मला बलात्काराची धमकी मिळत आहे, माझा… कंगना राणावत हिचे हैराण करणारे विधान, म्हणाली..
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच कंगना राणावत हिच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. आता कंगनाच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अभिनयानंतर कंगनाने आपला मोर्चा हा थेट आता राजकारणाकडे वळवला. लोकसभा निवडणूकही लढवून कंगना खासदार झालीये. कंगना राणावत ही तिच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने शेतकरी आंदोलनाबद्दल एक मोठे आणि हैराण करणारे विधान केले. ज्यानंतर तिच्यावर मोठी टीका करण्यात आली. भाजपाने देखील स्पष्ट केले की, ते तिचे वैयक्तिक मत आहे. आता कंगना परत एकदा चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.
पंजाबचे माजी खासदार आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सिमरनजीत सिंह यांनी कंगना राणावतच्या विरोधात एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी थेट म्हटले होते की, तुम्ही कंगना राणावतला विचारा की, बलात्कार कसे होतात म्हणजे लोकांना सांगताना येईल की, बलात्कार कसे केले जातात. तिला त्याचा खूप मोठा अनुभव आहे.
कंगनाने शेतकरी आंदोलनाबद्दल भाष्य केल्यानंतर सिमरनजीत यांनी हे भाष्य केले. आता यावर कंगना राणावत हिने मोठे भाष्य करत म्हटले की, माझ्यावर बलात्कार करण्याच्या धमक्या मला मिळत आहेत. माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी देत माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाहीत. कंगनाच्या म्हणण्यानुसार बलात्काराच्या धमक्या देत तिचा आवाज दाबला जातोय.
आता कंगना राणावत हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. कंगना राणावत हिने थेट म्हटले होते की, शेतकरी आंदोलनावेळी तिथे महिलांवर बलात्कार केले गेले. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील झाली. आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे. सततच्या होणाऱ्या टिकेनंतर भाजपाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, ते कंगनाचे वैयक्तिक मत आहे.
कंगना राणावत ही नेहमीच दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या विरोधात बोलताना दिसते. कंगना राणावत हिने लोकसभेची निवडणूक मंडी येथून लढवली आणि ती निवडूनही आली. सध्या कंगना राणावत तिच्या आगामी चित्रपटाचेही जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कंगना ही सतत मुलाखती देताना देखील दिसत आहे.