ए आर रेहमान यांच्या मुलासोबत घडली गंभीर घटना; म्हणाला, ‘मी आज जिवंत आहे, कारण…’

प्रसिद्ध गायक संगीतकार ए आर रेहमान यांचा मुलगा गंभीर अपघातातून थोडक्यात बचावला; सेटवर अमीन याच्यासोबत एक धक्कादायक घटना... त्यानंतर ए आर रेहमान म्हणाले...

ए आर रेहमान यांच्या मुलासोबत घडली गंभीर घटना; म्हणाला, 'मी आज जिवंत आहे, कारण...'
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:44 AM

मुंबई : प्रसिद्ध गायक संगीतकार ए आर रेहमान यांचा मुलगा अमीन एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शुटिंग सुरु असताना सेटवर अमीन याच्यासोबत एक गंभीर घटना घडली आहे. या घटनेनंतर ए आर रेहमान यांनी भारतीय सेट आणि शुटिंगच्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर अमीन याने देखील सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे. ए आर रेहमान यांच्या मुलासोबत धक्कादायक घटना घडल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र अमीन याच्या प्रकृती विचारणा चाहते करताना दिसत आहेत.

शुटिंगच्या सेटचे फोटो शेअर करत अमीन म्हणाला, ‘आज मी सुरक्षित आणि जिवंत आहे कारण अल्लाह, माझे आई-वडील, कुटुंब, प्रियजन आणि अध्यात्मिक गुरु यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. तीन दिवसांपूर्वी मी एका गाण्याचं शुटिंगमध्ये व्यस्त होतो. टीमने अभियांत्रिकी आणि सुरक्षेची काळजी घेतली असले, असा विचार करत मी माझ्या कामाकडे लक्ष देत होतो. पण क्रेनला टांगलेलं झुंबर खाली पडलं ‘

हे सुद्धा वाचा

पुढे अमीन म्हणाला, ‘मी मध्यभागी उभा होतो. पण जरा जरी हललो असतो तर, सर्व काही माझ्या डोक्यावर पडलं असतं. तेव्हा मला आणि माझ्या टीमला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून मी बाहेर पडू शकत नाही.’ सध्या अमीन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र अमीन याच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

View this post on Instagram

A post shared by “A.R.Ameen” (@arrameen)

मुलाच्या अपघातावर ए आर रेहमान म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी माझा मुलगा आणि त्याची स्टाइलिंग टीम एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. देवाच्या कृपेने मुंबई याठिकाणी फिल्म सीटीमध्ये झालेल्या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. इंडस्ट्री आता प्रगती करत आहे. अशात भारतीय सेट आणि स्थानांवर जागतिक दर्जाची सुरक्षा राखली पाहिजे.’

ते पुढे म्हणाले, ‘या अपघातानंतर आम्ही प्रत्येक जण हैराण झालो आहोत. त्याचप्रमाणे विमा कंपनी तसेच गुडफेलस स्‍टुडिओज प्रॉडक्‍शन कंपनीच्‍या तपासणीच्‍या निकालाची प्रतीक्षा करत आहोत.’ असं देखील ए आर रेहमान म्हणाले.

अमीन याच्याबद्दल सांगयचं झालं तर, तो देखील वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात स्वतःचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. अमीन वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमीन सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. सोशल मीडियावर कायम स्वतःचे व्हिडीओ पोस्ट करत अमीन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.