आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte मालिकेत उत्कंठावर्धक वळण

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?
Madhurani Prabhulkar, Omkar Gowardhan
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 6:04 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती (Arundhati) ही रेकॉर्डिंगसाठी मुंबईबाहेर गेली आणि तिथे काही अडचणी आल्यामुळे तिला तिचा मित्र आशुतोषसोबत (Ashutosh) बाहेर रात्र काढावी लागली. या घटनेनंतर अनिरुद्ध आणि कांचन देशमुख तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. अरुंधती अखेर देशमुख कुटुंबातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाचं प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून बरंच कौतुक झालं. दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा घेत संजना ही कांचन देशमुखांना अरुंधतीविरोधात भडकवते. भररस्त्यात कांचन देशमुख अरुंधतीला तिचा घरावरचा हक्क सोडायला भाग पाडतात. अरुंधतीसुद्धा मागचापुढचा विचार न करता घरावरील तिचे हक्क सासूंच्या नावे करते. यानंतर आता मालिकेत आणखी मोठा ट्विस्ट येणार आहे.

देशमुखांच्या घराबाहेर पडल्यानंतर अरुंधती पुढे कोणतं पाऊल उचलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. बुधवारी प्रसारित होणाऱ्या भागात अरुंधती तिच्या आईच्या घरी जाते. यावेळी आई आणि सुधीर अरुंधतीची बाजू घेत तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगतात. त्यानंतर यश, नितीन आणि आशुतोष हे अरुंधतीला भेटायला येतात. ‘माझं चुकलं, मी काहीही सहन करेन, करते, असा समज मी करून दिला होता त्यांचा…’ असं म्हणत अरुंधतीसुद्धा तिच्या निर्णयावर ठाम राहते. दुसरीकडे विशाखा आणि केदार हे अनिरुद्ध आणि कांचन यांची चांगलीच कानउघडणी करतात.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आशुतोष देणार अरुंधतीवरील प्रेमाची कबुली मालिकेच्या पुढील भागांत आशुतोष हा अखेर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली चक्क देशमुख कुटुंबीयांसमोर देणार आहे. आता त्यावर देशमुख कुटुंबीय, विशेषकरून अनिरुद्ध आणि कांचन यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इतकंच नव्हे तर अरुंधतीला समजल्यानंतर ती काय बोलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून असेल. अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करणार की त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांत पहायला मिळेल.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.