेटवर आगीची घटना घडलीये. या आगीमुळे कलाकारांमध्ये काही वेळ हे भीतीचे वातावरण बघायला मिळाले. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. नुकताच या आगीबद्दल मालिकेतील अभिनेत्रीने सांगितले आहे.

TV series | प्रसिद्ध टीव्ही मालिकेचा सेट आगीच्या कचाट्यात, कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण, अभिनेत्रीने दिली मोठी अपडेट
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 4:58 PM

मुंबई : एक आगीची मोठी बातमी पुढे येतंय. टीव्ही मालिकेच्या (TV series) सेटवर ही आग लागलीये. मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीनंतर सेटवर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जातंय. मुंबईतील (Mumbai) मीरा रोडवर हा मालिकेचा सेट असून एका रूमला आग लागलीये. मीत: बदलेगी दुनिया की रीत या मालिकेच्या सेटला आग (Fire) लागलीये. ज्यावेळी ही आगीची घटना घडली, त्यावेळी सेटवर मोठ्या प्रमाणात लोक आणि मालिकेतील कलाकार उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच एकच गोंधळ हा सेटवर बघायला मिळाला. सुदैवाने या आगीतून सर्वजण सुरक्षित बाहेर आल्याचे सांगितले जातंय.

मीत: बदलेगी दुनिया की रीत या मालिकेत आशी सिंह आणि शगुन पांडे मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच मालिकेच्या सेटवर आग नेमकी कशी लागली, याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार सेटवरील एका रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली.

ज्या रूममध्ये आग लागली, त्या रूममधील सर्व साहित्य हे जळून खाक झाल्याचे सांगितले जातंय. शॉर्ट सर्किट नेमके कशाने झाले आहे, याचा तपास हा केला जातोय. मालिकेतील अभिनेत्री आशी सिंह हिने हा आगीबद्दल बोलताना सांगितले की, लोक आता सेटवर ठिक आहेत. एक छोटीशी आग लागली होती आणि ती फक्त एका रूममध्येच लागली होती.

ज्या रूममध्ये आग लागली त्या रूमचा एसी गेल्या काही दिवसांपासून ठिक नव्हता. सर्वजण सुरक्षित आहेत. कारण त्या रूममध्ये कोणीच नव्हते. आग लागली त्यावेळी सर्वजण सेटवरच होते. आता आम्ही मालिकेच्या शूटिंगलाही परत सुरूवात केली आहे. आता सर्वकाही व्यवस्थित आहे, चिंता करण्यासारखे अजिबातच काही नाहीये.

काही दिवसांपूर्वीच गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटवर देखील आगीची घटना घडली होती. मात्र, गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटवर अत्यंत मोठी आग लागली होती. मालिकेच्या सेटवरील कलाकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. ही आग इतकी जास्त होती की, आकाशात काळ्या धुऱ्यांच्या लाटा दूरूनच बघायला मिळत होत्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.