Birthday Special : हिंदू असतानाही ए.आर. रहमान का झाले मुस्लिम?, वाचा INSIDE STORY

फक्त बॉलिवूडच नाही तर ए.आर. रहमान हे नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी गायलेली गाणी प्रत्येकाच्या आत्म्याला तृप्त करतात असं म्हणायला काही हरकत नाही.

Birthday Special : हिंदू असतानाही ए.आर. रहमान का झाले मुस्लिम?, वाचा INSIDE STORY
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 7:01 AM

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार ए.आर. रहमान यांचा आज वाढदिवस आहे. खरंतर, फक्त बॉलिवूडच नाही तर ए.आर. रहमान हे नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी गायलेली गाणी प्रत्येकाच्या आत्म्याला तृप्त करतात असं म्हणायला काही हरकत नाही. यामुळेच आज ए.आर. रहमान यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्यासंबंधी काही खास गोष्टी. (a r rehman Birthday Special Why he became muslim from hindu know here)

सगळ्यात विशेष म्हणजे फार कमी लोकांना ए.आर. रहमान यांचं खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव दिलीप शेखर आहे. दिलीप यांचा जन्म 6 जानेवारी 1967 ला झाला. दिलीपच्या वडिलांचे दीर्घ आजारानंतर निधन झालं. पण यानंतर कुटुंब खूप अस्वस्थ होतं. कुटुंबातील परिस्थितीही काही खास नव्हती. अशात दिलीप यांची बहीण आजारी पडली. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब एका मुस्लिम पीरकडे गेलं होतं. त्या पीरने कुटूंबावर असा काही चमत्कार केला की आज कुटुंबाची स्थिती सुधारताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांच्या बहिणीची तब्येत सुधारली तेव्हा घरात आनंदाचं वातावरण होतं.

आपल्या कठीण काळात इस्लामने त्यांची साथ दिली आणि सगळं काही सुरळीत सुरू झालं. या घटनेनंतर दिलीपच्या आईने विचार केला की त्या इस्लामचा स्वीकार करतील. म्हणून त्यांनी धर्मांतर केलं. आता दिलीप नाव असताना ए. आर. रेहमान नाव कसं पडलं याच्यामागेही एक खास किस्सा आहे.

80 च्या दशकात, धर्म बदलल्यानंतर, दिलीपचं कुटुंब एका ज्योतिषाकडे गेलं होतं. जिथे त्यांच्या आईने मुलीच्या लग्नाबद्दल विचारणा केली. पण ज्योतिषाने मुलीचं भविष्य सांगण्याआधी मुलाचं नाव बदलण्याचा सल्ला दिला. बरं, अशात रेहमान यांनाही त्यांचं नाव बदलायचं होतं. यामुळे ज्योतिषाने त्यांना दोन नावं सांगितली. पहिलं नाव ‘अब्दुल रहीम’ आणि दुसरं नाव ‘अब्दुल रहमान’ यावेळी त्यांनी अब्दुल रहमान असं नाव ठेवण्याचं ठरवण्यात आलं.

पण यानंतर पुन्हा नावात बदल करून दिलीपने आपलं ए. आर. रेहमान असं ठेवलं. दरम्यान, नसरीन मुन्नी कबीर यांच्या ‘ए. आर. रेहमान डे स्पिरीट ऑफ म्युझिक’ या पुस्तकात त्यांचं नाव “अल्ला रहिम रहमान” असं लिहिण्यात आलं आहे.

रेहमान यांच्या आयुष्याबद्दलची ही कहानी खरंतर, फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या चाहता वर्ग खूप मोठा आहे. तरुणांमध्ये रेहमान यांच्या गाण्याचा काही वेगळाच क्रेझ आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज चाहत्यांमध्ये जल्लोष असल्याचं पाहायला मिळतं. (a r rehman Birthday Special Why he became muslim from hindu know here)

संबंधित बातम्या – 

रिया अद्याप सुशांतच्या दुःखातून सावरली नाही, म्हणाली…

Marathi Serial : मनोरंजनाची मेजवानी, तुमच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड्स

राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

(a r rehman Birthday Special Why he became muslim from hindu know here)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....