कमरेखालची टीका?… श्वेता बच्चन आणि ऐश्वर्यातील वाद टोकाला?, थेट घटस्फोटच..
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. यामुळे चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. हेच नाही तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर काही भाष्य करण्यात नाही आले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात जोरदार वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघेही विभक्त राहत असल्याचे देखील सांगितले जाते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या मुलीच्या शाळेतील एका कार्यक्रमात दोघेही वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहचले होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याची बहीण श्वेता बच्चन यांच्यामध्ये वाद असल्याचे सांगितले जाते.
श्वेता बच्चन हिने थेट एका मुलाखतीमध्येच ऐश्वर्या राय हिच्या न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल जाहिरपणे सांगितले होते. सध्या सोशल मीडियावर श्वेता बच्चन हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर श्वेता बच्चन हिने ही पोस्ट ऐश्वर्या राय हिच्यासाठीच शेअर केल्याचे सांगितले जात आहे.
जाहिरपणे ऐश्वर्या राय हिच्यावर एखाद्या मुलाखतीमध्ये बोलणे आणि थेट अशाप्रकारची पोस्ट शेअर केल्याने ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांचे रिलेशन चांगले नसल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामधील वाद पुढे येत आहेत.
सतत चर्चा आहे की, श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये वाद आहेत. हेच नाही तर कोणत्याही पार्टीमध्ये या दोघी कधीच एकत्र येत नाहीत. आतापर्यंत ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन कधीच एकत्र स्पाॅट देखील झाल्या नाहीत. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या वादाचे कारणही श्वेताच असून शकते, असे सतत सांगितले जाते.
श्वेता बच्चन हिने थेट भेडियाची पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनेकांनी श्वेता बच्चन हिच्या या पोस्टनंतर तिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये. एकाने तर पोस्ट शेअर करत थेट म्हटले की, अगोदर स्वत:चे घर सांभाळायला शिका आणि मग हे सर्व करा. अनेकांना श्वेता बच्चन हिची ही पोस्ट अजिबातच आवडली नसल्याचे दिसत आहे.