अंबानींच्या मोठ्या सुनेनी पीएम मोदींच्या शेजारी बसून घेतल्या डुलक्या, लग्नातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अखेर…

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जोरदार पद्धतीने झाले. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नातील तयारी सुरू होती. फक्त देशच नाहीतर विदेशातूनही लोक या लग्न सोहळ्यात सहभागी झाले.

अंबानींच्या मोठ्या सुनेनी पीएम मोदींच्या शेजारी बसून घेतल्या डुलक्या, लग्नातील 'तो' व्हिडीओ व्हायरल, अखेर...
Shloka Mehta
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 12:32 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी झाले. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. देशच नाहीतर विदेशातून लोक भारतामध्ये या लग्नासाठी दाखल झाले. एक महिन्यांपासून लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन विविध ठिकाणी सुरू होते. आता या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार तर या लग्नात धमाल करताना दिसत आहेत. फक्त बॉलिवूड कलाकारच नाहीतर प्रत्येक क्षेत्रातील लोक या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अनंत अंबानी आणि राधिका यांच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमध्ये सहभागी झाले.

काही खास पाहुण्यांना या लग्नात थेट 2 कोटींचे घड्याळ गिफ्ट म्हणून देण्यात आले. विशेष म्हणजे या दोन कोटींच्या घड्याळ्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता सध्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका हे बसले आहेत.

स्टेजवर कार्यक्रम सुरू असताना नरेंद्र मोदी यांच्या एका बाजूला नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही बसलेली दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, श्लोका हिला झोप येत आहे. मध्येच ती डुलक्या घेताना दिसत आहे. अचानक परत ती डोळे उघडून समोर बघताना दिसत आहे.

आता हाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत श्लोका हिची बाजू घेतल्याचे बघायला मिळतंय. बऱ्याच जणांनी म्हटले की, मुळात म्हणजे लग्न म्हटले की, माणूस अधिक थकतो आणि झोप व्यवस्थित होत नाही.

दुसऱ्याने म्हटले की, आपल्याकडे लग्नामध्ये विविध कार्यक्रम असतात आणि पाहुणे आणि प्रत्येक गोष्टीची नियोजन करण्यात झोप अजिबातच होत नाही आणि तेच श्लोका हिच्यासोबत झाले. श्लोका ही प्रत्येक फंक्शनमध्ये दिसली. खास नियोजन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे करण्यात आले होते. विशेष म्हणजे या लग्नाची चर्चा फक्त देशातच नाहीतर विदेशातही जोरदार बघायला मिळत आहे.

Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.